हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

शनिवार, १५ नोव्हेंबर, २००८

विष्णु दशावतारविष्णु चे दशावतार हे खरे मनुष्याची उत्क्रांति दर्शवतात आसे माझे वयक्तिक मत आहे. लहान पणी थोरल्यां कडून दशावाताराच्या गोष्टी ऐकताना माला नेहमी मनुष्याची उत्क्रांति ही जलचरा पासून भूचरा पर्यन्त कशी झाली हे आगदी डोळ्या समोर दिसत असे.......
माझ्या अनुमानाचा खुलासा मी खालील आवतारां बरोबर केला आहे !

१) मत्स्य : मनुष्या चा मुळ पूर्वज हा माश्या प्रमाणे पाण्यात जन्मला व वाढत गेला, तेव्हा तो पूर्ण जलचर होता.
२) कुर्म : कुर्म म्हणजे कासव, हा उभयचर प्राणि , तेव्हा मनुष्याचा पूर्वज जमिन आणि जल दोन्ही कड़े नांदू लागला.
३) वराह : वराह हा पूर्ण भूचर प्राणी , आजुनही मनुष्य हा जंगली होता व बुद्धि हा आलंकर प्राप्त झाला नव्हता.
४) नरसिंह : ईथे तो मनुष्य बनण्याच्या वाटेने प्रगति चालू झाली होती , तरी ही तो अर्धा श्वापदच होता.
५) वामन : वामन म्हणजे छोटा ! ह्या आवताराची तुलना आपण सध्या असलेल्या वानरं बरोबर करू, पण ईथे बुद्धि प्राप्त होती!
६) परशुराम : ईथे मनुष्य हत्यार वापरू लागला , आपल्या बुद्धि चा कुशल वापर करू लागला.
७) राम : ईथे मनुष्य राज्य कारभार , व्यापर, निति , आणि युद्ध ह्या सर्वांचा वापर करू लागला.
८) कृष्ण : हा आवतार मनुष्या मध्ये आलेला नटखट पणा आणि स्वार्थी पणा ह्या भावना दाखवतो.
९) बुद्ध : हा खरा आवतार ज्यात आपण सध्या जगत आहोत, ह्या मध्ये आध्यात्म, विज्ञान आणि इतर प्रगति दाखवली आहे.
१०) कलि : ह्या आवतार आजुन झाला नसल्याने मलाही प्रश्नचिन्ह आहे.

आपला,
(अभ्यासू) विशुभाऊ
_______________________________________________________________
सूचना :
हा लेख कोणा ही धर्माची भावना दुखवण्या साठी नसून फक्त ईथे माझे मत मांडले आहे.
आपला ,
(नम्र) विशुभाऊ

1 टिप्पणी:

  1. हे भन्नाट निरीक्षण आहे. अगदी नोंद घ्यावी असं. तुझा खुलासादेखिल अगदी योग्य आहे...

    उत्तर द्याहटवा