सिंगापूर मध्ये 'लिटील इंडिया' नावाचे एक ठिकाण आहे ... इथे आल्यावर
तामिळनाडू मध्ये असल्याचा भास होतो .... इडली , डोसा , रस्सम , पोंगल ,
केळीची पाने , पुजेची साहित्य विकणारी दुकाने , दक्षिण भारतीय पध्दतीची
देवळं सगळे सगळे तंतो तंत.... हे झाले लिटील इंडियाच्या केंद्र भागाचे
वर्णन.... त्याचा आजूबाजूला बरीच तमिळ इतर वस्ती आहे, त्यात इतर भारतातले
लोकं, बांगलादेशी , पाकिस्तानी , श्रीलंकन राहतात व त्यांना इथे 'इंडिअन'
असेच संबोधले जाते ... व ते सुद्धा स्वतःची ओळख 'इंडिअन' म्हणूनच करून
देतात .....
आता एखाद्या मुसलमानाने सांगितले कि तो पंजाबचा आहे कि
नक्की समजायचे हा पाकिस्तान चा आहे .... एखाद्या बंगाली बोलणाऱ्या
मुसलमानाने सांगितले कि तो कोलकात्याचा आहे कि समजायचे हा बांगलादेश चा आहे
.... पण सगळे इथे शहाण्या सारखे राहतात .... मुळात इथल्या कडक कायदा
व्यवस्थेने सगळ्यांना 'चड्डीत' ठेवले आहे ...
माझ्या सारख्या अन्नार्थी
माणसा साठी हे ठिकाण म्हणजे स्वर्गच !.... इथे भारतीय जेवणाची बरीच दुकाने
आहेत .... सिंगापूर मध्ये मुसलीम संख्येने जास्त असल्याने त्यांनी
मुसलमानांसाठी योग्य अशी खानावळ दर्शवण्यासाठी 'हलाल' सर्टीफिकेशन चालू
केले आहे .... मुसलमानांसाठी जे खाणे 'हराम' आहे उदाहरणार्थ डुक्कर किंवा
दारू वगैरे इथे विकले जात नाही ..... लिटील इंडिया मधल्या जवळ जवळ सगळ्याच
खानावळी हलाल सर्टीफाईड आहेत .... ह्या खानावळी हिंदू ग्राहकांना आकर्षित
करायला 'गोमांस' सुध्दा विकत नाहीत .... एकूण आपल्यासाठी बेस्ट जागा आहे हि
जेवण्या साठी .....
इथेच पुढे 'मुस्तफा' नावाचे भले मोठे सुपरमार्केट
आहे .... झेंडू बाम पासून एम.डी.एच. मसाल्या पर्यंत सगळे सगळे भारतीय
प्रोडक्ट्स इथे मिळतात.... सिंगापूर मध्ये राहणारे भारतीय मोस्टली
महिन्याचे सगळे सामान इथूनच भरतात ... पण इथे येण्या साठी शनिवार आणि
रविवार हे दिवस मुख्यत्वे टाळा.... सगळा लेबर क्लास ह्या दोन दिवसात इथे
मोकाट सुटलेला असतो .... संध्याकाळच्या विरार ट्रेनला जेवढी गर्दी नसते
तेवढी इथे असते ....
लिटील इंडिया मध्ये आल्यावर सगळेच भारतीयच दिसतात
त्यामुळे प्रवासी न्यूनगंड इथे आजीबात येत नाही .... तसेही म्हणा
सिंगापुरात इतर ठिकाणी गेल्यावर सुध्दा तुम्ही परदेशी म्हणून तुमच्या कडे
कोणी वळून वळून पाहत नाही व त्यात कोणी भारतीय समोरून आला तरी तो पाहून न
पहिल्या सारखे करून निघून जातो ....
आपला,
(लिटील इंडिअन) विशुभाऊ
gammat vatli vachun. Tumchi pravas katha liha na.
उत्तर द्याहटवा