माणूस आणि त्याचे मन , हा वर्षानु वर्षे न सुटलेला गुंता व तेच मन ताब्यात ठेवण्यासाठी माणसानेच बनवलेली चाकोरी , धर्म बंधने वगैरे वगैरे. ह्याच मनाचा एक भाग म्हणजे सध्या गाजत असलेला कलम ३७७ म्हणजेच समलैंगीकता. झिरो डिग्री प्रोडक्शन चे गौतम परब निर्मित नाटक 'टुगेदर' म्हणजे हाच विषय.
ह्या नाटकात दोन लेस्बियन मैत्रिणी, त्यांचे हळुवार संबंध व त्यांची मानसिकता फार सुंदर प्रकारे खुलवून दाखवलेली आहे. हे नाटक म्हणजे फक्त समलैंगीकता नसून चाकोरी बाहेर विचार करणार्याचा व स्वतः चे अस्तित्व शोधणार्या एका व्यक्तीचा लढा आहे. विनी ह्या पत्राला स्वतःला सिध्द करण्यासाठी काय काय करावे लागते आणि तिला आलेले अनुभव, हे नक्कीच हृदयाला हात घालून जातात.
मी पाहिलेले 'टुगेदर' नाटक हे प्रायोगिक नाटक होते, पण हे नक्कीच 'व्हाईट लिली' किंवा तत्सम नाटकाच्या बरोबरीचे होईल ह्यात तुसभर सुद्धा संदेह नाही.
आपला,
(नाटकी) विशुभाऊ