हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २४ सप्टेंबर, २०१२

हा खेळ पैश्यांचा....

कंपनीत खेळ चाले, या गूढ संख्यांचा 
संपेल न कधीही, हा खेळ पैश्यांचा 

हा बॉस ना स्वयंभू, उगाच ज्ञान वाटतो हा 
इन्फ्लेशन मध्ये अभिशाप भोगतो हा 
यशात घेई भागीदारी, हा दूत असुरांचा 

आभास ऍप्रेजल हे असते खरे गाजर 
जे इन्क्रिमेंट मिळे ते, असतो नितांत भास 
अनंदतात बाकीचे, हा दोष त्या बावळटांचा  

या साजिर्या क्षणाला, प्याला असावा मुठीत 
ओठांवरील सर्व शिव्या, लागतील त्याला खचित 
गवसेल का सूर अपुल्या?, 'अझाद' जीवनाचा .....
 
आपला,
(नोकरदार) विशुभऊ 

शनिवार, १५ सप्टेंबर, २०१२

:: भारुड ::

लवकर पाव गं  मला | भारत आई रोडगा वाहिन तुला ||१||
किटली आमची इटलीतून आली | इकडेच खपव गं तिला ||२||
सरदार आमचा कोळसा खातो | अतिसार होऊ दे त्याला ||३||
जावई ह्यांचा गोळीबार करतो | फाशी होऊ दे त्याला ||४||
बारामतीचा बोका खाव खाव करतो | कॅन्सर होऊ दे त्याला ||५||
भ्रष्टाचार मारून आहुती देईन | 'अझाद' कर गं मला ||६||
एकदाचे शेवटी सगळेच जाऊ दे । फक्त सज्जन राहू दे आम्हा ||७||
आपला,
(भारुडी) विशुभाऊ

गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१२

:: खंजीर ::

गैरोंकी चाहत मे मुहाजिर बन बैठे
आपनोंकी आखों मे अंगार बन बैठे ....

मजहब के नाम पे राह चले तो थे
आपनेही घर मे महेमान बन बैठे ....

इलहा की मर्जी पाने फितुर कर गए
तेरेही दरबार मे गुन्हेगार बन बैठे ....

अल-शुकर बनने की चाहत रखते थे
खुद ही खुदमै काफिर बन बैठे ....

ये गुमन आलम से 'अझाद' कर दे
हिन्दोस्तां मे देशद्रोही ना बन बैठे ....

__________________________________

मुहाजिर (भरतीय मुसल्मानोंको पाकिस्तान मे ये नाम से ठुकराया जाता है), इलहा (परमेश्वर,अल्ला), फितुर (दोष, गलती), अल-शुकर (जो काफिर नहि है), काफिर (नास्तीक), गुमन (भ्रम), आलम (विश्व). . .

मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१२

::दारूळी:: नसतेस घरी तू जेव्हा ... ( संदिप खरे ची माफी मागुन)

नसतेस घरी तू जेव्हा
जीन घुटका ... घुटका पितो
मैफिलीचे जुळती धागे
मित्रांना घरी बोलावतो .....

आकाशातून अप्सरा उतरावी
माहोल तसा होतो
बियर दिशाहीन होते
अन प्याला रिक्त होतो ....

येतात बाजूचे दाराशी
शिव्या देऊन जाती मागे
खिडकीशी सिगारेट पितो
धूरही तालात जातो ....

हो झालो अजुनी मोकळा
'अझाद' अजुनी झालो
तुज वाचून उमजत जाते
संसारात उगाच अडकतो ....

नसतेस घरी तू जेव्हा
जीन घुटका ...

आपला ,
(अझाद) विशुभाऊ
ह्या विडंबनाचा आणि माझ्या वैयक्तिक जीवनाचा काही एक संबंध नाही .... तसा आढळल्यास केवळ योगायोग समजावा ....
आपला,
(सत्यवचनी) विशुभाऊ 

शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१२

माझे काव्य लेखन

वर्ष लोटून गेले तुम्ही लोकं माझ्या दारूळ्या, प्रेमोळ्या आणि पांचट्या ह्या ज्याला मी काव्य बोलतो (हो मीच बोलतो कारण ह्या मुक्त छंदा पलीकडील छंदात मोडतात) त्या झेलत आहात. फक्त यमक जुळले की त्याचे काव्य किंवा कविता होत नाही हे मला फार अलीकडेच उमगले.... त्याचे झाले असे की फार कष्टाने मी एका जेष्ट कवींची (ते इतके मोठे आहेत की त्यांचे नाव कानाला हात लावून पण घेऊ शकत नाही) भेट घेतली, आणि अति उत्साहाने त्यांना माझ्या कवितांची चोपडी दाखवली ....
ते : अच्छा !!! तर तू कवि आहेस .... कवि चा वी र्हस्व की दीर्घ ? ...
मी फक्त 'कवी विशुभाऊ' ह्या चोपडी वर लिहिलेल्या अक्षरां कडे पाहत होतो ....
ते : तू कुसुमाग्रजांची 'विशाखा' वाचली आहे का ?
मी : कणा वाचली आहे ...
ते : शाब्बास म्हणजे विशाखा हा कविता संग्रह असून कणा त्यातली एक आहे हे सुध्दा माहित नाही .... तू एवढ्या थोर कवीचे साहित्य वाचत नाहीस तर मी तुझ्या कविता का वाचाव्यात ????
मी मुस्कटात मारल्या सारखा झालो ... आणि चोपडी उचलायला गेलो .... तर ते म्हणाले थांब बघू तरी .... त्यांनी आधल्या मधल्या चार पाच चाळल्या आणि म्हणाले ...
ते : कल्पना चांगली आहे .... पण वाचन हावे ..... नुसते यमक जुळवले की काव्य होत नाही ...
मी झक मारल्या सारखा झालो होतो ... पाया पडलो आणि काढता पाय घेतला .....
नंतर ठरवले वाळींब्यांच्या व्याकरणाचा आयचा घो !!! आपण आपल्याच ओळ्यांना आणि पांचट्यांना काव्य बोलायचे !!!

आपला,
(आडाणी कवि) विशुभाऊ

शुक्रवार, ४ मार्च, २०११

मै शायर तो नही. . . .

ज्या प्रमाणे जे फक्त स्वतः साठी गातात त्यांना 'बाथरूम सिंगर' म्हणतात , त्याच प्रमाणे स्वतः साठी कविता लिहिणाऱ्यां साठी पण एखादा शब्द पाहिजे. मी स्वतः साठी कविता करतो (खरं तर यमक जुळवतो). तरी शायरी आणि गझल हे माझे खास आवडीचे विषय.
इयत्ता चौथीत असताना मी पहिल्यांदा प्रेमात पडलो आणि मार्झा गालिब माझे सोबती झाले. मला उर्दू तर येत नव्हती पण आर्थ समजून उगाच त्याचे मराठीत भाषांतर/भावांतर करत 'तिला' ऐकवत आलो. गेल्या काही दिवसान पासून मी उर्दू जरा मनावर घेऊन अभ्यास चालू केला, व एक गझल सर्दुष्य काव्य केलं ( ह्यात रदीफ आहे पण काफिया जुळला नाही) , पहिलाच प्रयत्न म्हणून मातला आणि मकता मध्ये संपवले.

काफिया है पर रदिफ नही , मतला है पर मकता नही ।
अरे कमिनो ये मेरी जिंदगी है , कोई गज़ल नही ।

नही रोक सकती तुझे कोई सऱहदे , ना कोई इनसान की सलाखे ।
'आझाद' तेरी खुदा से बंदगी है, कोई काफिरोंका बंदी नही ।

इथे काफिर म्हणजे 'माणुसकी नसणारा' ह्या अर्थाने आहे , व 'आझाद' हे माझे तखल्लुस .....

आपला,
(आझाद) विशुभाऊ

शनिवार, १० ऑक्टोबर, २००९

बाबा

    आज सिध्दार्थ च्या सांगण्यावरून पुर्वी न उमगलेल संदिप चे " दमलेल्या बाबाची कहाणी" हे गाणे आई ऎकले, खरच काळीज फाडणारे गाणे आहे. खरेतर हे गाणे म्हणजे संदिप ने स्वतःच्याच गाण्याला "दूरदेशी गेला बाबा..." ला दिलेले उत्तर.... आता बाबा झाल्यावर त्या पद्यातील दर्द, आणि आश्रू कळले....

    आज काल घरातील आई आणि बाबा हे दोघेही नोकरी करतात आणि त्यामुळे ज्या बाळाला जास्त गरज असते, त्यालाच वेळ देऊ शकत नाही.... संदिप च्या कवितेतली छोटी मुलगी ,आई वडिलांच्या आठवणीने व्याकूळ झालेली.... बिचारी एकटीच घरी...

        कसा चिमणासा जीव , कसाबसा रमवला
        चार भिंतित धावुन दिसभर दमवला
        ' आता पुरे ! झोप सोन्या..' कुणी म्हणतच नाही ॥
लहान असताना, माझी आई दुपारी मला जवळ घेउन ’आता पुरे ! झोप सोन्या...’ बोलायची.... पण माझ्या सोनाला तर मी पाळणा घरात ठेवले !

        कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी ?
        कोणी बोलायाला नाही...कशी व्हावी कट्टी-बट्टी ?
        खेळ ठेवले मांडून ... परि खेळगडी नाही ॥
शाळेला सुट्टी म्हणजे मजा असे वाटणारा मी... पण माझी पोर सुट्टी च्या नावने खिन्न होते कारण.. तेच "खेळ ठेवले मांडून ... परि खेळगडी नाही"...


        दिसे खिडकीमधुन जग सारे , दिशा दाही
        दार उघडुन तरी तिथे धावायचे नाही
        फार वाटे जावे परी - मुठीमध्ये बोट नाही ॥
मी लहान असताना वाटेल तेव्हा आई-बाबांचे बोट धरून बाहेर फिरायला जात असे, पण माझ्या छोटीच्या मुठीमध्ये मात्र माझे बोट नाही..

        नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही
माझ्या पोरीच्या डोळी झोप दाटली आहे.... आणि मी द्रुष्ट घरी नाही.....

ह्या सर्व दिवसात स्वतःच दमून भागुन माझी परी झोपली... आणि मी घरी येतो व चालू होते "दमलेल्या बाबाची कहाणी"......

संदिप तुला त्रिवार सलाम !!!!!!!!

आपला,
(एक बाबा) विशुभाऊ..

बुधवार, १७ जून, २००९

आयुष्याच्या अल्बममध्ये

आमच्या तिर्थरुपानी पाठवलेल / खरडलेल काव्य आपल्या आस्वादासाठी !! आपला, (नम्र) विशुभाऊ


--


आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात




धन्यवाद
विकास रणदिवे
प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही. कधी ना कधी ते पळणार्‍याला गाठतातच
पळवाटा मुक्कामाला पोहोचवत नाहीत. मुक्कामाला पोहोचवतात ते सरळ रस्तेच ...


बुधवार, १९ नोव्हेंबर, २००८

अंधाराची वाट


अंधाराची वाट फार सुलभ होती ...
उजेडात ती फारच दूर होती .....

मती माझी फार सुविचारी होती ...
आंती शिक्षा फारच अती होती ....

उलट्या प्रवाहातील नाव सुखी होती ...
प्रवाहा बरोबर दिशा मात्र चुकली होती ....

दैवाची खेळी अत्यंत सुंदर होती ...
पामराच्या झोळी दुःख़्ख़ाची सोंगटी होती ...

आपला ,
(पामर) विशुभाऊ

गुरुवार, ६ नोव्हेंबर, २००८

चहा टपरी ....


मृदु भावनांचा हेतु त्याचा साधा
प्रिये , प्रेमाने पाजेन एक कटिंग प्याला
आधी घे मस्त झुरका मग एक घोट त्यातला
सर्वांचे स्वागत करतो चहा टपरी वरचा प्याला ||

ओझे जीवनाचे वाहत तो गेला
जिव त्याचा विसावला घेउन एक प्याला
क्षीण घालवून , विचार सुचवून दिला त्याला
सर्वांचे मन खुलवे तो चहा टपरी वरचा प्याला ||

मित्रा हा जिव तुझा झाला, सर्वांचा तू होउन गेला
किटलीत भरून तुला , हा झाला चहावाला
त्यासी देऊन पैका , तो झाला जीवनवाला
सर्वांचे मन जिंकले तो चहा टपरी वरचा प्याला ||

जरी जवळ उभी ती मधुशाला
मला हवे चहा टपरी वरचा प्याला ||

आपला,
(चहाप्रेमी) विशुभाऊ

बुधवार, ५ नोव्हेंबर, २००८

असा माझा जीवन धडा


हजार काळीजे दुखावित गेलो,
आले शिव्या शाप पाचवित गेलो....
आयुष्याचा भरतो घडा,
' असा माझा जीवन धडा ' ....

स्वप्नांचा मार्ग फार खडतर होता ,
माझा गुन्हा फार मोठा होता....
आयुष्याचा भरतो घडा,
' असा माझा जीवन धडा ' ....

यशाच्या शिड्या चढत गेलो,
मागचे सगळे विसरत गेलो ...
आयुष्याचा भरतो घडा,
' असा माझा जीवन धडा ' ....

आपेक्षांचा डोंगर मोठा होता,
पण माझा दृष्टिकोन बोथट होता...
आयुष्याचा भरतो घडा,
' असा माझा जीवन धडा ' ....

आपला,
(जिवनपंथस्त) विशुभाऊ

सोमवार, ३ नोव्हेंबर, २००८

दिवस


दिवस असे घालवतो मी
जसे आश्रू गाळतो कोणी ....

आरसा पाहून समाधान झाले
मला ह्या घरात माझे आहे कोणी .....

पिकत आहे झाडावर फ़ळ कदाचित
परत दगड मारत आहे कोणी ......

बर्याच वेळाने पसरते शांतता
जसे मला बोलवत आहे कोणी .......

आपला,
(खिन्न) विशुभाऊ


(एका हिन्दी गझल वर आधारित)

बुधवार, २९ ऑक्टोबर, २००८

मी आणि तू ...........

तू सुंदर , तू प्रेमळ आसे मी तुझ्या कडे पहात होतो ....
काय करणार तेव्हा मी प्रेमात होतो ...............

तू समंजस , तू मनमेळावू आशी माला वाटत होती......
काय करू तेव्हा माझी मती भ्रष्ट होती .................

प्रेम , आनंद , सुख सगळच मिळेल असे मला दिसत होते ......
काय करणार ते सगळे स्वप्नच होते ........

तू माझी , मी तुझा आसे सगळ्याना दिसते .......
काय करू दिसते तसे नसते ...............

प्रिये तू खरच चांगली आसते जेव्हा तू प्रश्न कमी विचरतेस ..............
काय करणार जास्त उत्तरां मध्ये खोटे दडलेले आसते ...........

तुझा,
(प्रियकर) विशु ........
__________________________________

सूचना:
ह्या कवितेचा आणि माझ्या खासगी जीवनाचा काहीही संबंध नाही, संबंध वाटल्यास तो केवळ योगायोग समजावा.
वाचकांचा विवेक आवश्यक आहे.
आपला,
(सत्यवचनि) विशुभाऊ

सोमवार, २७ ऑक्टोबर, २००८

विशाल .... शादी और दारू !!!!

लग्न हा आयुष्यातील एक आनंदाचा (?) क्षण ( क्षणभंगुर), आसाच एक क्षण माझ्या मित्राच्या आयुष्यात फार लवकरच येणार आहे .... लवकर म्हणजे पुढील महिन्याच्या ३० तारखेला ..... त्याचा आनंद त्याला शब्दात आणि वाक्यात वार्तवता येत नव्हता , म्हणुन मी माझ्या शब्दात आणि काव्यात वर्तवला आहे ..... देव विशाल च्या आयुष्यात शान्ति देओ हीच प्रार्थना ..........

विशाल करने जा रहा है शादी ,
मानू खुशी , या रोकू उसकी बर्बादी ..........

शादी के बाद जो हालत होगी उसकी
तडपेगा, तरसेगा पर नसीब नही होगी व्हिस्की ........

गया था गोवा उठाया उसने ग्लास फेनी का
रख दिया बिना पिए, बोला चेहरा नजर आया "would be" शेरनी का ................

लगाता था कश पे कश और दम पे दम
आज थर्रा उठता है दिल उसका देख के प्याला रम ....................

शादी के पहले की गीन रहा है दिन
लाओ उसको इंसानों में पिला के दो गिलास जिन ...............

शादी के खर्चे से हो रहा जेब से कड़का
नही करता शादी बच ता खर्चा तो रोज़ पि सकता था वोडका ...........

एक बात है मेरे Dear
शादी है वो बियर मेरे भाय
जो पिए वो पचताये, ना पिए वो प्यासा रह जाय ....................

आपला,
(कळजीवाहु) उपेन्द्र

गुरुवार, १६ ऑक्टोबर, २००८

मराठा बाणा !!!!!

कोण होतास तू काय झालस तू ,
असा कसा अभिमान विकलास तू .....

मर्दाची छाती होती , अभिमानी मान होती,
अंगात धमक होती , हातात ताकद होती ......

राजा शिवाजी होउनी जन्म घेतलास तू .....

कोण होतास तू काय झालस तू ,
असा कसा अभिमान विकलास तू .....

छाती आता आत गेली , मान ही ती खाली घातली ,
नामर्दी अंगात भरली , हाताची ही ताकद गेली ......

आराक्षणाने ईज्जत घालवून घेतलीस तू ......

कोण होतास तू काय झालस तू ,
असा कसा अभिमान विकलास तू .....

आपला ,
(मराठा अभिमानी) विशुभाऊ