हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ
व्यक्तीरेखा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
व्यक्तीरेखा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८

अंता माते

फट्याकSSS  !
मी सणसणीत कानफटात लगावली आणि बोललो "माझी थट्टा करतोस? अंतरात्मा असे नाव असते का?"
"अरे अंता माते असे नाव आहे माझे , अंता माझे नाव आणि माते शेवटचे नाव !"
इयत्ता आठवीत माझ्या वर्गात आलेल्या नवीन वर्गमित्राला नाव विचारताना घडलेली ही गोष्ट. शेवटचे नाव म्हणजे आडनाव कि अजून काही ते कळले नाही, पण माझ्या ऐकण्यातील चुकी मुळे मी समोरच्याला एक लगावल्याने फार खजील झालो.
"माफ कर मित्रा चूक झाली !"
त्याने हात जोडले आणि म्हणाला "माफी मागणारा देवा पेक्षा थोर असतो.... त्यात तू मला मित्र म्हणालास... तुझा राग कधीच येणार नाही!"
त्याचे तत्वज्ञान ऐकून मी गोंधळून गेलो, माझ्या इतक्या वर्षांच्या मनोवृत्तीला आणि अहंकाराला उभा तडा देणारे होते हे.
गण्या त्यादिवशी शाळेत नसल्याने त्याला मी माझ्या बाकावर बसवून घेतले. तो मन लावून अभ्यासाकडे लक्ष देत होता आणि मी संपूर्ण दिवस धक्क्यातून सावरत नव्हतो.
नंतर कळले की तो ठाण्याच्या कुठल्यातरी आदिवासी पाड्यातला एक आदिवासी आहे. त्यावेळी मला आदिवासी म्हणजे 'झिंगलाला' करणारे धनुष्यबाण वाले असेच वाटत असे. पण हा तसा दिसत नव्हता. रोज चुरगळलेला पण स्वच्छ गणवेश घालून केस विंचरून यायचा. त्याचा 'दादू' म्हणजे मोठा भाऊ त्याला सकाळी रिक्षेने शाळेत सोडायचा आणि नंतर स्वतः दिवसभर रिक्षा चालवायचा.
कालांतराने मी त्याच्याशी एक अंतर ठेवू लागलो. माझा ग्रुप वेगळा, माझे वाचन वेगळे आणि मुळात गप्पा वेगळ्या. पण हा रोज माझ्यासाठी जंगलातील 'मेवा' आणायचा. मेवा म्हणजे बोरांचे, चिंचेचे, तत्सम फळांचे किंवा मधाचे वेगवेगळे प्रकार. माझी खाण्यातील रुची त्याने बरोबर हेरली होती आणि तो ती यथाशक्ती पुरवत होता. मेवा देऊन बदल्यात तो काहीच अपेक्षा धरत नव्हता, ना बोलण्याची ना खेळण्याची ना अभ्यासाची. माझ्याशी मैत्री निभावणे हे देवाने दिलेले कर्तव्य असल्या सारखे निर्मळ मनाने तो पूर्ण करत होता. मी फक्त भोग घेत होतो व तेव्हा मला किंवा माझा मनाला काहीच वाटत नव्हतं.
नंतर इयत्ता ९वी मध्ये त्याला कुठली तरी शिष्यवृत्ती मिळाली आणि तो वसतिगृह असलेल्या कुठल्यातरी शाळेत गेला. जाताना मला सांगून गेला पण मी बेपर्वाईने त्याला 'ठीक' असे बोलून टाटा केला व परत आपल्या दिनक्रमेत रुजू झालो.
ह्या गोष्टीला अंदाजे २२ वर्षे झाली असतील आणि इतक्या मोठ्या कालखंडात तो माझ्या विस्मृतीत गेला.  आज सकाळी ऑफिसला जाताना सिग्नलला माझ्या कारच्या बाजूला कॅम्री उभी होती. मी त्या गाडी कडे पहिले तेव्हा त्या गाडीवाल्याने काच खाली करून माझ्या कडे पहिले व हसला. मला ओळखायला पण फार वेळ नाही गेला तो अंताच होता.
सिग्नल क्रॉस केल्यावर मी गाडी बाजूला घेतली आणि त्याच्या साठी बाहेर आलो. त्याने सुद्धा गाडी बाजूला घेतली आणि काच खाली करून सांगितले "अरे माझी फॅक्टरी पण वागळे इस्टेट मध्येच आहे तुझ्या ऑफिस जवळ, फॉलो मी वी विल टॉल्क देर !"
मी पुन्हा बधिर होऊन बसलो गाडीत 'म्हणजे मी काय करतो आणि कुठे आहे हे त्याला माहित आहे !' .......

"हम बेवफा हो गये पर यार यारी निभाता रहा !!!"

आपला,
(मित्रनिष्ठुर) विशुभाऊ

बुधवार, १९ सप्टेंबर, २०१२

माझी गांधीगिरी


आज माझ्यातल्या सरळ स्वभावाची प्रचीती मलाच झाली ..... इथे सिंगापूर मध्ये फास्टफूड सेन्टर्स मध्ये खाउन झाल्यावर स्वतःचे ट्रे उचलण्याची पध्दत नाही .... पण घराच्या शिस्ती मुळे मी स्वतःचे ट्रे स्वतः उचलतो , बायकोच्या शिस्तीचा प्रभाव कमी असल्याने धुवून ठेवत नाही ......

आज सबवे मध्ये दुपारचे जेवण घेतल्यावर सवई प्रमाणे ट्रे उचलला आणि निघालोच .... तोच एका दाम्पत्याने मला त्यांच्या टेबल वरच्या ट्रे कडे बोट दाखवून म्हटले "प्लीज क्लीअर धीसला!".... मी त्यांच्या कडे पाहून हसलो व त्यांच्या टेबल वरचे ट्रे सुध्दा उचलत होतो, तोच सबवे मधला कर्मचारी "सोर्री सोर्री" करत ओरडत आला व त्या दाम्पत्यांना म्हणाला "सर इज आवर कस्टमर" आणि माझ्या हातातले ट्रे खेचून घेतले.... त्या दाम्पत्यांना मेल्याहून मेल्या सारखे झाले होते .... त्यांच्या "सॉरी" चा मान झुकवून स्वीकार केला व काढता पाय घेतला...

धावत धावत ऑफिस च्या वाशरूम मध्ये गेलो व ५ मिनिटे स्वतःला न्याहाळत होतो .... तेव्हा कळले माझ्या हिरव्या टी-शर्ट आणि ओफ्व्हाईट प्यांट ची करामत होती हि ......

आपला,

(समाजसेवक) विशुभाऊ

रविवार, ९ सप्टेंबर, २०१२

रॉ आणि आय.एस.आय

अब्बास अहमद हा टिपिकल पाकिस्तानी , पण सिंगापुरातला माझा मित्र ..... खरेतर माझ्या टीम मधला नसला तरी मी भारतीय म्हणून आत्मीयतेने (!) माझ्याशी मैत्री करायला आला .... अब्बास म्हणजे आर्धवट डोक्याचा पण लाघवी मुलगा .... पाकिस्तानी असून सुध्दा बराच ब्रॉडमाइंडेड आहे.... हा मला 'रॉ' अशी हाक मारतो, जणू काही ती शिवी आहे आणि म्हणून मी त्याला 'झाटू आय.एस.आय' आशी हाक मारतो (शिवी देण्या साठीच)..... कॉफी ब्रेक मध्ये आम्ही शाब्दिक भारत-पाकिस्तान लढाई खेळतो .... आणि आपणच जिंकलो असे समजून दोघेही कामाला लागतो ..... असे असले तरी आजून एक ब्रिटीश कलीग 'जॉन मेल्बॉर्न' आमचा कॉमन दुश्मन..... अब्बास हा पंजाबी ऍक्सेन्ट मध्ये उर्दू बोलतो आणि त्याच्या भाषेवर बॉलिवूड च्या सिनेमांचा बराच प्रभाव आहे आणि मी मराठी ऍक्सेन्ट मध्ये मुंबई मधल्या सर्व भाषांचा प्रभाव घेऊन हिंदी मिश्रित उर्दू बोलतो ....
त्या दिवशी आम्ही दोघे रॉ आणि आय.एस.आय लढाई लढाई खेळत होतो ...
अब्बास : दोस्त तू कितनाभी मना करे .... कारगिल तो हम ही जीत गये थे !!!
मी : भोसडिके इसका मतलब पाकिस्तान ने ऍटॅक किया था ये तुम काबुल करते हो !
अब्बस : नहीं नहीं मेरा मतलब ये था की ......
अब्बास शब्दांची सारवा सराव करत असतानाच ब्रिटीश बुलडॉग  जॉन तिथे आला ....
जॉन : यु पिपल आर फ्रोम डिफरन्ट कन्ट्रीज बट स्पिक सेम लॅन्गवेज ??
अब्बस : भेन के लवडे .... तेरे मां कि ......
जॉन माझ्या कडे बघून :  वॉट डिड हि से ???
मी : जाऊन तुझ्या बापाला विचार भेंशोद .....
आपला,
(रॉ) विशुभाऊ

सोमवार, २३ एप्रिल, २०१२

गुजराती बोली ... आणि रस्त्यावर होडी !!!

रविवारी भल्या पहाटे ११ वजता आहमेदाबाद मधल्या हरिवंश सिंह सिसोदियाचा फोन आला ...
" विशुभाई क्या छो ??? जल्दी ऑफिस आना !!!"
मी : " गांडा क्या हुआ ??? सुबह सुबह परेशान कर राहा है ?"
तो : " विशुभाई  मैने होडी ली !!! वोह दिखानी है !!!"
मी: " अबे construction का धंदा छोडके मच्छीमार बानोगे क्या ?"
तो: " मै क्यू construction का धंदा बंद करुंगा??? मैने होडी घुमने केलीये लिया !!"
मी: " कहा घुमोगे साबरमती मे ??"
तो: " विशुभाई  ... मैने होडी नही ओडी लिया है .... वोह चार कंगन वाली गाडी !!"
मी: " यडझव्या .... ऑडी बोलते है रे उसको .... !!!"
पुलंचा डायलॉग आठवला तेव्हा .... " मला फक्त नीट बोलता येत होतं... त्याला ती विकात घेऊन चालवता येत होती !!!"..........

आपला,
(होडी स्वार) विशुभाऊ

गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

तात्यासाहेब अडारकर

जैविकशास्त्राच्या पुस्तकातील माणसाच्या आकृती सारखी शरिरयष्टी, डोक्यावर टक्क्ल आणि हसरा चेहरा असे अमचे तात्यासहेब. वास्तविक पहाता तात्यासाहेब म्हणजे माझे office मधले boss, पण वागण्याने एका मित्रा पेक्षाही जास्त. कोणिही यावे आपली अडचण सांगावी व मदत घेऊन जावी असा परोपकारी माणूस... खरच ३०० वर्षातून एकदा असा माणूस जन्माला येतो, कदाचीत तुकाराम महाराजां नंतर तात्यासाहेब अडारकरच !

मासे आणि मास्याचे डोके खाऊन खाऊन झालेली तल्लख बुद्दी, अत्यंत महिनती स्वभाव आणि पराकोटीचे बियर-प्रेम.... हा माणूस खरेतर एका मराठी प्रतिभावंत कूटूंबात जन्मला... आपली प्रतिभा त्याने मदिराप्रेमी साहित्य लिहीण्यात मार्गी लावली. बियर पिण्याची मजा तात्यासाहीबांबरोबर जी आहे ती खुद्द मल्ल्याबरोबर फुकट्ची पिण्यात सुध्दा नाही..... तात्यासाहेब जेव्हा टेबलवर बसतात तेव्हा बियर पण आनंदाने फेसाळते, सोनेरी रंग आजून उजळतो आणि स्वाद अहा! इंद्राचा अमृतप्याला पण झक मारतो..... तात्यांचे नेहमीचे एक वाक्य आहे’जगात बियर हिच एक अशी गोष्ट आहे की ती पहिल्या घोटापासून शेवट्च्या घोटापऱ्यंत तशीच आणि सुंदर लागते!’ म्हणूनच तात्यांबरोबरची बियर कधीच संपू नये असे वाटते....

"तात्या माझा घरचा computer बंद पडला!" , " तात्या थोडे पैसे पाहिजे आहेत!" , "तात्या Data-center down आहे, client पेटला आहे!", "सर, मला उद्या बयको बरोबर जायचे आहे, माझे office चे काम तुम्ही कराल का?" ...... वगैरे कोणते ही प्रश्न असोत, तात्या सगळ्याला तयार.... ’नाही’ हा शब्दच मी कधी ऎकला नाही त्यांच्या कडून... त्या माणसाच्या दृष्टीत कोणीच वाईट नाही, सगळे चांगलेच आणि सगळ्यांना मदत करणे ह्यांचे आद्यकर्तव्य!

मागील महिन्यात माझे job profile बदलल्याने तात्यांना सोडून मला जावे लागले... उगाच डोळे पाणावले.... खरच अशा व्यक्तीच्या सान्निध्यात येण्यासाठी साता जन्माची पुण्यायी लागते !!!

आपला,
(हळवा) विशुभाऊ