हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

गुरुवार, ६ नोव्हेंबर, २००८

चहा टपरी ....


मृदु भावनांचा हेतु त्याचा साधा
प्रिये , प्रेमाने पाजेन एक कटिंग प्याला
आधी घे मस्त झुरका मग एक घोट त्यातला
सर्वांचे स्वागत करतो चहा टपरी वरचा प्याला ||

ओझे जीवनाचे वाहत तो गेला
जिव त्याचा विसावला घेउन एक प्याला
क्षीण घालवून , विचार सुचवून दिला त्याला
सर्वांचे मन खुलवे तो चहा टपरी वरचा प्याला ||

मित्रा हा जिव तुझा झाला, सर्वांचा तू होउन गेला
किटलीत भरून तुला , हा झाला चहावाला
त्यासी देऊन पैका , तो झाला जीवनवाला
सर्वांचे मन जिंकले तो चहा टपरी वरचा प्याला ||

जरी जवळ उभी ती मधुशाला
मला हवे चहा टपरी वरचा प्याला ||

आपला,
(चहाप्रेमी) विशुभाऊ

३ टिप्पण्या: