हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

सोमवार, ७ जून, २०१०

कट्टा

कॉलेज कट्टा म्हणजे त्या वयातल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय.... कितीही टेंशन मध्ये असलो, तरी कट्यावर गेलो की कसे छान वाटे ,मग प्रसंग काही असो... घरचे प्रश्न, कॉलेज मधली ब्लॅक लिस्ट ते थेट प्रेम भंग , सगळ्याचे निवारण तिथेच धुरांच्या वलयांमध्ये आणि पानाच्या पिचकाऱ्यांमध्ये व्हायचे...

आज बऱ्याच वर्षांनंतर कट्ट्यावर जायचे ठरवले... जाताना बऱ्याच कल्पना रंगवल्या होत्या.... वाटले होते जुने सोयरे भेटतील, मजा मस्ती होईल... रंग्याचे जोक, भिक्या च्या थापा, बापट्याच्या कविता ऐकायला मिळतील..नविन जोमाचे नविन जवान आपला कट्टा रंगवत असतील... पक्या नेहमी प्रमाणे ऊधारी ची आठवण करून बिडी हातात टेकवत असेल..... मी खुप एक्सायटेड होतो... चालता चालता आतंर संपतच नव्हते, शेवटी तर धावत सुटलो, जवळ जवळ पाच एक वर्षांचे अंतर जे कापत होतो मी.... आणि जेव्हा पोहचलो तेव्हा मला जोराचा धक्काच बसला....

पक्या बिचारा कुठेतरी शुन्यात नजर लावून पानाला कथ्था लावत होता (कोणाच्या ठाऊक नाही).... कट्टा रिकामा होता, रंग्या-भिक्या तर नाहीच पण नविन पोरं सुध्दा नाहीत... पक्याला विचारले तर त्याने काही न बोलता हात पालथे करून दाखवले.... मी पण थोडे सावरण्या साठी सिगारेट सुलगवली आणि जुन्या आठवणीन मध्ये उभा राहीलो... तेवढ्यात कॉलेज ची काही मुलं माझ्या समोर ऊभी राहिली व अभ्यासा बद्दल बोलू लागली, मी दुर्लक्ष करणारच तितक्यात मला जाणवले की ही पोरं फ़ेसबुक आणि ट्विटर वर रात्री कट्टा जमवण्याच्या प्लॅन करत होते....

मला त्या पोरांची खुप किव आली ............. सिगरेट न पिणारी, तंबाखू न खाणारी, फक्त इंटरनेट वर मित्रांना भेटणारी ही नविन पिढी आपली संस्कृती, आपला कट्टा काळाआड गायब करणार; हे बघून माझे  ह्रदय तिळ तिळ तुटले.....

आपला,
(कट्यावरचा) विशुभाऊ

रविवार, ६ जून, २०१०

प्राध्यापकांचे इंग्रजी आणि मी , भाग - १

आमच्या ईंजिनिअरींग कॉलेज मधल्या प्राध्यापकांचे इंग्रजी म्हणजे नक्कीच एक संशोधनाचा विषय. खाली दिलेली जी उदाहरणे आहेत ती मी नविमुंबई मधल्या एका डिप्लोमा कॉलेज ला होतो तेव्हाची....

१) आमच्या वेळी डिप्लोमा्ला वार्षिक अभ्यासक्रम होता, माझे पहिलेच वर्ष... फिजीक्स (भौतीकशास्त्र) ह्या विषयाला आम्हाला पहिले सहा महिने कोणी शिक्षकच नव्हते. नंतर जे आले ते एकदम सहा फूट १०० किलो चे आजोबा. त्यांनी येताच आमचे प्रॅक्टिकल्स चालू केली.... आम्ही सगळे लॅब च्या बाहेर, रांगेत उभे होतो आणि सरोबा समोर टेबल वर बसलेले होते... ते तिथुनच ओरडले "रोल नंबर वन टू फ़िफटी हॅव एन्ट्री आदर हॅव डिसेंट्री" .... मी रणदिवे रोल नंबर ९० म्हणजे मला "डिसेंट्री".....

२) गणिताचा तास म्हाणजे हक्काचा मस्ती करायचा तास, त्या वेळी आमचे पुजारी सर फक्त फळ्या कडे बघून शिकवायचे, मागे वळून सुध्दा बघायचे नाहीत... पण त्या ऐतिहासीक दिवशी मी मस्तीत जाम सुटलो होतो आणि आमच्या सरांचा सुध्दा तोल सुटला, ते जोरात माझ्या वर ओरडले " रणदिवे स्टॅंडप" , मी चुपचाप स्टॅंडलो, व पुढिल आदेशाची वाट पहात होतो... पाच मिनीटे गेली सर माझ्या तोंडाकडेच बघत उभे, काही बोलेनाच.. अजुन पाच मिनीटांनी ते मला म्हणाले " फॉलो मी" ... मी चुपचाप त्यांना फॉलो करत दरवाजाच्या बाहेर गेलो व ते मला म्हणाले " नाऊ डोंट फॉलो मी".................

३) आमचे वैद्य सर म्हणजे त्यांच्या विषयातले गाढे-पंडीत, पण इंग्रजी हा त्यांचा नक्कीच विषय नव्हता... मला एकदा मेकॅनिक्स च्या प्रॅक्टिकल ला जायला उशीर झाला, वैद्यसर माझ्यावर भडकले व त्यांनी मला खडसावून विचारले
सर : " व्हाय लेट??"
मी : " ???????"
सर : " आय एम आस्किंग यू , व्हाय लेट??"
मी : " सर माय सायकल गॉट पंक्ट्चर, सो...."
सर ( समोर च्या मैदाना कडे बोट दाखवत): " नाउ रोटेट द ग्राउंड फ़ोर टाईम्स..."

मी आपला ग्राऊंड चार वेळा रोटेट करून परत सरां-समोर उभा राहीलो, सरांना कदाचीत माझी दया आली असावी ते मला म्हणाले " नाउ गो ऍंड अन्डरस्टॅंड द ट्री!!"

आपला,
(भयंकर इंग्रजी) विशुभाऊ