हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

बुधवार, ५ नोव्हेंबर, २००८

असा माझा जीवन धडा


हजार काळीजे दुखावित गेलो,
आले शिव्या शाप पाचवित गेलो....
आयुष्याचा भरतो घडा,
' असा माझा जीवन धडा ' ....

स्वप्नांचा मार्ग फार खडतर होता ,
माझा गुन्हा फार मोठा होता....
आयुष्याचा भरतो घडा,
' असा माझा जीवन धडा ' ....

यशाच्या शिड्या चढत गेलो,
मागचे सगळे विसरत गेलो ...
आयुष्याचा भरतो घडा,
' असा माझा जीवन धडा ' ....

आपेक्षांचा डोंगर मोठा होता,
पण माझा दृष्टिकोन बोथट होता...
आयुष्याचा भरतो घडा,
' असा माझा जीवन धडा ' ....

आपला,
(जिवनपंथस्त) विशुभाऊ

३ टिप्पण्या:

 1. प्रिय विशाल,

  जीवन अजून खुप जगायचे आहे तुला,
  तरी खुप लहानपणीच समझ आली तुला,
  आयुष्य एकदाच मिळत मनुष्याला,
  ह्या पुढे नीट जप त्या क्षणांना...

  माणुस स्वप्न बघतो जगण्यासाठी,
  चुका करतो ते स्वप्न पुर्ण करण्यासाठी,
  जीवनात काय खडतर नसत!!!
  खंबीर उभा रहा ते स्वप्न पुर्ण करण्यासाठी...

  यशाच्या शिड्या चढल्याच पाहीजेत,
  जुनं सारं विसरलेच पाहीजे,
  त्याशिवाय आयुष्यात नावीन्य काय?
  रोज आयुष्य पुन्हा जगायला पाहिजे...

  अपेक्षा आपलीच मणसं करतात,
  बोथट गोष्ट मवाळ असतात,
  आयुष्याचा भर सौख्याने घडा,
  हाच तुझा जीवन धडा...

  उत्तर द्याहटवा
 2. अप्रतिम प्रिये अप्रतिम !!!!
  मला तुझा अभिमान वाटतो !!!!

  तुझा,
  विशु

  उत्तर द्याहटवा
 3. माझे कौतुक केल्या बद्दल तुमचे आभार,
  कामाच्या रगाड्यात माझ्यातल्या हरवलेल्या ह्या गुणाची परत आठवण करुन दिल्याबद्दल तुमचे आभार...

  सदैव तुमची प्रिय
  उर्वशी...

  उत्तर द्याहटवा