हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

सोमवार, २२ जून, २००९

गुजराती भूत !

काल संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोचलो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात घासावे लागतात त्या प्रमाणे रात्री झोपण्या आधी जेवावे लागते !!! आता ह्या नियमाचे पालन करण्या साठी मी जेवायचे ठरवले ......... काल होता रविवार म्हणजे मांसाहारच करावा लागणार होता ( नाहीतर मला जाती बाहेर केले असते !), म्हणून मी झकास पैकी कोंबडी भात मागवला व त्यावर आडवा हात मारला ... ह्या सगळ्या नंतर मला कधी डोळा लागला हेच कळले नाही ....... मध्यरात्री १२ वाजता एक पांढरा झब्बा लेंगा घातलेल्या माणसाने मला काठी ने डिवचून डिवचून उठवले , माझी तर तळ पायाची आग मस्तकात गेली ... 


मी : अरे भाड्या कोण रे तू ? आणि माझ्या रूम मध्ये कसा घुसलास ???? भाड्खाऊ साला.. हरामखोर ( मी जाम पेटलो होतो ) 
तो : हुं भूत छे !!! 
मी : त त प प .... हा हं क का काय प पाहिजे तुम्हाला ? 
तो : @#$#$%&*^%##^ ( तू इथे चिकन खाल्लीस ?) 
मी : हो हो सोर्री.... पण संपली काहीच शिल्लक नाही !!! 
तो : नालायका, ती शिल्लक असती तर तुला शिल्लक नसता ठेवला मी ...( हे सगळा तो गुजरातीतून बोलला ) 
मी : मला माफ करा !!! परत नाही खाणार इथे ! 
तो : खशिलच काय ? गळा दाबून तुला पण त्या कोंबडी सारखा हलाल करेन !!! 
मी : पण उद्या जेऊ काय ? 
तो : एक काम कर पुढे कोपर्या वर माझ्या मुलाची ( हिरेन गांधी ची ) खानावळ आहे तिथे गुजराती थाळी खा , आणि हो त्या शेजारच्या पटेल कडे नको जाउस हराम खोर आहे , मारून ५ वर्षे झाली आजून माझे घेतलेले पैसे नाही दिले त्याने ! 
मी : जी शेठ , उद्या तिथेच जेवेन !!!!!!!!!!! 
तो : आणि माझ्या मुलाला सांग, हिशोबात गोंधळ घालू नको माझे लक्ष आहे ! 
एवढे बोलून तो नाहीसा झाला ..... साला हा गुजराती भूत मेल्यावर पण धंदा नाही सोडत !!!!
तर मग आज हिरेन भाई कडे गुज्जू थाळी ... येणार का ??? भुताच्या पोराकडे जेवायला ??? 
आपला,
(डरपोक) विशुभाऊ !

बुधवार, १७ जून, २००९

आयुष्याच्या अल्बममध्ये

आमच्या तिर्थरुपानी पाठवलेल / खरडलेल काव्य आपल्या आस्वादासाठी !! आपला, (नम्र) विशुभाऊ


--


आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात
धन्यवाद
विकास रणदिवे
प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही. कधी ना कधी ते पळणार्‍याला गाठतातच
पळवाटा मुक्कामाला पोहोचवत नाहीत. मुक्कामाला पोहोचवतात ते सरळ रस्तेच ...


शुक्रवार, ५ जून, २००९

नकाशा !! छे चक्क फिरून बघा !!!

मित्रहो,
आपल्या आवडत्या Google ने काल google-maps मध्ये फार मोठी सोय वाढवली , Google Street View........ ह्या मध्ये आपण चक्क रस्त्यावरून फिरुन बघू शकतो , म्हणजे एकदा नकाश्यातून फिरून आलो कि रस्त्यावर चुकण्याचा प्रश्नच नाही ....
हे सगळ गुगल ला सुचत कस माहित नाही !!!! पुढे भविष्यात आजून काय काय जादूचे प्रयोग दाखवणार ते कदाचित देवाला पण नसेल माहित !!!!
गूगल च्या कर्तुत्वाला आणि बुद्धिमत्तेला त्रिवार सलाम !!!!!!!!!

आपला,
(गुगल प्रेमी ) विशुभाऊ

बुधवार, ३ जून, २००९

आँनलाइन आँपरेटिंग सिस्टीम !

शोधयंत्र प्रणालीतील इंद्रपद मिळवलेला Google Inc हा उद्योग समुह फार हुशार रीतीने आपली वाटचाल करतो हे सगळ्यांनाच माहित आहे . दोन वर्षां पूर्वी ह्या google ने आशी अफवा पसरवली कि , google लवकरच online operating system चालू करत आहे आणि त्याचे नाव GOOS ( google operating system) असेल.
आता ह्याचा परिणाम आसा झाला कि इतर स्पर्धक ह्या तंत्रज्ञानावर काम करू लागले !
काही असो , पण मला हा विचार खूप भावाला व मी सुद्धा ह्या तंत्रावर शोध करू लागलो , बर्येच दिवस eyeos.org ह्या open-source संघटने बरोबर घालवल्यावर काल मला अचानक G.ho.st हि online operating system मिळाली.
G.ho.st हि eyeos पेक्षा बरीच तयार system आहे , इथे फुकट खाते उघडल्यावर तुम्हाला 15 GB ची जागा मिळते त्यात email, documents, spreadsheets, presentations वगैरे उपलब्ध आहे. इथे तुम्हाला eyeos मध्ये जसे applications इनस्टैल  कराव लागत तस काही कराव लागत नाही. Zimbra वर आधारित email system आहे , त्यात तुम्ही तुमचे इतर मेल खात्यावरून POP3 किंवा IMAP करू शकता.
G.ho.st हि system उघडल्यावर तुम्हाला कोपर्यात GO आशी कळ मिळेल , हि windows मधील start ची किंवा KDE मधील K-Menu ची आठवण करून देते .
मला हे तंत्र खूप आवडले , आता लोकांना किती भावते हे लवकरच कळेल.

आपला,
(तंत्रज्ञ ) विशुभाऊ 

सोमवार, १ जून, २००९

राष्ट्रवादी चे घड्याळ
चहापान !

दिनांक ३० मे २००९ वेळ सकाळ ८.००

नोकर : वाहिनी साहेब , आज चहापान आहे .. आपले आणि विरोधक मिळून किती होतील हो ?

वाहिनी : गधड्या ! किती वर्ष वर्षात आहेस रे ? विरोधक बहिष्कार घालतात ... माहित नाही का ? उगाच अन्नाची नासाडी नको !

नोकर : जी वाहिनी साहेब !!!! ( एवढे बोलून शेवटचा मुजरा केला )

वेळ दुपारची , चहापानाची वेळ झाली आणि घामा घूम नोकर ओरडत आला .........
नोकर : वाहिनी साहेब , धोका झाला धोका !!!!!!!! विरोधक आले हो धोका झाला !!!!!!!!! आता काय ?
वाहिनी : ठीक आहे , घाबरू नकोस .... चहा कटिंग कर आणि पँटिस अर्धे वाटून दे .... लवकरच निवडणुका आहेत , वाटून खाऊ !

आपला ,
(खट्याळ) विशुभाऊ !