बुधवार, ५ डिसेंबर, २०१२
शनिवार, १ डिसेंबर, २०१२
ये जो मोहब्बत है ....
काल संध्याकाळी स्पार्कलिंग वाईन छान पैकी नवीन ग्लास मध्ये घेतली आणि
रेडिओ वर पुरानी जीन्स कार्यक्रम चालू केला. आपोआप आयुष्याची १०-१२ वर्षे
रिवाईंड झाली. ते हॉस्टेल, तिथली संध्याकाळ, गणेश तलावावर पाण्यात पडलेले
चंद्राचे प्रतिबिंब पाहत तिच्या आठवणीने झुरणारा मी वगैरे पुन्हा अनुभवू
लागलो. पावसाळ्यात सुकलेल्या झाडावर नवीन पालवी फुटल्यावर जसे वाटते अगदी
तसेच वाटत होते.
आमच्या कॉलेजच्या मागच्या बाजूला गणेश तलाव होतं. तेथे संध्याकाळच्या वेळी तर अजिबात कोणी नसायचे. मी एकटाच रेडिओ घेऊन तेथे बसायचो, फार छान वाटायचे. ते तलाव म्हणजे 'पाय पटेल' च्या गोष्टीतल्या तरंगत्या बेटा पेक्षा सुंदर आणि 'मुकुंद जोशी' च्या त्या दगडा पेक्षा जिव्हाळ्याचे. तलावावर खूप वेग वेगळ्या प्रकारचे पक्षी यायचे. मला आठवते एकदा तर मी सलीम अलींचे पुस्तक घेऊन तेथे बसलो होतो तेव्हा १५ वेगवेगळ्या प्रकारचे सनबर्डस्, ३ प्रकारचे कावळे आणि अनेक पक्ष्यांच्या प्रजाती ओळखल्या होत्या. गर्द झाडीतला आणि वेगवेगळ्या पक्षांनी फुललेला तो तलाव म्हणजे माझा जिवलग मित्र. त्या तलावाने माझ्या त्यावेळच्या अनेक प्रेमगाथा, स्वप्न आणि विरह अनुभवलेली आहेत. माझी त्यावेळची अनेक प्रेमप्रकरणं भले तलावा पर्यंत पोहचली नाहीत तरी गणेश तलावाने ऐकलेली आहेत. तसे म्हणा माझे कुठलेच प्रेमप्रकरण तलावा पर्यंत पोहचले नाही, एकच जे अगदी तडीस गेले म्हणजे लग्न केले. त्याच लग्नाचा ४था वाढदिवस म्हणून हि वाईन उघडली होती.
अचानक रेडिओ वर किशोरदा चे "बूट पॉलिश करेगा ..... फिर भी तुमपे मारेगा" हे गाणे ऐकले आणि थाऱ्यावर आलो. ते प्रेमळ गुलाबी हिरवे दिवस गेले हे आठवून फार वाईट वाटले. ते तिच्यावर मरणं, तिच्या साठी झुरत बसणं, तिला पटवणं, मनवणं, दोघांच्या घरचा विरोध मालवण्यासाठी प्रयत्न करणं वगैरे वगैरे अचानक गायब झालं. सत्या मध्ये मी धोपट मार्गावर येऊन संसाराचा गाडा खेचतो आहे हे आठवल्यावर फार विचलित झालो. उतार वयाला लागण्याचे हे वय नाही हे मला नक्की ठाऊक होतं.
मी रेडिओ बंद केला आणि 'मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो...' हे गाणे लावले आणि डोळे बंद केले. लगेच माझ्या मनातल्या चित्रकाराने अनेक चित्र माझ्या डोळ्यांच्या पटलावर काढल्यावर मी फार खुश झालो आणि गाणे गुण गुणायला लागलो "ये जो मोहब्बत है ...."
आपला,
(प्रेमळ) विशुभाऊ

रविवार, २५ नोव्हेंबर, २०१२
शाळा
मी मुकुंद जोशी उर्फ जोश्या. मागच्या वेळी जाता जाता पांडुरंग सांगवीकर लिहून गेला म्हणून विशुभाऊने आता पण मलाच लिहायला बसवले. पांडू बोलतो तसा विशुभाऊ चाप्टरच, मला जाता जाता पांडू सांगून गेलाच कि ह्याच्या बरोबर ऑफिसला जाऊ नको हा काम धाम सोडून आपल्याशी गप्पा मारत बसतो. पण विशुभाऊने सुम मध्ये शनिवार रविवार मध्ये सगळ्या गप्पा आटोपल्या. इचिभना, विशुभाऊने मी इथे यावे म्हणून खोटे सांगितले शिरोडकरच्या बाबांची बदली सिंगापुरात झाली आहे.
बोकीलांनी मला नाव वगैरे दिले, पण मी म्हणजे शाळेत गेलेला प्रत्येक मुलगा. शाळेत सुऱ्या, फावड्या, चित्र्या, बिविकर वगैरे सारखी सगळीच मुलं असतात, पण शाळा वाचताना प्रत्येकजण स्वतःला जोश्याच समजतो. शाळेत प्रत्येकाची एकतरी लाईन असतेच नसल्यास नरूमामा म्हणतो तसं त्याने आपली 'वैद्यकीय चाचणी करून घ्यावी'. लाईनिचा विषय चालू असताना विशुभाऊने मला दिप्याची गोष्ट सांगितली आणि आम्ही बराच वेळ हसत होतो. मी पण उगाच विशुभाऊला डिवचल्यवर त्याने तर कहर केला, त्याच्या शाळेतल्या १०-१२ शिरोडकर सांगितल्या.
शनिवारी संध्याकाळी आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो. इथे मुलं मुली कधीही आणि कुठेही मिठ्या मारून मुके घेत उभे असतात. सुऱ्या असता तर त्याने उच्छाद मांडला असता. पण अश्लील काम भिंती आडच करतात आपल्या सारखे नाही दिसले झाड चालू. इथला समाज आणि आपला थोडा वेगळा आहे. शाळा वाचून झाल्यावर हेरंबने बरेच 'रीडिंग बिटवीन द लाईन्स' करून आपल्या ब्लॉग वर ह्या पुस्तकातून दिसणारं आपल्या समाजाचं, शिक्षणपद्धतीचं, संस्कारांचं, राजकारणाचं, समाजकारणाचं, नाजूक वयातल्या मुलामुलींमधल्या सुप्त आकर्षणाचं, नातेसंबंधांचं, भावभावनांचं वगैरे स्पष्टीकरण दिले आहे.
माझ्या इयत्ता नववी वरती लिहिलेले हे पुस्तक सुजय डहाकेने चित्रित करायचा प्रयत्न केला, पण मला नाही वाटत ते तेव्हडं जमलं. पण त्यात शिरोडकर एकदम पर्फेक्ट घेतली. तसंही म्हणा एक आख्खे वर्ष त्यात एवढे 'रीडिंग बिटवीन द लाईन्स' करून ३ तासात बसवणं सोप्पं नाही.
बोकीलांनी लिहिलेले आणि माझ्याकडून वदवलेले हे वाक्य मात्र तितकेच खरे 'त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत, बाकं आहेत, पोरंपोरी आहेत, सर आहेत, गणित आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्रसुद्धा; पण आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणाऱ्या पांढऱ्या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. ह्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेला वर्ग नाहीत, भिंती नाहीत, फळा नाही, शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणंफार सुंदर आहे.'
आपला,
(शाळेतला) जोश्या
शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१२
कोसला
खरेतर हे विशुभाऊने स्वतः लिहायला पाहिजे होते. पण भालचंद्र नेमाड्यांनी
मला 'शंभरातल्या नव्व्याण्णवांस' अर्पण केल्या मुळे आणि विशुभाऊ ९९% मधला
निघाल्या मुळे, अगदीच सामान्य निघाला. तसा सुरवातीला मी आकाश गुप्ते कडे
होतो तेथून सौरभ बोंगाळे कडे आणि नंतर विशुभाऊ कडे आलो. सुरुवातीला मला
थोडे फार उदाहरणार्थ चाळल्या नंतर विशुभाऊ मला सिंगापूरला घेऊन निघाला पण
वजन जास्त झाल्यामुळे मी पुन्हा घरी गेलो. दिवाळीत एकदाचा मी सिंगापूरला
पोहचलो. खरं तर तुम्हाला वगैरे सांगण्या सारखे एवढेच.
इथे आल्यावर सुरुवातीला दोन दिवस विशुभाऊने मला कपाटातच ठेवले. नंतर उदाहरणार्थ त्याच्या बरोबर ऑफिसला, चहाला, जेवायला आणि सगळी कडेच जायला लागलो. तो कामाच्या नावाखाली कंपनीला फसवतो वगैरे हे मला लगेच कळले. सुरुवातीला विशुभाऊला असे वाटत होतं कि मी सायको वगैरे आहे. पण नंतर त्याला उत्साह वगैरे यायला लागला. एकदा आम्ही ऑफिस मध्ये रंगात आलो असताना अचानक भले मोठे काम आले. त्याने उदाहरणार्थ सर्वर वरच्या एक दोन लायब्ररी फाईल बदलल्या आणि ऑपरेटिंग सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे सांगुन सिस्टीम ऍडमीनला कामाला लावले. मला कळले हा इचल्या पेक्षा चाप्टर आहे. पण मनू गेली तेव्हा हा ऑफिस मध्ये सुध्दा रडला. मला म्हणाला नंतर तू अजंठाला गेलास ते बरे. पण बदललास.
ऑफिसमध्ये येता जाता बस मध्येतर आम्ही धिंगाणा घालायाचोच पण रात्री जेवताना तर धमाल. सिंहगडची गोष्ट सांगताना तो इतका रंगला कि माझ्या ऐवजी तोच घसरून पडला बसल्या बसल्या. त्या हॉटेल मधल्या मलय बाईने माझ्या कडे पाहून विचारले 'व्हीच भाषा' तर पठ्ठ्याने लगेच सांगितले 'मराठी भाषा'. ह्याने आपल्या भाषेचा चांगलाच प्रचार केलेला आहे.
तर मी बापाचा पैसा खर्चावून परीक्षा वगैरे नीट कधीच दिल्या नाहीत आणि म्हणूनच तुम्हा लोकांच्या म्हणजे 'शंभरातल्या नव्व्याण्णव' जणांच्या हृदयात बसू शकलो. आता इथे वगैरे सांगणे एवढेच. पुढे तुम्हीच वाचा. मी निघतो आहे. विशुभाऊ कडे उद्या पासून शाळेतला जोशी पुन्हा येतो आहे.
तर मी वर्ष च्या वर्ष फुकट घालवून कमावले काहीच नाही. तेव्हा गमावली हि भाषा मात्र उदाहरणार्थ इतकी बरोबर नाही. किंवा वर्षं अत्यंत वाया गेली, असं म्हणणं उदाहरणार्थ चूक आहे. म्हणजे बरोबर.
असाच लोभ असावा.
आपला,
पांडुरंग सांगवीकर

मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१२
थट्टा
"सुपारी ..... तुझे लग्न दुपारी" "पडावा ..... नीट बोल गाढवा" वगैरे
लहानपणीची थट्टा करायची वाक्ये वापरता वापरता थट्टा करणे हा माझा गुण कधी
झाला तेच समजले नाही. तशी विनोदी थट्टा करणे हे कधी कधी चांगले असते पण कधी
कधी अंगाशी सुध्दा येते. थट्टा तशी कधी मुद्दाम होते तशीच केव्हा केव्हा
अजाणते पणे सुध्दा होते. शाळेत असताना एकदा व्यासपीठावर माईक समोर आमच्या
मुख्याधापाकांचे पूर्ण नाव 'पुंडलिक अप्पा खामकर' मी चुकून सवयी प्रमाणे 'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल' च्या तालात घेतले, आणि तोंड रंगवून हनुमाना सारखा चेहरा घेऊन परतलो होतो.
असे बरेच प्रसंग माझ्या बरोबर झाले तरी सवय काही गेली नाही. आज सुद्धा असाच एक 'अतिप्रसंग' मी स्वतःवर ओढून घेतला. ऑफिस मधून निघालो आणि बस स्टॉपवर माझ्या एका चायनीज कलीग 'ली इयान' (हे मुलीचे नाव आहे) बरोबर बोलत उभा होतो इतक्यात माझी एक मेहुणी तिच्या नवऱ्या बरोबर मला तिथे भेटली. इतक्या वर्षात मुंबई मध्ये एकमेकांचे तोंड न पाहिलेलं, पण दुरूनच ह्या बयेने मला सिंगापुरातल्या गर्दीत बरे ओळखले. भेटताच आम्ही एकमेकांना हसून 'ग्रीट' वगैरे केले आणि गप्पा मारायला सुरुवात केली, तरी माझ्या मेहुणीचे लक्ष मात्र ली इयान कडेच होते. आता स्त्री मानसशास्त्राचे माझे ज्ञान अफाट असल्याने तिच्या कुशाग्र बुद्धीचा अंदाज घेण्यास मला वेळ लागला नाही, आणि मला पुलंचा नाम्या परीट आठवला. मी म्हटले "आगं हि माझी फॅमेली !!!". मेहुणीचा नवरा गडबडला खरा पण सावरत म्हणाला "मुंबईचे काय?". म्हटले "ते आहेच .... हि स्टेपनी!".
मेहुणी भोळ येऊन पडायचीच बाकी होती पण तिचा नवरा व्यासंगी असल्याने त्याने लगेच ओळखले आणि म्हणाला "तर नाम्या चांगले चालू आहे तुमचे 'सिंगापुरायन'" , आणि आम्ही दोघे जोरात खो खो करून हसलो. संदर्भासहित स्पष्टीकरण दिल्यावर बायकोच्या बहिणीचा जीव भांड्यात पडला आणि माझ्या थट्टेची दाद देऊन दोघेही तेथून निघाले.
मी वळून ली इयान कडे पहिले तर तिने रागाने माझ्या कडे पाहून विचारले "डिड यु कॉल मी 'फॅमेलि' ऍण्ड 'स्टेपनी' ????"
आपला,
(थट्टेखोर) विशुभाऊ

शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१२
माझा आवडता डास
शाळे पासून मी बरेच आणि वेगवेगळ्या विषयां वर निबंध लिहिले आहेत, पण 'माझा आवडता डास' ह्या विषयावर मीच काय कोणीही निबंध लिहिला असेल असे मला वाटत नाही. 'आवडणे' ह्या क्रिया साठी बरीच कारणे असतात, जसे 'आवडता सण' मध्ये दिवाळी येते कारण नवीन कपडे, लाडू, करंज्या, फटाके वगैरे वगैरे किंवा 'आवडता पक्षी' मध्ये कोंबडी येते कारण स्वाद वगैरे. तरी 'डास' मला कधी आवडू शकतो असे मला कधीच वाटले नव्हते.
छत्रपतींचे नाव आणि भारत मातेची शप्पथ घेताना भरून येणारी आमची 'मर्द' छाती, आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांच्या वेळी शेपूट फटीत घालून बसते. अत्याचार कोणताही असो मग तो कासाबने केलेला गोळीबार आणि सरकारने त्याला दिलेला अभय असो किंवा करमणूक सांगून निर्मात्याने आपली केलेली फसवणूक असो, त्या विरुद्ध आमचा आवाज हा फक्त फेसबुक आणि ब्लॉग इत्यादी वरतीच उठतो.
जेथे जन्मलो, जेथे वाढलो त्या मातृभूमीचा अभिमान हा सगळ्यांनाच असतो पण तो बाळगणे आणि पोसणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही, त्या साठी 'डेंगू' डासां सारखी निधडी छाती लागते. डासांच्या ह्या अनेक प्रजातीं मध्ये माझी आवडती जमात म्हणजे 'डेंगू', डेडिकेशन आणि डिटर्मीनेशन ने भरलेली हि जमात. हजार वेळा ज्याच्या नावाने बोटे मोडून आणि शिव्याशाप देऊन जे जमले नाही ते ह्या जमातीने एका रात्रीत कडी कुलपांची सर्व बंधनं तोडून कासाबला चाऊन 'करून दाखवलं' (हा शब्द उध्दव दादा कडून वापरून झाल्यावर परत करण्याच्या अटीवर उधार आणला आहे!).
फार पूर्वी एक मद्रासी (मुंबई मध्ये सगळे दक्षिण भारतीय हे माद्रसीच असतात) चित्रपट 'अपरिचित' पहिला होता. तो अपरीचीत नावाचा माणूस प्रत्येक अत्याचारावर स्वतः ऍक्शन घेतो, त्या प्रमाणे भारतातले अत्याचार संपवण्याचा विडा हा ह्या डेंगू डासांनी उचलला आहे. त्याचा पुनः प्रत्यय मला 'जब तक है जान' हा चित्रपट पाहिल्यावर झाला.
असो तर ह्या मझ्या आवडत्या डासां बद्दल माझा अभ्यास जोरात चालू आहे आणि लवकरच त्यावर निदान १५ ओळींचा निबंध लिहीन म्हणतो ..... कसे ?
आपला,
(निर्बंधक) विशुभाऊ

गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१२
चोरा चोरी
कोण कोणाचे काय चोरेल हे अजिबात सांगता येत नाही ....
सुरुवातीला 'बोक्या सातबंडे' प्रकरणाने मराठी ब्लॉगर्स समूहाला (हो म्हणजे
काय ! हा साहित्यिक समूहा पेक्षा मोठा आहे) हादरवून टाकले होते .... नंतर
नंतर ह्या घटना इतक्या वारंवार होऊ लागल्या कि 'आपले साहित्य चोरणे' म्हणजे
'वाह्ह व्वा !' सारखी एक पोहोच पावतीच झाली.... माझ्या कविता किंवा लिखाण
हे चोरण्या सारखे असेल हे आमच्या तिर्थरुपांना पण कधी वाटले नाही (आणि
अजूनही वाटत नाही !)असो .... तरी कधी कोणी पांचट आवडीच्या आणि अकलेच्या
माणसाने हे कृत्य केलेच कि आम्ही ओरडून ओरडून सांगतो 'आमचे साहित्य चोरले'
म्हणजे 'वाचा वाचा मी किती उत्कृष्ट लिहितो!' हे सांगणे असते.... मग
आमच्यातले जेष्ठ श्रेष्ट लोकं सांगतात 'अरे शब्द चोरेल !! प्रतिभा थोडीच
चोरू शकेल??' (हो च्याला ते चोरू शकले असते तर कसला भाऊ नी कसला फळा)....
पण आज जेव्हा एकाने मला टोमणा मारला 'काय हो पंताची 'कंसातली' स्टाइल चोरता का?' तेव्हा पहिल्यांदा जिव्हाग्री लागले !!!! ..... खरे आहे मी पंतांची स्टाइल उचलली , कारण मित्रांची गोष्ट हि उचलायची असते, ती चोरी नसते ....
माझ्या ब्लॉगिंग ची सुरुवात मुळात पंतांचे उवाच वाचता वाचता झाली .... पुढे 'मराठी भुंगा' डोक्यात घुमायला लागल्यावर 'काय वाटेल ते' लिहायला आणि 'वटवट' करायला लागलो.... इथे तिथे 'भटकंती' करता करता 'मोगरा फुलाला' पाहू लागलो .... 'मनाचे बांधकाम' पहिले 'बाबाच्या भिंतीवर' उड्या मारल्या.... 'पाटी माझी पटेल का?' बोलणार्यांची पाटी पाहिला लागलो .... आणि बर्याच गोष्टी करताना 'मन उधाण वाऱ्याचे' करून सुचेल ते जमेल ते लिहायला लागलो ....
आता कोणा कोणाचे काय उचलले किंवा चोरले ते सांगणे कठीण ...... हां पण प्रयत्न करून सुद्धा कोणाची प्रतिभा मात्र चोरू शकलो नाही .....
आपला,
(उनाड) विशुभाऊ
ता.क. : जे काय लिहिले आहे, ते मुळात सगळ्यांना कळणार नाही .... त्या बद्दल क्षमस्व!

सोमवार, २४ सप्टेंबर, २०१२
हा खेळ पैश्यांचा....
कंपनीत खेळ चाले, या गूढ संख्यांचा संपेल न कधीही, हा खेळ पैश्यांचा हा बॉस ना स्वयंभू, उगाच ज्ञान वाटतो हा इन्फ्लेशन मध्ये अभिशाप भोगतो हा यशात घेई भागीदारी, हा दूत असुरांचा आभास ऍप्रेजल हे असते खरे गाजर जे इन्क्रिमेंट मिळे ते, असतो नितांत भास अनंदतात बाकीचे, हा दोष त्या बावळटांचा या साजिर्या क्षणाला, प्याला असावा मुठीत ओठांवरील सर्व शिव्या, लागतील त्याला खचित गवसेल का सूर अपुल्या?, 'अझाद' जीवनाचा .....
आपला,
(नोकरदार) विशुभऊ
रविवार, २३ सप्टेंबर, २०१२
परदेशी प्रत्यक्ष निवेश (FDI)
परदेशी प्रत्यक्ष निवेश हि योजना स्थलांतरित पैसा परत आणण्यासाठी सर्वात्कृष्ट पध्दत आहे .... आपल्या जवळील नातेवायाकांना परदेशी स्थाईक करून त्यांचा तर्फे परदेशी कंपनी बनवावी व स्थलांतरित पैसा पुन्हा 'परदेशी प्रत्यक्ष निवेश' योजने मार्फत देशात आणून , देशाची आर्थिक बाजू सावरावी आणि होणारा नफा पुन्हा होता तिथे घेऊन जावा....
वरील दिलेले नियम आणि प्रक्रिया ह्या परीक्षित असल्या तरी विशेषज्ञांच्या मार्गदर्शना खालीच पार पाडाव्यात ..... घटने मुळे घडलेल्या आकस्मित घटनेला विशुभाऊ जबाबदार राहणार नाहीत !!!
आपला,
(अर्थतज्ञ) विशुभाऊ
शनिवार, २२ सप्टेंबर, २०१२
उचकी
भर दुपारी स्वप्नातील खडखडाटने दरवाजा उघडला
पहिले तर घरचे
भारतातून
आले होते
येताना मोदक, पुरणपोळ्या आणि वालाची खिचडी आणली होती
ती ह्या गणपतीतील माझी वाटणी होती ....
डोळे उघडले तर पहिले घरात कोणी नव्हते
ताट खरकटे होते
पुरणाची चव जिभेवर होती
माहित आहे आईला आज उचकी लागली होती .....
आपला,
विशुभाऊ

बुधवार, १९ सप्टेंबर, २०१२
माझी गांधीगिरी
आज माझ्यातल्या सरळ स्वभावाची प्रचीती मलाच झाली ..... इथे सिंगापूर मध्ये फास्टफूड सेन्टर्स मध्ये खाउन झाल्यावर स्वतःचे ट्रे उचलण्याची पध्दत नाही .... पण घराच्या शिस्ती मुळे मी स्वतःचे ट्रे स्वतः उचलतो , बायकोच्या शिस्तीचा प्रभाव कमी असल्याने धुवून ठेवत नाही ......
आज सबवे मध्ये दुपारचे जेवण घेतल्यावर सवई प्रमाणे ट्रे उचलला आणि निघालोच .... तोच एका दाम्पत्याने मला त्यांच्या टेबल वरच्या ट्रे कडे बोट दाखवून म्हटले "प्लीज क्लीअर धीसला!".... मी त्यांच्या कडे पाहून हसलो व त्यांच्या टेबल वरचे ट्रे सुध्दा उचलत होतो, तोच सबवे मधला कर्मचारी "सोर्री सोर्री" करत ओरडत आला व त्या दाम्पत्यांना म्हणाला "सर इज आवर कस्टमर" आणि माझ्या हातातले ट्रे खेचून घेतले.... त्या दाम्पत्यांना मेल्याहून मेल्या सारखे झाले होते .... त्यांच्या "सॉरी" चा मान झुकवून स्वीकार केला व काढता पाय घेतला...
धावत धावत ऑफिस च्या वाशरूम मध्ये गेलो व ५ मिनिटे स्वतःला न्याहाळत होतो .... तेव्हा कळले माझ्या हिरव्या टी-शर्ट आणि ओफ्व्हाईट प्यांट ची करामत होती हि ......
आपला,
(समाजसेवक) विशुभाऊ
सोमवार, १७ सप्टेंबर, २०१२
सिंग्लीश
सिंगापूर म्हणजे जागतिक व्यापाराची राजधानी .... आणि ह्या देशाची
प्रथम भाषा 'इंग्रजी' असली तरी इथे तर्खडकर आले असते तर पावला पावला ला
जीव दिला असता त्यांनी !!!
इथेले इंग्रजी म्हणजे एक मोठा संशोधनाचा विषय .... कोणत्या भाषेची वाक्यरचना मनात करून इंग्रजी बोलतात ते देवालाच ठाऊक .... आता खाली दिलेली उदाहरणेच पहा ....
एका प्रोडक्शन कंपनीच्या
सुपरवायजरला त्याचा मॅनेजर नवीन कामावर घेतलेल्या कामगाराकडे बोट दाखवून
विचारतो " हि नो ओर नो ?" ..... ह्याचा अर्थ असा कि ' दॅट पर्सन नो (Know)
हिज वर्क ओर नॉट (no) !' .....इथेले इंग्रजी म्हणजे एक मोठा संशोधनाचा विषय .... कोणत्या भाषेची वाक्यरचना मनात करून इंग्रजी बोलतात ते देवालाच ठाऊक .... आता खाली दिलेली उदाहरणेच पहा ....
ह्यांच्या व्याकरणात क्रियापदांची व्याख्याच निराळी आहे . . . म्हणजे कुठे क्रियापद लावता आले नाही कि तिथे 'ला' लावायचे .... " नो प्रॉब्लेमला" "वन डॉलर एक्सट्रॉला" वगैरे वगैरे . . . .
आणि सगळ्यात मजा येते ती "कॅन कॅन" मध्ये . . . जिथे आपण मराठीत 'चालेल' 'होईल' किंवा इंग्रजी मध्ये 'विल डू' 'कॅन बी डन' वगैरे म्हणतो तिथे हि लोकं 'कॅन कॅन' म्हणतात . . . .
तरी इथल्या इंग्रजी मध्ये ब्रिटीश इंग्रजी सारखा रुक्ष पणा नसून उर्दू सारखी एक नजाकत आहे . . . म्हणूनच आम्ही ह्या भाषेला 'इंग्लिश' नव्हे 'सिंग्लीश' असे म्हणतो .....
आपला,
(सिंग्रजी) विशुभाऊ
शनिवार, १५ सप्टेंबर, २०१२
:: भारुड ::
किटली आमची इटलीतून आली | इकडेच खपव गं तिला ||२||
सरदार आमचा कोळसा खातो | अतिसार होऊ दे त्याला ||३||
जावई ह्यांचा गोळीबार करतो | फाशी होऊ दे त्याला ||४||
बारामतीचा बोका खाव खाव करतो | कॅन्सर होऊ दे त्याला ||५||
भ्रष्टाचार मारून आहुती देईन | 'अझाद' कर गं मला ||६||
एकदाचे शेवटी सगळेच जाऊ दे । फक्त सज्जन राहू दे आम्हा ||७||
आपला,
(भारुडी) विशुभाऊ
बुधवार, १२ सप्टेंबर, २०१२
मेला मेली
आज ऑफिस मधून निघता निघता , फ्रेंच बॉस च्या चायनीज सेक्रेटरीचा फोन आला ....
ती : बॉस इज सेन्डिंग यु मेल ....
मी : टेल हिम आय नीड फिमेल ! ;-)
ती : आय एम फिमेल !!
((((((( ठ्ठो )))))))
आपला ,
(खल्लास) विशुभाऊ
ती : बॉस इज सेन्डिंग यु मेल ....
मी : टेल हिम आय नीड फिमेल ! ;-)
ती : आय एम फिमेल !!
((((((( ठ्ठो )))))))
आपला ,
(खल्लास) विशुभाऊ
रविवार, ९ सप्टेंबर, २०१२
रॉ आणि आय.एस.आय
अब्बास अहमद हा टिपिकल पाकिस्तानी , पण सिंगापुरातला माझा मित्र
..... खरेतर माझ्या टीम मधला नसला तरी मी भारतीय म्हणून आत्मीयतेने (!)
माझ्याशी मैत्री करायला आला .... अब्बास म्हणजे आर्धवट डोक्याचा पण लाघवी
मुलगा .... पाकिस्तानी असून सुध्दा बराच ब्रॉडमाइंडेड आहे.... हा मला 'रॉ'
अशी हाक मारतो, जणू काही ती शिवी आहे आणि म्हणून मी त्याला 'झाटू आय.एस.आय'
आशी हाक मारतो (शिवी देण्या साठीच)..... कॉफी ब्रेक मध्ये आम्ही शाब्दिक
भारत-पाकिस्तान लढाई खेळतो .... आणि आपणच जिंकलो असे समजून दोघेही कामाला
लागतो ..... असे असले तरी आजून एक ब्रिटीश कलीग 'जॉन मेल्बॉर्न' आमचा कॉमन
दुश्मन..... अब्बास हा पंजाबी ऍक्सेन्ट मध्ये उर्दू बोलतो आणि त्याच्या
भाषेवर बॉलिवूड
च्या सिनेमांचा बराच प्रभाव आहे आणि मी मराठी ऍक्सेन्ट मध्ये मुंबई मधल्या
सर्व भाषांचा प्रभाव घेऊन हिंदी मिश्रित उर्दू बोलतो ....
त्या दिवशी आम्ही दोघे रॉ आणि आय.एस.आय लढाई लढाई खेळत होतो ...
अब्बास : दोस्त तू कितनाभी मना करे .... कारगिल तो हम ही जीत गये थे !!!त्या दिवशी आम्ही दोघे रॉ आणि आय.एस.आय लढाई लढाई खेळत होतो ...
मी : भोसडिके इसका मतलब पाकिस्तान ने ऍटॅक किया था ये तुम काबुल करते हो !
अब्बस : नहीं नहीं मेरा मतलब ये था की ......
जॉन : यु पिपल आर फ्रोम डिफरन्ट कन्ट्रीज बट स्पिक सेम लॅन्गवेज ??
अब्बस : भेन के लवडे .... तेरे मां कि ......
जॉन माझ्या कडे बघून : वॉट डिड हि से ???
मी : जाऊन तुझ्या बापाला विचार भेंशोद .....
आपला,
(रॉ) विशुभाऊ
शनिवार, ८ सप्टेंबर, २०१२
लिटिल इंडिया
सिंगापूर मध्ये 'लिटील इंडिया' नावाचे एक ठिकाण आहे ... इथे आल्यावर
तामिळनाडू मध्ये असल्याचा भास होतो .... इडली , डोसा , रस्सम , पोंगल ,
केळीची पाने , पुजेची साहित्य विकणारी दुकाने , दक्षिण भारतीय पध्दतीची
देवळं सगळे सगळे तंतो तंत.... हे झाले लिटील इंडियाच्या केंद्र भागाचे
वर्णन.... त्याचा आजूबाजूला बरीच तमिळ इतर वस्ती आहे, त्यात इतर भारतातले
लोकं, बांगलादेशी , पाकिस्तानी , श्रीलंकन राहतात व त्यांना इथे 'इंडिअन'
असेच संबोधले जाते ... व ते सुद्धा स्वतःची ओळख 'इंडिअन' म्हणूनच करून
देतात .....
आता एखाद्या मुसलमानाने सांगितले कि तो पंजाबचा आहे कि नक्की समजायचे हा पाकिस्तान चा आहे .... एखाद्या बंगाली बोलणाऱ्या मुसलमानाने सांगितले कि तो कोलकात्याचा आहे कि समजायचे हा बांगलादेश चा आहे .... पण सगळे इथे शहाण्या सारखे राहतात .... मुळात इथल्या कडक कायदा व्यवस्थेने सगळ्यांना 'चड्डीत' ठेवले आहे ...
माझ्या सारख्या अन्नार्थी माणसा साठी हे ठिकाण म्हणजे स्वर्गच !.... इथे भारतीय जेवणाची बरीच दुकाने आहेत .... सिंगापूर मध्ये मुसलीम संख्येने जास्त असल्याने त्यांनी मुसलमानांसाठी योग्य अशी खानावळ दर्शवण्यासाठी 'हलाल' सर्टीफिकेशन चालू केले आहे .... मुसलमानांसाठी जे खाणे 'हराम' आहे उदाहरणार्थ डुक्कर किंवा दारू वगैरे इथे विकले जात नाही ..... लिटील इंडिया मधल्या जवळ जवळ सगळ्याच खानावळी हलाल सर्टीफाईड आहेत .... ह्या खानावळी हिंदू ग्राहकांना आकर्षित करायला 'गोमांस' सुध्दा विकत नाहीत .... एकूण आपल्यासाठी बेस्ट जागा आहे हि जेवण्या साठी .....
इथेच पुढे 'मुस्तफा' नावाचे भले मोठे सुपरमार्केट आहे .... झेंडू बाम पासून एम.डी.एच. मसाल्या पर्यंत सगळे सगळे भारतीय प्रोडक्ट्स इथे मिळतात.... सिंगापूर मध्ये राहणारे भारतीय मोस्टली महिन्याचे सगळे सामान इथूनच भरतात ... पण इथे येण्या साठी शनिवार आणि रविवार हे दिवस मुख्यत्वे टाळा.... सगळा लेबर क्लास ह्या दोन दिवसात इथे मोकाट सुटलेला असतो .... संध्याकाळच्या विरार ट्रेनला जेवढी गर्दी नसते तेवढी इथे असते ....
लिटील इंडिया मध्ये आल्यावर सगळेच भारतीयच दिसतात त्यामुळे प्रवासी न्यूनगंड इथे आजीबात येत नाही .... तसेही म्हणा सिंगापुरात इतर ठिकाणी गेल्यावर सुध्दा तुम्ही परदेशी म्हणून तुमच्या कडे कोणी वळून वळून पाहत नाही व त्यात कोणी भारतीय समोरून आला तरी तो पाहून न पहिल्या सारखे करून निघून जातो ....
आपला,
(लिटील इंडिअन) विशुभाऊ

गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१२
:: खंजीर ::
गैरोंकी चाहत मे मुहाजिर बन बैठे
आपनोंकी आखों मे अंगार बन बैठे ....
मजहब के नाम पे राह चले तो थे
आपनेही घर मे महेमान बन बैठे ....
इलहा की मर्जी पाने फितुर कर गए
तेरेही दरबार मे गुन्हेगार बन बैठे ....
अल-शुकर बनने की चाहत रखते थे
खुद ही खुदमै काफिर बन बैठे ....
ये गुमन आलम से 'अझाद' कर दे
हिन्दोस्तां मे देशद्रोही ना बन बैठे ....
__________________________________
मुहाजिर (भरतीय मुसल्मानोंको पाकिस्तान मे ये नाम से ठुकराया जाता है), इलहा (परमेश्वर,अल्ला), फितुर (दोष, गलती), अल-शुकर (जो काफिर नहि है), काफिर (नास्तीक), गुमन (भ्रम), आलम (विश्व). . .

मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१२
::दारूळी:: नसतेस घरी तू जेव्हा ... ( संदिप खरे ची माफी मागुन)
नसतेस घरी तू जेव्हा
जीन घुटका ... घुटका पितो
मैफिलीचे जुळती धागे
मित्रांना घरी बोलावतो .....
आकाशातून अप्सरा उतरावी
माहोल तसा होतो
बियर दिशाहीन होते
अन प्याला रिक्त होतो ....
येतात बाजूचे दाराशी
शिव्या देऊन जाती मागे
खिडकीशी सिगारेट पितो
धूरही तालात जातो ....
हो झालो अजुनी मोकळा
'अझाद' अजुनी झालो
तुज वाचून उमजत जाते
संसारात उगाच अडकतो ....
नसतेस घरी तू जेव्हा
जीन घुटका ...
आपला ,
(अझाद) विशुभाऊ
ह्या विडंबनाचा आणि माझ्या वैयक्तिक जीवनाचा काही एक संबंध नाही .... तसा आढळल्यास केवळ योगायोग समजावा ....
आपला,
(सत्यवचनी) विशुभाऊ

आल इज वेल
भारतीय लोकं म्हणजे पराकोटीचे आशावादी .... कितीही मोठा प्रसंग आला तरी
पुढे निट होइल आणि आपण सुखरूप आहोत असे समजुन चालणारे ..... हीच गोष्ट
'थ्री ईडियेट' मध्ये आमिर खान ने 'आल इज वेल' ह्या रूपत दाखवली आहे ....
त्या दिवशी इथे युनिवर्सल स्टूडियो मध्ये पण 'आल इज वेल' आणि भारतीय
मनोवृत्तिची जाम खेचली .......
पण माला आजिबात राग आला नाही.... कारण आपण असेच करतो ....
आपल्याच देशात आपली गळचेपी झाली तरी .... 'आल इज वेल'....
कल्माडीने घोटाळा केला तरी .... 'आल इज वेल'....
राजाने घोटाळा केला तरी .... 'आल इज वेल'....
कसाबने हल्ला केला तरी .... 'आल इज वेल'....
पंताप्रधानाने पैसे खाल्ले तरी .... 'आल इज वेल'....
मुसल्मानानी हैदोस घातला तरी .... 'आल इज वेल'....
.... 'आल इज वेल'........ 'आल इज वेल'........ 'आल इज वेल'........ 'आल इज वेल'....
आपला,
(आल इज वेल) विशुभाऊ ....

सोमवार, ३ सप्टेंबर, २०१२
आजी आणि नातवंड
जगातल्या प्रत्येक नात्यामध्ये एक वेगळेच समीकरण असते , त्यातल्या त्यात जर
ते आजी आणि नातवंडांचे असेल तर 'नातवंडांची काळजी आणि त्यांच्या आईला
टोमणे'!!! .....
माझ्या आजीला म्हणजे बाबांच्या आईला मुळात १० मुलं असल्याने नातवंडाची काही कमी नव्हती .... तरी मी म्हणजे मुलाचा मुलगा किंवा वंशाचा दिवा किंवा माझ्या १४ बहिणींच्या भाषेत 'दिवट्या' म्हणजे एक मोठे प्रस्थ होते .... संपूर्ण घराण्यात लाडावलेला एक आळशी आणि खादाड पोरगा म्हणजे 'मी' .... असे असून सुद्धा माझी आजी मला पाहिल्यावर , आईला बोलायची 'बिचाऱ्याची गालफट्ं बसली आहेत' ,'बरगड्या निघाल्या आहेत' , 'पोराला काही खायला देतेस कि नाही ??' वगैरे वगैरे ..... आणि ह्याने जास्तच लाडात येऊन मी केविलवाणा चेहरा करायचो आणि आई स्वस्थ पण वेगळाच भाव.......
त्या दिवशी माझ्या मुलीला पाहून आई बोलली 'किती बारीक झाली आहे !!" .... लगेच आमच्या कन्येने केविलवाणा चेहरा केला आणि बायकोच्या चेहऱ्यावर आईचा पूर्वीचा भाव दिसला.... आणि मी गालातल्या गालात हासलो ....
आपला,
(दिवट्या) विशुभाऊ

शनिवार, २५ ऑगस्ट, २०१२
नारायण आणि नाऱ्या
एक काळ होता जेव्हा नारायण नामक बालक पुढे जाऊन रामदास झाले .... आता असे घडत नाही ... कारण .......
(एका काळोख्या खोलीत नाऱ्या एकटा बसलेला असतो ..... आणि त्याची आई त्याला येऊन विचारते ...)
आई : आरे नाऱ्या इथे काय करतो आहेस ?
नाऱ्या : मी चिंता करतो आहे विश्वाची .....
आई : कार्ट्या आभ्यास काय तुझा 'बा' करणार का?? ... म्हणे चिंता करतो विश्वाची .....
आणि नाऱ्या चुपचाप जाऊन पुस्तकात डोके घालून बसतो .....
आपला,
(नाऱ्या) विशुभाऊ

शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१२
माझे काव्य लेखन
वर्ष लोटून गेले तुम्ही लोकं माझ्या दारूळ्या, प्रेमोळ्या आणि पांचट्या
ह्या ज्याला मी काव्य बोलतो (हो मीच बोलतो कारण ह्या मुक्त छंदा पलीकडील
छंदात मोडतात) त्या झेलत आहात. फक्त यमक जुळले की त्याचे काव्य किंवा कविता
होत नाही हे मला फार अलीकडेच उमगले.... त्याचे झाले असे की फार कष्टाने मी
एका जेष्ट कवींची (ते इतके मोठे आहेत की त्यांचे नाव कानाला हात लावून पण
घेऊ शकत नाही) भेट घेतली, आणि अति उत्साहाने त्यांना माझ्या कवितांची चोपडी
दाखवली ....
ते : अच्छा !!! तर तू कवि आहेस .... कवि चा वी र्हस्व की दीर्घ ? ...
मी फक्त 'कवी विशुभाऊ' ह्या चोपडी वर लिहिलेल्या अक्षरां कडे पाहत होतो ....
ते : तू कुसुमाग्रजांची 'विशाखा' वाचली आहे का ?
मी : कणा वाचली आहे ...
ते : शाब्बास म्हणजे विशाखा हा कविता संग्रह असून कणा त्यातली एक आहे हे सुध्दा माहित नाही .... तू एवढ्या थोर कवीचे साहित्य वाचत नाहीस तर मी तुझ्या कविता का वाचाव्यात ????
मी मुस्कटात मारल्या सारखा झालो ... आणि चोपडी उचलायला गेलो .... तर ते म्हणाले थांब बघू तरी .... त्यांनी आधल्या मधल्या चार पाच चाळल्या आणि म्हणाले ...
ते : कल्पना चांगली आहे .... पण वाचन हावे ..... नुसते यमक जुळवले की काव्य होत नाही ...
मी झक मारल्या सारखा झालो होतो ... पाया पडलो आणि काढता पाय घेतला .....
नंतर ठरवले वाळींब्यांच्या व्याकरणाचा आयचा घो !!! आपण आपल्याच ओळ्यांना आणि पांचट्यांना काव्य बोलायचे !!!
आपला,
(आडाणी कवि) विशुभाऊ

सोमवार, २३ एप्रिल, २०१२
गुजराती बोली ... आणि रस्त्यावर होडी !!!
रविवारी भल्या पहाटे ११ वजता आहमेदाबाद मधल्या हरिवंश सिंह सिसोदियाचा फोन आला ...
" विशुभाई क्या छो ??? जल्दी ऑफिस आना !!!"
मी : " गांडा क्या हुआ ??? सुबह सुबह परेशान कर राहा है ?"
तो : " विशुभाई मैने होडी ली !!! वोह दिखानी है !!!"
मी: " अबे construction का धंदा छोडके मच्छीमार बानोगे क्या ?"
तो: " मै क्यू construction का धंदा बंद करुंगा??? मैने होडी घुमने केलीये लिया !!"
मी: " कहा घुमोगे साबरमती मे ??"
तो: " विशुभाई ... मैने होडी नही ओडी लिया है .... वोह चार कंगन वाली गाडी !!"
मी: " यडझव्या .... ऑडी बोलते है रे उसको .... !!!"
पुलंचा डायलॉग आठवला तेव्हा .... " मला फक्त नीट बोलता येत होतं... त्याला ती विकात घेऊन चालवता येत होती !!!"..........
आपला,
(होडी स्वार) विशुभाऊ

मंगळवार, ३ जानेवारी, २०१२
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)