हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

गुरुवार, ३१ डिसेंबर, २००९

टॅगी टॅगी....

कांचन ताईने टॅगले... नंतर विरू मग सिध्दार्थ, सगळेच टॅगी टॅगी खेळायला लागले... मला कळायला थोडा वेळ लागला ... पण शेवटी मी पण टॅगी....


1. Where is your cell phone?
कानाला आहे.

2. Your hairs?
माझे पांढरे झालेले केस मला गर्वाने फुलवतात आणि बायकोला चार-चौघात लाजवतात.

3. Your Mother?
प्रेमळ

4.Your Father?
शांत

5. Your favorite food?
मी शुध्द मांसाहारी आहे.

6. Your dream last night?
माझी Phd पुर्ण झाली.

7. Your favorite drink?
व्हिस्की ने लुटा मुझे , रम में क्या दम था ????? आपनी नय्या वहा डूबी जहा बियर का ड्रम था !!!!!!!!

8. Your Dream/Goal
सर्व विश्वात एकसंग operating system स्थापित करणे ( ह्याला मराठीत Universal Operating System म्हणतात.)

9. What room you are in?
अभ्यासाच्या खोलीत

10. Your hobby?
थोडे थोडके छंद असतील तर ना..... मुळात छंदिष्टच आहे मी ;-)

11. Your fear?
मर्द को डर नही लगता... हां कभी कभी घाबरताय !!!!!

12. Where do you want to be in next 6 years?
पुढील ६ वर्षांचे माहीत नाही... पण येत्या ६ महिन्यात इस्राईल, जॉर्डन व इजिप्त ला बायकोबरोबर जाण्याचा बेत आहे (व्हिजा मिळाला तर! आणि हो पैसे पण..).

13. Where were you last night?
गोड स्वपनात

14. Something you aren't diplomatic?
जे काही आहे ते तोंडावरती... नाही तर फाट्या वर.... डिप्लोमॅटीक होणे माझा स्वभाधर्म नाही.

15. Muffins?
कालखंडा बाहेरील प्रश्न.

16. Wish list item?
बिचारा देव थकला माझी लिस्ट बनवून......

17. Where did you grow up?
आईच्या पंखांखालीस व बाबांच्या कडेवर

18. Last interesting thing you did?
लग्न !!! त्या नंतर interesting  गोष्टींचा शेवट.... ;-)

19. What are you wearing?
वल्कले नेसणाऱ्यातला मी नाही.....

20. Your TV?
कार्टून नेटवर्क....

21. Your pets?
नाही.

22. Friends?
माझी बायको माझी सगळ्यात जवळची मैत्रीण.... किंबहूना आधी मत्रीणच होती....

23. Your life?
इनकंप्लीट विदाउट वाईफ.

24. Your mood?
झकास.

25. Missing someone?
हो..............

26. Vehicle?
मारुती अल्टो

27. Something you aren't wearing?
साडी...

28. Your favorite store?
कोणतेही पुस्तकालय...

29. Your favorite color?
लाल..

30. When was the last time you laughed?
काही मिनीटां पुर्वी.

31. Last time you cried?
’दमलेल्या बाबाची कहाणी...’ हे गाणे ऎकल्यावर.

32. Your best friend?
माझी सगळ्यात जवळ्ची मैत्रीण म्हणजे माझी बायको व सगळ्यात जवळचा मित्र प्रसाद

33. One place you go to over and over?
पुणे आणि कोल्हापूर

34. One person who mails me regularly?
कमीत कमी १०० जण आहेत... आजकाल मलाच वेळ नाही मिळत...

35. Favorite place to eat?
आईच्या हातचे जेवायला कोणतीही जागा चालते....

आता मी सौरभ , आनंद, हर्षल, मनमौजी, महेंद्र ,  ना आणि सर्व वाचकाना टॅगतो....

आपला,
(टॅगोरी) विशुभाऊरविवार, २० डिसेंबर, २००९

महाराष्ट्राचे द्विभाजन - त्रिभाजन.....


तेलंगणा नंतर पुन्हा स्वतंत्र-विदर्भ हा मुद्दा ऎरणीवर आला. वितरीत प्रशासना मुळे नक्की कसा फायदा कोणा एका प्रदेशाला होणार किंवा तोटा होणार ह्याचा ठोकटाळा लावणे माझ्या बौद्धिक कुवतीच्या पलिकडचे असल्या मुळे मी ह्या विषयावर चार-चौघात आपले तारे तोडत नाही; पण काही दिवसांपुर्वी बाबासाहेबांचा ’महाराष्ट्राचे त्रिभाजन’ हा प्रबंध वाचला .... त्या वर हा लेख.

बाबासाहेबांच्या प्रबंधनातला प्रमुख मुद्दा हा मराठी लोकांच्या प्रगती साठी जस्तीत जास्त नेते देणे हा होता.... म्हणजे समजा महराष्ट्राचे तीन भाग केले तर एकुण तीन मराठी मुख्यमंत्री व उप-मुख्यमंत्री मराठी जनतेला मिळतील. खरे सांगायचे तर ह्याने काय साध्य होणार हे मला अजिबात कळले नाही, एक मुख्यमंत्री समजा ५ वर्षात ३०० कोटी कमवतो तर तिन मुख्यमंत्री १००-१०० कोटी कमवतील. आता ह्यात फक्त दोघांचा फायदा होऊन तिसऱ्याला २०० कोटींचे नुकसान दिसते, व बाकी सामान्य जनता जैसेथे !! ............

’नाशिक च्या मराठी माणसाला कोकणी माणसा बद्दल काय अपुलकी?’ हा बाबासाहेबांचा मुद्दा मला मनोमन पटला पण म्हणून काय वेगळे राज्य करायचे???? , अता मराठी माणसाला बिहारी बद्दल अपुलकी नसते म्हणून वेगळे राष्ट्र करायचे का???... कदाचीत मी रणदिवे असल्याने थोडाफार ’कम्युनीस्ट’ आहेच व मला हे कधीच पटणार नाही.....

त्यादिवशी कोणितरी सांगत होता की विदर्भातले शेतकरी आत्महात्या करतात त्याला सरकारचा विदर्भा च्या बाबतितला निष्काळजीपणाच कारणीभुत आहे... अरे तू जे आमदार-खासदार निवडून दिलेस ते काय .....???? की ते फक्त स्वतंत्र ( आताही विदर्भ पारतंत्रात नाही) विदर्भा नंतरच काम करणार????

कोणतेही मुद्दे हे खंडी करणाने सुटणार नसून , केवळ आपापसातले राजकारण, व हेवेदावे वाढवणार आहे. मला माझ्या विवीधतेने नटलेल्या संयुक्त महाराष्ट्राचा अभिमान आहे व तो संयुक्त ठेवण्यासाठी मी माझ्या शरिरातल्या शेवट्च्या रक्तथेंबा पर्यंत लढा देईन.....

आपला,
(संयुक्त-मराठी) विशुभाऊ.

शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २००९

कसाब ला मृत्यूदंड कसा द्यावा ?

दोस्तांनो,

आज २६/११ च्या पार्श्वभुमीवर मी, बाळासाहेबांनी आणि तात्यासाहेबांनी बऱ्याच वेळ कसाब ला फाशी सारखे सुखासुखी मरण न देता कशा प्रकारे तडपवून तडपवून मारावे ह्या वर मंथन केले... कोणतीही मनाला शांती देणारी पध्दत मिळाली नाही....
कृपया आपणास कोणतीही पध्दत सुचवायची असल्यास कळवावे...

आपला,
(पछाडलेला) विशुभाऊ

बुधवार, ११ नोव्हेंबर, २००९

गुरुवार, ५ नोव्हेंबर, २००९

देश आणि धर्मं

काही कट्टर  मुसलिम संघटणांनी घातलेला  ' वन्दे मातरम' चा वाद वाचला आणि डोके फिरले .... भोसडिच्यानो देशा आधी तुमचा धर्मं येणार असेल तर तुम्हाला देशद्रोही बोलले पाहिजे .... जा न मग इथून जिथे वन्दे मातरम बोलावे नाही लागणार तिथे .... ज्याच्या मानत देशा आधी धर्म येतो तो देशाद्रोहिच आहे मग तो मुसलिम असो की हिन्दू ....
आपला,
(देशाभिमानी) विशुभाऊ

रविवार, २५ ऑक्टोबर, २००९

भुताटकी - भाग १

आमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरले, तेव्हा बाबांनी नविनच बनलेल्या गगनचुंबी 'शितलदर्शन'नावाच्या इमारतीत ७ व्या मजल्यावर घर घेतले.

शितलदर्शन जिथे बांधली आहे त्या भागाला पुर्वी '७ माड'असे बोलत व तिथे कैद्यांना फाशी दिली जात असे. सात-माडला भुत असतात अशी गावकऱ्यांची श्रध्दा असल्याने दिवसा ढवळ्या पण तिथे कोणी फिरकत नसे व चुकून मुले खेळता खेळता गेलीच तर ते बाधा घेऊन येत असत!.. अ्शा ह्या ७-माड मघ्ये बांधलेल्या इमारतीच्या ७व्या मजल्या वरचे ७वे घर बाबांनी विकत घेतले.....

माझे बाबा मुळातच बेडर स्वभावाचे, व त्यामूळे त्यांना ह्या गोष्टींचा काही फरक पडत नव्हता... पण माझी आई तितकीच भित्र्या स्वभावाची, म्हणूनच कि काय बाबांनी आईला त्या जागेचा इतीहास काहिच सांगितला नव्हता.... लग्ना नंतर सुरवातीला आई-बाबा तिथे न रहता वाड्यावरच रहात होते... वर्षा दिड वर्षात माझ्या जन्मानंतर आम्ही तिघे शितलदर्शन मध्ये राहिला गेलो आणि ते थरारक नाट्य सुरू झाले...........

आई ला घरात काम करताना सारखे अजुन कोणी बरोबर असल्याचा भास होत असे; नविन घर आहे त्यामुळे होत असेल असे वाटून काही दिवस चुप्प बसली.... पण नंतर मी जेव्हा घरात घाबरू लागलो ओरडू लागलो , तेव्हा आईचा विश्वास बसला की काहितरी गोंधळ आहे.... त्यातच मी डायरीयाने आजरी पडलो व हॉस्पिट्ल मध्ये होतो, तेव्हड्या काळात ह्या विषयावर पडदा पडला. एकमहिन्या नंतर जेव्हा मला घरी आणले त्याच रात्री आईने बाबांना ही गोष्ट सांगितली.... व बाबांनी ती हसण्यावारी नेली.... थोड्या वेळाने बाबा धुतलेले कपडे वाळत घालत होते तेव्हा आई मागुन आली व पुन्हा तोच विषय काढून बोलू लागली, व बाबा आईची समजूत घालत होते आणि तितक्यात आतून आईचा आवाज आला " अहो, कोणाशी बोलता आहत ?" बाबांना नखशिकांत शिरशीरी गेली व बाबांनीमागे वळून पाहिले तर कोणीच नव्हते आजुबाजूला.......

आता बाबांचा पण विश्वास बसला होता की कहितरी गोंधळ आहे!... ते पण शहारले.... त्यानी आईला वचन दिले की आपण लवकरच दुसरे घर घेऊ.............. आता बाबा कामवर गेल्यावर आई मला कुशीत आणि स्वतःचा जिव मुठीत घेऊन बसत असे, कधी संध्याकाळ होते आणि बाबा घरी येतात त्याची ती वाट पहात असे........ घरा मध्ये भांडी पडणे, खिडक्यांच्या काचा फूट्णे, आवाज येणे, सारखी प्रेतयात्रा दिसणे हे प्रकार चालूच होते .....

एकदा माझी मावस बहीण आमच्या कडे राहीला आली होती.... दुपारी माझ्याशी खेळता खेळता ती जोरात किंचाळली तेव्हा आईने धावत येऊन विचारले की काय झाले?, त्या वर ती ने सांगितलेली गोष्ट ऎकून आई थंडच पडली... तीला एक म्हातारी बाई दिसत होती व ती जवळ बोलवत होती... आईने लगेच आम्हाला घेतले व तडक वाड्यावर नेले... !

बाबांनी काही दिवसात कळव्या मध्ये दुसरा फ्लॅट घेतला , आमचे सगळे सामान तिथे शिफ्ट केले फक्त आईच्या आग्रहाने बाबांनी आमच्या कुलस्वामीनीची कालिकामातेची तस्बिर दारावर ठेवली.... ती रात्र आमची शितलदर्शन मधली शेवटची रात्र होती दुसऱ्या दिवशी आम्ही नविन जागेत राहिला जाणार होतो... त्या रात्री आम्ही झोपलेलो असताना बाबांना कोणीतरी डिवचत आसल्या सारखे वाट्ले , म्हणून उठून पाहिले तर एक म्हातारी बाबांना डिवचत होती व रागा रागाने बघत होती, बाबा घाबरले पण स्वतःला सावरत त्यांनी आम्हा सगळ्यांवर हात ठेवला व त्या म्हातारी वर ओरडले व तीला चालते होण्यास सांगितले... त्या म्हातारी ने आम्हाला मारण्याचा पण केला होता पण बाबा पण हट्टाला पेटले होते.... ते तिच्या शी तावातावाने भांडत होते... तिच्यावर ऒरडत होते.. तिला शिव्या देत होते... ह्या सगळ्या आवाजात आईला जाग आली व ऊठून तिने जे दृष्य पाहिले त्याने तिची गाळण झाली... त्या म्हातारीने आई कडे मोर्चा वळवला... ती आईला सारखी दरवाज्यावरची देवीची तस्बीर काढायला सांगत होती, व बाबा तीला आडवत होते... म्हातारीला भिती दाखवत होते... ह्या सगळ्या प्रकारात जेव्हा पहिला कोंबडा अरवला तेव्हा ती म्हातारी गायब झाली व आई-बाबा आम्हाला घेऊन कळव्याला आले .... त्या नंतर आई-बाबांनी परत कधीच त्या इमारती कडे वळून पाहिले नाही....

आजही जेव्हा मी वाड्यावर जातो तेव्हा लांबून ती इमारत बघतो... ती तशीच भकास अजूनही उभी आहे !!!!

आपला,

(भुताड्या) विशुभाऊ

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २००९

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

नमस्कार,

तुम्हांला व तुमच्या सर्व कुटुंबीयांना विशुभाऊ रणदिवे व परिवारातर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

ही दीपावली तुम्हाला सुख-समाधानाची, आरोग्याची, ऐश्वर्याची ठरो व तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होवोत, अशी श्री स्वामीचरणी प्रार्थना.

आपला,
(शुभचिंतक) विशुभाऊ

शनिवार, १० ऑक्टोबर, २००९

बाबा

    आज सिध्दार्थ च्या सांगण्यावरून पुर्वी न उमगलेल संदिप चे " दमलेल्या बाबाची कहाणी" हे गाणे आई ऎकले, खरच काळीज फाडणारे गाणे आहे. खरेतर हे गाणे म्हणजे संदिप ने स्वतःच्याच गाण्याला "दूरदेशी गेला बाबा..." ला दिलेले उत्तर.... आता बाबा झाल्यावर त्या पद्यातील दर्द, आणि आश्रू कळले....

    आज काल घरातील आई आणि बाबा हे दोघेही नोकरी करतात आणि त्यामुळे ज्या बाळाला जास्त गरज असते, त्यालाच वेळ देऊ शकत नाही.... संदिप च्या कवितेतली छोटी मुलगी ,आई वडिलांच्या आठवणीने व्याकूळ झालेली.... बिचारी एकटीच घरी...

        कसा चिमणासा जीव , कसाबसा रमवला
        चार भिंतित धावुन दिसभर दमवला
        ' आता पुरे ! झोप सोन्या..' कुणी म्हणतच नाही ॥
लहान असताना, माझी आई दुपारी मला जवळ घेउन ’आता पुरे ! झोप सोन्या...’ बोलायची.... पण माझ्या सोनाला तर मी पाळणा घरात ठेवले !

        कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी ?
        कोणी बोलायाला नाही...कशी व्हावी कट्टी-बट्टी ?
        खेळ ठेवले मांडून ... परि खेळगडी नाही ॥
शाळेला सुट्टी म्हणजे मजा असे वाटणारा मी... पण माझी पोर सुट्टी च्या नावने खिन्न होते कारण.. तेच "खेळ ठेवले मांडून ... परि खेळगडी नाही"...


        दिसे खिडकीमधुन जग सारे , दिशा दाही
        दार उघडुन तरी तिथे धावायचे नाही
        फार वाटे जावे परी - मुठीमध्ये बोट नाही ॥
मी लहान असताना वाटेल तेव्हा आई-बाबांचे बोट धरून बाहेर फिरायला जात असे, पण माझ्या छोटीच्या मुठीमध्ये मात्र माझे बोट नाही..

        नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही
माझ्या पोरीच्या डोळी झोप दाटली आहे.... आणि मी द्रुष्ट घरी नाही.....

ह्या सर्व दिवसात स्वतःच दमून भागुन माझी परी झोपली... आणि मी घरी येतो व चालू होते "दमलेल्या बाबाची कहाणी"......

संदिप तुला त्रिवार सलाम !!!!!!!!

आपला,
(एक बाबा) विशुभाऊ..

रविवार, ४ ऑक्टोबर, २००९

निवड्णूक !

    ह्या निवडणूका आल्याकी मला जरा धडकीच भरते, जस जशी निवडणूकेची तारिख जवळ येते तस तशी हि ५ वर्ष बॅनरवर दिसणारी साहेब, नाना, तात्या, बंटी, भाऊ, कार्यसम्राट, ह्र्दयसम्राट वगैरे मंडळी आमच्या घरची धूळ झाडायला येतात. कोण जाणे कसे पण येताच नावाने हाक मारून आदबिने नमस्कार सुध्दा करतात, व मी नियमीत पणे त्यालाच कसे मत देत आलो आणि येणार हा प्रत्येकाला विश्वास देतो.....

    दर निवडणूकीला घरी आलेल्या उमेदवाराला मत देण्याच्या आश्वासनांची टेप माझी चोख पाठ असते, व त्यात (टेप वाजवण्यात) मी कधीच चुकत नाही. पण गेल्या महानगर पालिकेच्या निवडणूकांच्या वेळी मोठा गोंधळ झाला, त्याचे झाले असे की आमच्या मतदार संघातल्या धडाडिच्या आणि तरूण कर्यकर्त्या सुंदराबाई ( sorry ताई) भरदुपारी आमच्या घरी आपल्या पाळलेल्या इमानदार लोकांना घेऊन आल्या. मी नुकताच ऊठलो होतो आणि घरात कोणिही नसल्याने स्वतःच चहा बनवण्याची तयारी करत होतो. ’आल्या अथित्या मुठ्भर द्याया मागे पुढती पाहू नको!’ ह्या आनंद फंदिंच्या फटक्याला जागुन त्यांना चहा विचारला व ते सगळे जण एक सुरात ’हो’ बोलले.... आता झाली ना पंचाईत ! दुध फक्त २ कप चहाचे आणि हे बाई व इमानदार पकडुन १५ जण... त्यातल्या त्यात एक गरिब इमानदार पकडला व त्याला पैसे देऊन बिल्डींग खालच्या भट कडून १६ कप चहा मागवला.... आता ह्या बाईंनी ताबा घेतला व आपण केलेल्या कामाची उजळणी चालू केली, माझ्या घराचा हॉल म्हणजे व्यासपिठ झाले होते... ही बाई आणि माझ्या पोटातले कावळे एकजात एकसुरात ओरडत होते... तितक्यात तो गरिब इमानदार आला व माझी त्या भाषणातून सुटका झाली... मी त्या बाईंना विश्वास दिला की हे मत तुम्हालाच मिळणार , तसेही आपले संबंध (वैयक्तिक) खुप जुने आहेत... त्यावर बाई खुश होऊन निघुन गेल्या...

    सुंदराबाई जातात न जातात तोच त्यांचे खंदे विरोधक अण्णासाहेब दरवाज्यात उभे !..... आता हे अण्णासाहेब म्हणजे तेव्हा होणाऱ्या आणि आताच्या झालेल्या सासरचे , मान ठेऊन त्यांना पण आत बोलवले व त्यांनी लाजेखातर का होईनात पण चहा नाही सांगितला.... परत तेच बोलणे चालू झाले... ह्यांनी गटार साफ केली तर त्यांनी कचरा कुंड्या लावल्या... ह्यांनी स्मशानाची जागा वाढवली तर त्यांनी विद्युतदहनीका लावली... मी ह्यांना पण मत देण्याचे आश्वासन देतच होतो की सुंदराबाई त्यांचा राहिलेला मोबाईल घ्यायला आल्या!!!.... खप्प... माझी बोलतीच बंद झाली...

बाई गरजल्या : ’अण्णासाहेब, विशुभाऊ फितणार नाहीत ! आमचे संबंध जुने आहेत !’
अण्णासाहेब:  संबंध ?? बाई आमच्या होणाऱ्या जावयावर नसते आरोप सहन नाहि करणार!! याद राखा !!!
सुंदराबाई : काय हो ...... मतदान करणे हा काय नसता आरोप आहे का??? काल रात्री कुठे होतात हे मला बरोबर माहित आहे ....
अण्णासाहेब: @#%^$&$$%&%*
सुंदराबाई: *^^*(%$#%

मी डोक्याला हात लावला.... त्यांना दोघांना शांत करत मी सांगितले " तुम्ही दोघांनी सुध्दा समाजासाठी खुप काम केले आहे !, पण दुर्देवाने मी उद्याच २ महिन्या साठी परदेशी जात आहे, तेव्हा कृपाकरुन भांडण थांबवा, व कोणीही निवडून आले तरी मला आनंदच आहे!" त्यावर दोघेजण मला शिव्याशाप देत निघुन गेले, व माझी सुटका झाली.....

आपला,
(मतदाता) विशुभाऊ

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २००९

गांधी आणि मी !

हा लेख चालू करण्या आधीच मी स्पष्ट करतो की मी पुर्णतः जहालवादी आहे, कोणी कानाखाली वाजवणे सोडाच, आडवा पण आला तरी हात-पाय तोडून त्याच्या बायका पोरांना धंद्याला लावणारा मी.... तरी गांधीजींना शिव्या देणाऱ्यातला मी नाही !!!!

गांधी हे खरच महत्मा होते, मी नक्की कबूल करतो की देशाची ही स्थिती होण्या पासून ते वाचवू शकले असते, देशाची फाळणी वाचवू शकले असते...किंवा सर्व मुसलमानांना पाकिस्तानात हकलवू शकले असते. गांधीजी ना ह्या देशाच्या संस्कारावर भरपूर विश्वास ! त्यांना वाटले की सगळे मुसलमान वाईट नाहीत, आपल्याच हाडामासाचे.... पण त्यांना हे कसे कळले नाही की मुसलमान देशाच्या स्वातंत्र्यासाठी कधीच लढले नाहीत ते लढले ते खलीफ़ा साठी!!

तरी गाधींचे काही गुण आहेत ते आपण मानलेच पाहिजेत :

१) बोलणे तसे रहाणे, तसे वागणे.
२) देशासाठी ( भले त्यांना तसे वाटत होते) अखुड कपड्यांमध्ये संपुर्ण जिवन काढणे.... (थोर विचार)
३) कितीही झाले तरी डोके शांत ठेवणे... ( हे माझ्या सारख्या जहालवाद्यांना साता जन्मात शक्य नाही)
४) लोकांना संघटीत करणे !!! व देशप्रेम जागवणे....

आज जेव्हा मी इतस्थः बघतो तेव्हा मला असा नेता कुठेच दिसत नाही.... असो पण आज गांधी जयंती साजरी करायची , अजून काही करूपण शकत नाही... ड्राय डे आहे !!!

आपला,
(ड्राय-डे त्रस्त) विशुभाऊ

गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

तात्यासाहेब अडारकर

जैविकशास्त्राच्या पुस्तकातील माणसाच्या आकृती सारखी शरिरयष्टी, डोक्यावर टक्क्ल आणि हसरा चेहरा असे अमचे तात्यासहेब. वास्तविक पहाता तात्यासाहेब म्हणजे माझे office मधले boss, पण वागण्याने एका मित्रा पेक्षाही जास्त. कोणिही यावे आपली अडचण सांगावी व मदत घेऊन जावी असा परोपकारी माणूस... खरच ३०० वर्षातून एकदा असा माणूस जन्माला येतो, कदाचीत तुकाराम महाराजां नंतर तात्यासाहेब अडारकरच !

मासे आणि मास्याचे डोके खाऊन खाऊन झालेली तल्लख बुद्दी, अत्यंत महिनती स्वभाव आणि पराकोटीचे बियर-प्रेम.... हा माणूस खरेतर एका मराठी प्रतिभावंत कूटूंबात जन्मला... आपली प्रतिभा त्याने मदिराप्रेमी साहित्य लिहीण्यात मार्गी लावली. बियर पिण्याची मजा तात्यासाहीबांबरोबर जी आहे ती खुद्द मल्ल्याबरोबर फुकट्ची पिण्यात सुध्दा नाही..... तात्यासाहेब जेव्हा टेबलवर बसतात तेव्हा बियर पण आनंदाने फेसाळते, सोनेरी रंग आजून उजळतो आणि स्वाद अहा! इंद्राचा अमृतप्याला पण झक मारतो..... तात्यांचे नेहमीचे एक वाक्य आहे’जगात बियर हिच एक अशी गोष्ट आहे की ती पहिल्या घोटापासून शेवट्च्या घोटापऱ्यंत तशीच आणि सुंदर लागते!’ म्हणूनच तात्यांबरोबरची बियर कधीच संपू नये असे वाटते....

"तात्या माझा घरचा computer बंद पडला!" , " तात्या थोडे पैसे पाहिजे आहेत!" , "तात्या Data-center down आहे, client पेटला आहे!", "सर, मला उद्या बयको बरोबर जायचे आहे, माझे office चे काम तुम्ही कराल का?" ...... वगैरे कोणते ही प्रश्न असोत, तात्या सगळ्याला तयार.... ’नाही’ हा शब्दच मी कधी ऎकला नाही त्यांच्या कडून... त्या माणसाच्या दृष्टीत कोणीच वाईट नाही, सगळे चांगलेच आणि सगळ्यांना मदत करणे ह्यांचे आद्यकर्तव्य!

मागील महिन्यात माझे job profile बदलल्याने तात्यांना सोडून मला जावे लागले... उगाच डोळे पाणावले.... खरच अशा व्यक्तीच्या सान्निध्यात येण्यासाठी साता जन्माची पुण्यायी लागते !!!

आपला,
(हळवा) विशुभाऊ

सोमवार, २८ सप्टेंबर, २००९

विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा !

सोनेरी क्षणांचा सोबती विशुभाऊ रणदिवे कडून तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या सुवर्ण शुभेच्छा !!!!

आपला,
(सोनेरी) विशुभाऊ

रिक्षावाला

रिक्षावाला ह्या प्राण्याबद्दल मला अगदी लहानपणा-पासून चे कुतूहल. रिक्षावाला होणे हे सोप्पे अजीबात नाही!, त्यासाठी तुम्हाला गिऱ्हाईकाशी तुसड्या पणे बोलता येणे गरजेचे आहे, त्यात तूम्ही पुणेरी रिक्षावाले होऊ ईच्छीत असाल तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणचा लांबचा मार्ग माहीत हवा......

ह्या सर्व रिक्षावाल्यांमध्ये माझा संशोधनाचा रिक्षा व्यवसाय म्हणजे ’शेअर-रिक्षा’.... ठाण्या मध्ये ह्यांना ’शेअर ऑटोस’, नाशकात ’शेर रिक्शा’, पूण्यात ’टमटम’ तर कोल्हापूरात ’वडाप’ आणि बडोद्यात ’छकडा’ असे बोलतात !.

आता नाशिकचा रिक्षावाला म्हणजे एकदम राजेशाही व्यक्तीमहत्व ! गिऱ्हाईकाला आपली गरज असुन आपल्याला काडी मात्र गरज नसल्याचा त्याचा ठाम विश्वास असतो, पण पुणेरी रिक्षावाल्या पेक्षा ह्याची भुरटेगिरी जरा वेगळी असते... तो कुठेही तुम्हाला गोल गोल फिरवत न बसता सरळ-सोट रस्त्याने घेऊन जतो व वाट्टेल तो भाव सांगतो. एकदा मी महामार्ग ते PTC (पोलीस ट्रेनींग कॅंप) पर्यंत गेलो असता त्याने मझ्याकडून चक्क १२० रुपये घेतले... वास्तविक पहाता मी ठाण्यामध्ये ह्या अंतरा साठी जस्तीत जास्त ३० ते ३५ रुपये दिले असते...

बडोद्याचा रिक्षावाल्यावर चित्रपट काढता येईल इतका मोठा विषय आहे हा... ईथले रिक्षावाले पायाने सिग्नल देतात ..... काय बोलणार ???

कोल्हापूर हे माझे आवडते शहर म्हणून नाही पण कोल्हापूर चा रिक्षावाला हा खरच ईतरांच्या मानाने सज्जन !! ’चलाकी हे ईथे ढ्यांग भर अंतरावर’म्हणून लगेच आदबिने पण आपल्या तोऱ्यात नेणार .... कोल्हापूर ची वडाप ही तुम्हाला एका टोका पासून दुसऱ्या टोका पर्यंत अगदी ५ रुपयात सोडते... आणि मजेची गोष्ट ही की ठाण्यात माझ्या सारखे ३ लोक रिक्षात बसले की दाटिवाटी होते, पण कोल्हापुरात माझ्यासारखे ४ लोक मागे व ३ लोक पुढे बसून प्रवास करतात.... खरच ’नाद नाही करायचा !’

आपला,

(नादखूळा) विशुभाऊ

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २००९

सर्कस

आज म.टा. वर "द ग्रेट महाराष्ट्र विधानसभा सर्कस!" हा लेख वाचताना खुप खळखळून हसायला आले.... खरच ही राजकारणी लोक पिंजऱ्यात कोंडलेल्या डुकरा सारखी वागतात !!!!

आपला,
(रिंगमास्टर) विशुभाऊ

सोमवार, २१ सप्टेंबर, २००९

रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा !

सर्व ईसलाम पंथीयांना रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा !

आपला,
(शुभेच्छूक) विशुभाऊ,

( भारतात राष्ट्र हाच धर्म आहे बाकी सर्व पंथ! परत ह्या वरून आमच्याशी वाद घालू नका !)

आपला,
(राष्ट्रप्रेमी) विशुभाऊ

शनिवार, १९ सप्टेंबर, २००९

मास्टर शहाण्या माणसाने निवडूंगाच्या फडात पाय टाकू नये !

पर्वा झालेल्या ’बा’चा-’बा’ची नंतर, मराठी राजाने ठरवले जाऊदे करुन टाकू फोन मास्टरांना.....

राजा: नमस्कार मास्टर,
मास्टर: बोल बेटा, कशी काय आठवण काढलीस आज?
राजा: मास्टर, किती दिवस जुने घेउन बसणार आहत? वाघोबा म्हातारे झालेत हो ! या ईथे
मास्टर: असे नसते रे बेटा, आम्ही जुने शिकारी आहोत, पोरगा मनी-माऊ असला तरी छावाच म्हणायचा....
राजा: छावा नाय तो !!! सगळा निवडूंगाचा फड झाला आहे, आणि मास्टर शहाण्या माणसाने निवडूंगाच्या फडात पाय टाकू नये !
मास्टर: नाही रे बाळा, जाऊ दे !! तू लढ मी आहे तुझ्या पाठीशी.... नंतर चे नंतर बघू !!!

राजा आणि मास्टर: जय महाराष्ट्र!!!!


आपला,
(कवडा) विशुभाऊ,

नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा

सर्व वाचकांना नवरात्रीच्या हार्दिक शु्भेच्छा !!!

आपला,
(शुभेच्छूक) विशुभाऊ

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २००९

चकोर चकोर तर मी चतकोर !!

लोक म्हणतात की आम्ही चकोर style लिहीतो .... आहो चकोर आम्हाला गुरूवर्य आहेत , हे नक्की की आमचे लिखाण हे त्यांच्या लिखाणाने प्रभावित असते... पण आम्हाला त्यांच्या नखाची पण सर नाही!!

म्हणूनच " चकोर चकोर तर मी अगदि चतकोर !!!!"

आपला,
(चतकोरी) विशुभाऊ

मंगळवार, १५ सप्टेंबर, २००९

राजा आणि भैया !

सकाळी भैया जाम कंटाळलेला होता, काय करावे समजत नव्हते. एक महिन्यावर निवडणूका आल्या तरी सगळी कडे कसे शांत शांत होते, मराठी राजा पण बरेच दिवसात आळसावलेला आहे. लगेच भैयाला युक्ती सुचली, त्याने राजाला फोन लावला....

भैया : जय राम जी की राजा साहाब.
राजा : बोल रे भामट्या!, सकाळ सकाळी काय आठवण काढलीस ?
भैया : क्या राजा साहाब, एक महिना पे चुनाव है , और आप एकदम शांत हो ? कहि ऐसा तो नही की आप वापिस जाने वाले हो ?
राजा : अबे च्युते, तू तो कुच करता नही,आणि माझ्यावर आरोप करतोस, भडव्या राहिच आहे ना ईथे?
भैया : राजा साहाब, आपतो घुस्सा हो गये.... रुको कुच तो करता हूं... ताकी आपको माराठी लोगोंकेलीये काम करने का बहाना मिलजायेगा !
राजा : ठिक है... ह्याने मला परत वाघांची मते खाता येतील !!!
भैया : और इससे तो आपने 'हात और घडी' का ही तो फायदा है !!!!
राजा : हा हा हा !!!!

थोड्या वेळाने राजा TV लावतो , आणि बघतो तर काय?

भैयाने विधानसभे साठी ७० % जागा मागितल्या !!!! हा हा हा राजा खुष हुआ !!!

आपला,

(चाप्टर) विशुभाऊ

भैया हात पाय पसरी !

मी सहजा सहजी ब्लॉग वर लिहीताना कोणाचे नाव घेत नाही आणि शिव्या तर आजिबात नाही !!! पण आजची बातमी वाचून तळ पायाची आग मस्तकात गेली , तुम्ही पण वाचा आणि शांत बसा :

"मुंबईत ३५ जागा उत्तरभारतीयांना द्याः निरुपम" ( इथे पुर्ण बातमी वाचा )

अरे भाड्या लाज पण नाही वाटत कारे तुला??????

आपला,
(मराठी) विशुभाऊ

रविवार, १३ सप्टेंबर, २००९

ह्यो मालवण आपलाच असा !!

कोकण पुत्र काल जाम पेटला होता, बेवडे काकाला बडबडताना त्याने आपल्या बापाचीच जाम मारली.... आता तो तरी काय करणार fresher आहे ना, होत अस !!

त्याला माहित आहे ,काही झाल तरी " ह्यो मालवण आपलाच असा !!"

आपला,
(कोकणी) विशुभाऊ

मंगळवार, ८ सप्टेंबर, २००९

वडापाव


वडा पाव ही फ्क्त नाश्त्याची डिश नसुन एक संपुर्ण जेवण आहे.
आज मी आणि बाळासाहेब गुप्ते वडापाव खायला समोरच्या टपरी वर गेलो होतो व नेहमी प्रमाणे शिवसेनेला धन्यवाद देउन वडापाव खायला सुरुवात केली, व सहजच एक विचार मनात आला.... १९६७-६८ साली शिवसेनेनी हा वडापाव चालू केला, जर त्यांनी त्या वेळी ह्या वडापाव चे patent घेतले आसते तर?

मी : बाळासाहेब, १९६८ साली जर शिवसेनेने वडापाव चे patent घेतले आसते तर आज पक्षाचा खर्च असाच नीघाला आसता !
बाळ : नुसता खर्च काय विशुभाऊ? फक्त धमकी दिली आसती ना, की जा आज पासुन वडापाव बंद करु! तरी बिन-विरोध निवडणूक जिंकले आसते!

ह्या विनोदा खेरीज खरे सांगायचे म्हणजे आज हा वडापाव आपल्या जिवनाचा एक अविभाज्य घटक झाला आहे !

वडापाव जिंदाबाद !

आपला,
(वडापाव-खाऊ) विशुभाऊ

सोमवार, ३१ ऑगस्ट, २००९

१३ व्या विधानसभेचे तीन १३

१३ व्या विधानसभेची तारीख १३ ऒक्टोबर आली आहे..... अत्ता येणारे नविन सरकार महाराष्ट्राचे कसे तिन तेरा वाजवते ते बघायचे !!

आपला,
(दुरदर्शी) विशुभाऊ

सोमवार, २२ जून, २००९

गुजराती भूत !

काल संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोचलो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात घासावे लागतात त्या प्रमाणे रात्री झोपण्या आधी जेवावे लागते !!! आता ह्या नियमाचे पालन करण्या साठी मी जेवायचे ठरवले ......... काल होता रविवार म्हणजे मांसाहारच करावा लागणार होता ( नाहीतर मला जाती बाहेर केले असते !), म्हणून मी झकास पैकी कोंबडी भात मागवला व त्यावर आडवा हात मारला ... ह्या सगळ्या नंतर मला कधी डोळा लागला हेच कळले नाही ....... मध्यरात्री १२ वाजता एक पांढरा झब्बा लेंगा घातलेल्या माणसाने मला काठी ने डिवचून डिवचून उठवले , माझी तर तळ पायाची आग मस्तकात गेली ... 


मी : अरे भाड्या कोण रे तू ? आणि माझ्या रूम मध्ये कसा घुसलास ???? भाड्खाऊ साला.. हरामखोर ( मी जाम पेटलो होतो ) 
तो : हुं भूत छे !!! 
मी : त त प प .... हा हं क का काय प पाहिजे तुम्हाला ? 
तो : @#$#$%&*^%##^ ( तू इथे चिकन खाल्लीस ?) 
मी : हो हो सोर्री.... पण संपली काहीच शिल्लक नाही !!! 
तो : नालायका, ती शिल्लक असती तर तुला शिल्लक नसता ठेवला मी ...( हे सगळा तो गुजरातीतून बोलला ) 
मी : मला माफ करा !!! परत नाही खाणार इथे ! 
तो : खशिलच काय ? गळा दाबून तुला पण त्या कोंबडी सारखा हलाल करेन !!! 
मी : पण उद्या जेऊ काय ? 
तो : एक काम कर पुढे कोपर्या वर माझ्या मुलाची ( हिरेन गांधी ची ) खानावळ आहे तिथे गुजराती थाळी खा , आणि हो त्या शेजारच्या पटेल कडे नको जाउस हराम खोर आहे , मारून ५ वर्षे झाली आजून माझे घेतलेले पैसे नाही दिले त्याने ! 
मी : जी शेठ , उद्या तिथेच जेवेन !!!!!!!!!!! 
तो : आणि माझ्या मुलाला सांग, हिशोबात गोंधळ घालू नको माझे लक्ष आहे ! 
एवढे बोलून तो नाहीसा झाला ..... साला हा गुजराती भूत मेल्यावर पण धंदा नाही सोडत !!!!
तर मग आज हिरेन भाई कडे गुज्जू थाळी ... येणार का ??? भुताच्या पोराकडे जेवायला ??? 
आपला,
(डरपोक) विशुभाऊ !

बुधवार, १७ जून, २००९

आयुष्याच्या अल्बममध्ये

आमच्या तिर्थरुपानी पाठवलेल / खरडलेल काव्य आपल्या आस्वादासाठी !! आपला, (नम्र) विशुभाऊ


--


आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात
धन्यवाद
विकास रणदिवे
प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही. कधी ना कधी ते पळणार्‍याला गाठतातच
पळवाटा मुक्कामाला पोहोचवत नाहीत. मुक्कामाला पोहोचवतात ते सरळ रस्तेच ...


शुक्रवार, ५ जून, २००९

नकाशा !! छे चक्क फिरून बघा !!!

मित्रहो,
आपल्या आवडत्या Google ने काल google-maps मध्ये फार मोठी सोय वाढवली , Google Street View........ ह्या मध्ये आपण चक्क रस्त्यावरून फिरुन बघू शकतो , म्हणजे एकदा नकाश्यातून फिरून आलो कि रस्त्यावर चुकण्याचा प्रश्नच नाही ....
हे सगळ गुगल ला सुचत कस माहित नाही !!!! पुढे भविष्यात आजून काय काय जादूचे प्रयोग दाखवणार ते कदाचित देवाला पण नसेल माहित !!!!
गूगल च्या कर्तुत्वाला आणि बुद्धिमत्तेला त्रिवार सलाम !!!!!!!!!

आपला,
(गुगल प्रेमी ) विशुभाऊ

बुधवार, ३ जून, २००९

आँनलाइन आँपरेटिंग सिस्टीम !

शोधयंत्र प्रणालीतील इंद्रपद मिळवलेला Google Inc हा उद्योग समुह फार हुशार रीतीने आपली वाटचाल करतो हे सगळ्यांनाच माहित आहे . दोन वर्षां पूर्वी ह्या google ने आशी अफवा पसरवली कि , google लवकरच online operating system चालू करत आहे आणि त्याचे नाव GOOS ( google operating system) असेल.
आता ह्याचा परिणाम आसा झाला कि इतर स्पर्धक ह्या तंत्रज्ञानावर काम करू लागले !
काही असो , पण मला हा विचार खूप भावाला व मी सुद्धा ह्या तंत्रावर शोध करू लागलो , बर्येच दिवस eyeos.org ह्या open-source संघटने बरोबर घालवल्यावर काल मला अचानक G.ho.st हि online operating system मिळाली.
G.ho.st हि eyeos पेक्षा बरीच तयार system आहे , इथे फुकट खाते उघडल्यावर तुम्हाला 15 GB ची जागा मिळते त्यात email, documents, spreadsheets, presentations वगैरे उपलब्ध आहे. इथे तुम्हाला eyeos मध्ये जसे applications इनस्टैल  कराव लागत तस काही कराव लागत नाही. Zimbra वर आधारित email system आहे , त्यात तुम्ही तुमचे इतर मेल खात्यावरून POP3 किंवा IMAP करू शकता.
G.ho.st हि system उघडल्यावर तुम्हाला कोपर्यात GO आशी कळ मिळेल , हि windows मधील start ची किंवा KDE मधील K-Menu ची आठवण करून देते .
मला हे तंत्र खूप आवडले , आता लोकांना किती भावते हे लवकरच कळेल.

आपला,
(तंत्रज्ञ ) विशुभाऊ 

सोमवार, १ जून, २००९

राष्ट्रवादी चे घड्याळ
चहापान !

दिनांक ३० मे २००९ वेळ सकाळ ८.००

नोकर : वाहिनी साहेब , आज चहापान आहे .. आपले आणि विरोधक मिळून किती होतील हो ?

वाहिनी : गधड्या ! किती वर्ष वर्षात आहेस रे ? विरोधक बहिष्कार घालतात ... माहित नाही का ? उगाच अन्नाची नासाडी नको !

नोकर : जी वाहिनी साहेब !!!! ( एवढे बोलून शेवटचा मुजरा केला )

वेळ दुपारची , चहापानाची वेळ झाली आणि घामा घूम नोकर ओरडत आला .........
नोकर : वाहिनी साहेब , धोका झाला धोका !!!!!!!! विरोधक आले हो धोका झाला !!!!!!!!! आता काय ?
वाहिनी : ठीक आहे , घाबरू नकोस .... चहा कटिंग कर आणि पँटिस अर्धे वाटून दे .... लवकरच निवडणुका आहेत , वाटून खाऊ !

आपला ,
(खट्याळ) विशुभाऊ ! 


रविवार, ३१ मे, २००९

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय भाग-2

आम्हाला आलेल सुन्दर पत्र, ईथे प्रकाशित करत आहोत !
आपला, (नम्र) विशुभाऊ ___________________________________


- अमेय गोगटे

महेश मांजरेकरांचा ' मी शिवाजीराजे... ' आपण सगळ्यांनी पाहिला आहेच. त्यातली शिवाजी महाराजांची एन्ट्री आठवा... ' लाज वाटते मराठी म्हणून जन्माला आल्याची,  हे दिनकरराव भोसलेंचे हताश, हतबल उद्गार ऐकून व्यथित झालेले छत्रपती शिवाजी महाराज, आपले मावळे पाठवून दिनकररावांना रायगडावर बोलावून घेतात आणि त्यांची चांगलीच कानउघाडणी करतात.

आता ' पार्ट II' मध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तर महाराज त्याहूनही अधिक व्यथित झालेत आणि चिडलेतही. (का ?, ते आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे.) तर, यावेळी त्यांनी आपले दोन मावळे ' मातोश्री ' वर आणि दोन ' कृष्णकुंज ' वर (किंवा कृष्णभुवन) पाठवले आणि ते उद्धवसाहेब आणि राजसाहेबांना रायगडावर घेऊन गेले.

कट टू रायगड...

(महाराजांचा दरबार भरलेला. राज आणि उद्धव झोपेतून जागे होतात. एकमेकांकडे पाहतात आणि लगेचच तोंड फिरवतात. पुढच्याच क्षणाला समोर साक्षात छत्रपतींना पाहून दोघंही थक्क होतात. बाळासाहेब आणि बाबासाहेबांनी (पुरंदरे) शिकवल्याप्रमाणे दोघंही लवून महाराजांना मुजरा करतात.)

उद्धव-राज एकत्रः महाराज आपण ?
महाराजः होय...मी !
राजः महाराज, आपण स्वतः येण्याची तसदी घेतलीत ?
महाराजः न येऊन कसं चालणार होतं ?
उद्धवः का महाराज ? आमचं काही चुकलं का ?
महाराजः चुकलं ? अहो, घोडचूक झालेय तुमच्याकडून. भाऊबंदकीचा शाप आपल्या महाराष्ट्राला नवा नाही. मात्र, तुमच्या भाऊबंदकीचा त्रास माझ्या मराठी बांधवांना, माता-भगिनींना भोगावा लागतोय. म्हणूनच तुम्हा दोघांना इथे बोलावून घेतलंय आम्ही...
राजः नेमकं काय झालंय महाराज ?
महाराजः काय झालंय ? दो ही मारा, पर सॉल्लिड मारा, हे तुमचे उद्गार ऐकलेत आम्ही ! अहो, पण ते दोन रट्टे माझ्या मराठी माणसालाच लागलेत ना !
(राजला झापल्याचं पाहून उद्धव गालातल्या गालात हसतात. तेव्हाच महाराजांचं लक्ष त्यांच्याकडे जातं.)
महाराजः उद्धवसाहेब तुमचीही प्रतिक्रिया वाचली आहे आम्ही. मराठीचं काय करायचं ते मनसेला विचारा, असं सांगून तुम्ही मोकळे झालात. तुमचं दोघांचं जे काही चाललंय, ते कितपत योग्य आहे ?
राजः महाराज, आमच्यात काय झालंय ते बहुतेक तुम्हाला ठाऊक नाही.
महाराजः आम्हाला ठाऊक नाही ? गनिमी कावा काय असतो हे आम्ही तुम्हाला शिकवलं. त्यावेळचे आमचे गुप्तहेर आजही तितकेच समर्थ आहेत. महाराष्ट्रात जे काही होतंय, ते सगळं आमच्यापर्यंत पोहोचतंय. विशेषतः, शिवसेना आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर तर आमचं विशेष लक्ष असतं. त्यामुळे तुमच्यात काय झालं, कसं झालं, हे सगळं आम्ही जाणतो. अगदी २७ नोव्हेंबर २००६ पासून, किंबहुना त्या आधीपासूनचा सारा घटनाक्रम आम्हाला ठाऊक आहे. मराठी माणसाला हक्काचे दोन नेते मिळतील, असं आम्हाला त्यावेळी वाटलं होतं. पण हे सगळं भलतंच घडतंय.
उद्धवः महाराज, पण लोकसभा निवडणुकीत जे काही झालं, तो तमाशा ' राजा ' मुळेच झालाय ना ? त्याची जी काही ' बकबक ' चाललेय, त्यामुळेच मराठीच्या दुश्मनांचं भलं होतंय. त्यामुळे त्यानं सुधारायला हवं.
राजः महाराज, तुम्हीच सांगा कोण चुकतंय ? मराठी माणसाचा आवाज उठवण्याचा मी प्रयत्न केलाय. आमच्या ' दादू ' ला मराठीचा एवढाच पुळका आलाय, तर त्यांचे ११ खासदार काय नेपाळी आहेत का ?
महाराजः (अधिकच संतापतात) ... खबरदार ! ही सगळी भाषणात ऐकवायची वाक्यं आम्हाला ऐकवू नका. ती आधीच ऐकली आहेत आम्ही आणि त्यामुळेच व्यथित झालो. खरं तर आधीच बोलावून, तुम्हाला खडसावण्याचा विचार होता. पण म्हटलं, तुम्ही सुजाण आहात, हुशार आहात, सगळं ठीक होईल. पण कसलं काय, तुम्ही तर माझ्या मराठी माणसांमध्ये फूट पाडताय. हे आम्ही सहन नाही करू शकत.
राजः (अत्यंत खेदाने) असं नका म्हणू महाराज, बरं का !
महाराजः तुम्हीच भाग पाडलंय मला हे सगळं ऐकवायला. अतिरेक झालाय सगळा. बाळासाहेबांनी मोठ्या कष्टानं उभ्या केलेल्या शिवसेनेची, मराठी माणसाच्या संघटनेची काळजी वाटतेय आता आम्हाला. काय वाटत असेल त्यांना हे सगळं पाहून ? लोकसभा निवडणुकीत मराठी माणसामुळे, मराठी माणसाचं पानिपत झालं आणि तरीही तुमचं वाक्-युद्ध सुरूच आहे, ही बाब आमच्या मनाला चटका लावून गेली आहे. याचसाठी का केला होता अट्टाहास ? याचसाठी का मराठा तितुका मेळविला होता ?

(दरबार शांत. राज-उद्धव अंतर्मुख होऊन विचार करत असतात. महाराज दोघांकडेही पाहतात.)

उद्धवः महाराज, तुमच्या मते हा दोष कुणाचा ?
महाराजः चूक तुम्हा दोघांचीही आहे.
राज-उद्धव एकत्रः ती कशी
महाराजः आठवून पाहा शिवचरित्र. सगळ्या मराठींना-मराठ्यांना-माझ्या या सगळ्या मावळ्यांना एकत्र घेऊन आम्ही लढलो नसतो, तर हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार झालं असतं का ? शाहीर बाबासाहेब पुरंदरे आमचे चरित्र सांगताना हे प्रत्येक वेळी सांगतात. तुम्ही दोघंही ते बालपणापासून ऐकत आहात. कळतंय सगळं पण वळत नाही आहे.
राजः असं का म्हणता महाराज ?
महाराजः अहो , शिवाजी काय म्हणतो हे तुम्ही तुमच्या भाषणांतून कायम सांगत असता . पण ते कृतीत उतरलं नाही . पहिले ते राजकारण , हे तुम्ही लक्षात ठेवलेत , पण त्यातलं सावधपण तुम्ही विसरलात . पांडव आणि कौरव एरव्ही एकमेकांच्या विरोधात होते . पण तिसरा शत्रू आला की ते १०५ होते . पण तुम्ही एकमेकांविरोधात लढत राहिलात आणि त्यात ' शत्रूं ' चा फायदा झाला . आता मला मुंबई - ठाण्यातल्या माझ्या मराठीजनांची काळजी वाटतेय . त्यांचं रक्षण तुम्हालाच करावं लागेल .
उद्धव-राज एकत्रः ते कसं शक्य आहे महाराज ?
महाराजः का शक्य नाही ? मराठी माणसाचा उद्धार करण्याचं, महाराष्ट्राचं भलं करण्याचं तुमचं उद्दिष्ट आहे ना...मग का नाही शक्य ? लोकसभा निवडणुकीतले मतांचे आकडे बघा. मतांचं विभाजन झालं नसतं, तर विजय मराठी माणसाचाच होता. विधानसभा निवडणुकीत तशी रणनीती आखा. हवं तर आमची प्रत्येक लढाई आठवून पाहा आणि त्यातून काहीतरी बोध घ्या. एकत्र आलात, तर उत्तमच...पण वेगळं राहूनही मराठी माणसांसाठी एक होऊ शकता ना ! तसं झालं तर आणि तरच मराठी माणसाला न्याय मिळेल, त्याचा दबलेला ' आवाज ' पुन्हा फुटेल. हा आमचा सल्ला नाही, तर आदेश आहे आणि तुम्हाला आदेश करण्याचा आम्हाला हक्क आहे. आहे ना ?
राजः महाराज , हे काय विचारणं झालं का ?
महाराजः तर मग शपथ घ्या, मराठी माणसासाठी एकदिलानं लढण्याची. शत्रूचा सामना करण्यासाठी तुम्हाला तलवार द्यायची गरज नाही, कारण तुमचे शब्दच तितके धारदार आहेत. त्याचा योग्य वापर करून मराठीच्या शत्रूंना नामोहरम करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत !
उद्धव-राजः आम्ही चुकलो महाराज ! आता आम्ही एकदिलानं लढण्याचा प्रयत्न करू.

(या प्रसंगाचा हा शेवट समस्त मराठीजनांची इच्छा लक्षात घेऊन केलाय. काय मंडळी, तुम्हालाही तसंच वाटतंय ना ? )
 
आपला विनम्र
विकास रणदिवे

 

शनिवार, १६ मे, २००९

होय मी मराठीच !!

आज लोकसभेच्या निकाला ने सिद्ध केले की आम्ही भावकीच्या भांडणात सर्व दुसर्याच्या खिश्यात टाकू पण भावाला काही देणार नाही................

सेनेला ना मनसेला, महाराष्ट्र काँग्रेसला !!!!!!!!!!!!

आपला,
(मराठी) विशुभाऊ

गुरुवार, १४ मे, २००९

महाराष्ट्र भारता बाहेर !!!!

आज india.gov.in ह्या संकेत स्थळावर, प्रत्येक राज्यस्थरावरील Ruls & Regulation बघत होतो , आणि माला मोठा धक्का बसला !!!!!!!!! त्या राज्यातील यादी मध्ये महाराष्ट्र सोडून बाकि सगळे राज्य आहेत !!!!

आपला ,
(गोंधळलेला मराठी ) विशुभाऊ !