हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

सोमवार, २४ सप्टेंबर, २०१२

हा खेळ पैश्यांचा....

कंपनीत खेळ चाले, या गूढ संख्यांचा 
संपेल न कधीही, हा खेळ पैश्यांचा 

हा बॉस ना स्वयंभू, उगाच ज्ञान वाटतो हा 
इन्फ्लेशन मध्ये अभिशाप भोगतो हा 
यशात घेई भागीदारी, हा दूत असुरांचा 

आभास ऍप्रेजल हे असते खरे गाजर 
जे इन्क्रिमेंट मिळे ते, असतो नितांत भास 
अनंदतात बाकीचे, हा दोष त्या बावळटांचा  

या साजिर्या क्षणाला, प्याला असावा मुठीत 
ओठांवरील सर्व शिव्या, लागतील त्याला खचित 
गवसेल का सूर अपुल्या?, 'अझाद' जीवनाचा .....
 
आपला,
(नोकरदार) विशुभऊ 

७ टिप्पण्या:

  1. I Subhash read this and like it I am new commer on internet and doing very much mistakes. In fact I want to write this in marathi.But can,t do.So pl.excuse me. My blog title 'I write what I see' on subhashsgugale.blogspot.in. I will try to write in marathi as early as possible.thanks.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. नमस्कार ! अंतरजालावर आणि ब्लॉगींग विश्वात आपले स्वागत आहे . . . मराठी मध्ये टंकण करण्यासाठी तुम्ही गुगलचे फोनेटिक कि-बोर्ड टूल 'इन्डीक' (indic) किंवा बारहा (www.baraha.com) सॉफ्टवेअर वापरू शकता!!! तुम्हाला काही प्रश्न असल्याच कधीही संपर्क साधावा . . .
      आपला,
      (मदतगार) विशुभाऊ

      हटवा