हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

शनिवार, ३१ जुलै, २०१०

फलक

राजकारणामध्ये स्त्रीयांना १००% आरक्षण मिळावे ह्या विचार धारणेचा मी आहे, ह्याचे कारण म्हणजे रस्त्यावर लागणारे वाढदिवसाचे फलक; ह्या फलकां मधले चेहरे बघून मन उबगले आहे.
आज काल फ्लेक्स चे फलक कोणी ही बनवतात आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.... ज्याला रोजच्या जिवनात रस्त्यावरचं काळं कुत्रही विचारत नाही तो कार्यसम्राट, ह्रुदयसम्राट वगैरे बनतो...... काही असेच फलक बघून मन उबगलेले होते आणि ह्याचाच विचार करत मला झोप लागली.... सकाळी झोपेतून उठून बघतो तर काय , माझ्या घरा समोर मोठा फलक लागलेला होता आणि त्यावर लिहीलेले होते...

थोरविचारवंत समाजसुधारक प्रबोधनकार विशुभाऊ रणदिवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


शुभेच्छूक,


नाना , तात्या, बाळ्या, गोट्या आणि समस्त परिवार ....

.
.
.
.
आपला,

(प्रबोधनकार) विशुभाऊ .....

सोमवार, २६ जुलै, २०१०

संशोधन (ई.स. २९९९)

मराठी ह्या भाषेबद्दल इतिहासात भरपूर वाद होते असे संशोधनाअंती लक्षात येते. मराठी भाषा आणि मराठी भाषीक लोकं ह्यांच्या भवतालचे बरेच प्रवाद लिखीत स्वरूपात उपलब्द्ध आहेत.

मराठी ही जमात त्यावेळची सगळ्यात छळलीगेलेली किंवा सगळ्यात छळीक जमात होती (दोन विरोधाभासी प्रतिमा) व ह्या दोन्ही प्रतिमेबाद्दल अजुनही इतिहासात वाद आहेत. मराठी भाषेची सुरवात ही विसाव्या शतकातकाच्या उत्तरार्धात झाली असून ठाकरे आडणावाच्या कुटूंबाने ती केली असावी असे केलेल्या संशोधनाअंती वाटते.

त्यावेळच्या मराठी लोकांची आजूबाजूच्या सगळ्याच प्रदेशांशी भांडणे होती. तात्कालीन उत्तर प्रदेश आणि बिहार ह्या गरीब प्रदेशातील लोकांवर त्यांनी मारहाण केली होती ,आंध्रप्रदेशातील लोकांचे पाणि अडवले होते, आणि कर्नाटक राज्यातील काही प्रदेश बळकवण्याचा प्रयत्न केला होता. ह्या सगळ्या घटणांना तेव्हा राजकारण म्हटले जात असे; ठाकरे घराण्यातील एका प्रसिध्द व्यक्तीचे नाव ’राज’ होते, व ह्या वरून ’राज’कारण हा शब्द तयार झाला असावा.
सुरवातीच्या काळात मराठी ही ईंग्रजी अक्षरं वापरून लिहीली जात असे, व तेव्हा ईंग्रजी अक्षरं ABCD ने चालू होत असत. त्या नंतर एकविसाव्या शतकाच्या पुर्वार्धात युनिकोड चा शोध लागल्यानंतर मराठी भाषेला आपली लिपी मिळाली, व त्या नंतर ईंग्रजी अक्षरांची QWERTY ने सुरवात होऊ लागली.

आपला,

(संशोधक) विशुभाऊ

शुक्रवार, १६ जुलै, २०१०

वर्ल्डकप !!

शेतकरी राजा नेहमी प्रमाणे सकाळी पाच वाजता उठून मनन-चिंतन करत बसला होता.... बरेच दिवस त्याला मिळालेल्या विजया मुळे तो थोडा पेचात होता.....

राजा : कोण आहे रे तिथे ????

प्रधान : मी आहे साहेब, बोला काय काळजी आहे??

राजा : प्रधान, तुम्हाला माहीत आहेच एवढ्या मोठ्या खेळ समुहाचे अध्यक्ष-पद म्हणजे किती जबाबदारी , वरून आपले कृषी खाते!!!

प्रधान : साहेब, ही चिंता अपेक्षीत होती !

राजा : म्हणजे??? तुम्हाला सुध्दा वाटते, दोन्ही गोष्टी आम्ही सांभाळू शकत नाही ????

प्रधान : साहेब, असे कसे होईल ???? मला एक सांगा , आज काल तुम्ही कोणाला गोट्या / विटी दांडू म्हणजे आपले लहान पणी चे खेळ खेळताना पाहीले आहे का?

राजा : नाही ...

प्रधान : अहो, आज कालची मुले क्रिकेट पण नाही खेळत !!!

राजा : मग करतात काय ही कार्टी ??????

प्रधान : साहेब, आपला देश हा कृषी प्रधान आहे ... ’फार्मविले’ खेळतात !!!

राजा : क्या बात है !

प्रधान : म्हणून आपण एक नवीन वर्ड्कप चालू करू ’फार्मविले वर्ड्कप’.... २०११ मध्ये हा वर्ड्कप पहीला आपल्या गावातच होईल !!!

राजा : ( एक टाळी आणि उडी मारून) प्रधानजी माझा रथ काढा !!!

आपला,
(प्रधान) विशुभाऊ ..