हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

शनिवार, २२ सप्टेंबर, २०१२

उचकी

भर दुपारी स्वप्नातील खडखडाटने दरवाजा उघडला
पहिले तर घरचे
भारतातून
आले होते
येताना मोदक, पुरणपोळ्या आणि वालाची खिचडी आणली होती
ती ह्या गणपतीतील माझी वाटणी होती ....
डोळे उघडले तर पहिले घरात कोणी नव्हते
ताट खरकटे होते
पुरणाची चव जिभेवर होती
माहित आहे आईला आज उचकी लागली होती .....
आपला,
विशुभाऊ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा