हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २००८

वश्या पैसे गोळा केलेस की नाही ????

वश्या मुम्ब्रामाधिल आतंकवादी इशरत च्या घरच्याना तू चार वर्षां पूर्वी १ लाख दिले होतेस , आता आर्थिक मंदी मुळे सधाहरण ५-६ लाख तरी मारल्या गेलेल्या आतंकवादी लोकांच्या घरच्याना दिले पाहिजेस ......
एक काम कर , मुम्ब्रा आणि कुर्ल्या मध्ये भरपूर चंदा गोळा होइल, तिथे करवंटी घे आणि आतंकवादी लोकां साठी भिक माग !!!!!!!!!!!!!!!!!!!

आपला,
(कुचकट) विशुभाऊ

आपले काम ...


आतेरेकींना माफ़ करणे हे यमाचे काम आहे , पण त्यांना यमसदनी पोहचवणे हे आपले काम आहे !!!!

( एका आलेल्या इंग्रजी SMS वर आधारित )

आपला,
(कार्यतत्पर) विशुभाऊ .....

गुरुवार, २७ नोव्हेंबर, २००८

हामल्याचे २४ तास ....


अतेरेकी हामल्याचे २४ तास पूर्ण झाले तरी आजुन चकमक थांबलेली नाही आणि ह्या वरुन आस लक्षात येते की कोणत्याही माणसाला २४ तास युद्ध करता यावे ईतका दारू गोळा पाठीवरून घेउन जाता येणार नाही , म्हणजेच शस्त्रा आस्त्र आधी पासुनाच त्याजागी पोहोचावलेले होते आणि ह्या कटा मध्ये ईतर HOTEL मधील लोक सुद्धा सहभागी झाले आसण्याची दाट शक्यता आहे !!!!

स्वामी कृपा करोत आणि आमचा ज्या लोकांवर विश्वास आहे ते गद्दार नसोत !!!!!!!!!

आपला,
(संशयी) विशुभाऊ

बेजबाबदार न्यूज चैनल्स !!!!!!!!!!!!


दीड दम्डिच्या रेटिंग साठी हे अगाऊ न्यूज चैनल वाले सर्व सुरक्षा व्यवस्था धाब्यावर बसवून , मिळेल ते आणि समजेल तसा टीवी वर दाखवतात... ह्याचे उदहारण म्हणजे हेमंत करकरे यांचा झालेला मृत्यु , टीवी वर हेमंत सहिबानी केलेले सुरक्षा व्यवस्था दाखवल्या मुळेच आतंकवादी लोकानी त्यांच्या कंठावर नेम धरून गोळी घातली .........
ह्याचे फायदे कोणाला झाले ?

१) आतंकवादी लोकानाचा उत्साह वाढला
२) न्यूज चैनल वाल्याना सनसनी बातमी मिळाली.
३) साध्वी प्रज्ञा वरची एक तलवार कमी झाली !!!!!

आबा ह्या वेळेला कोणा कडून नुकसान भरपाई करून घेणार ??????

स्वामी हेमंत साहेबांच्या आत्म्याला शान्ति देऊन बाकी लोकाना थोड़ी आक्कल देतील आशी माला खत्री आहे ....

आपला,
(दुख्खी) विशुभाऊ

शनिवार, २२ नोव्हेंबर, २००८

हिन्दी चीनी भाई भाई !!!!

काल दुपारी चाहा घेण्यासाठी मी आणि माझा मित्र उपेन टापरी वर गेलो , चाहा बरोबर मस्त कुस्खुषित भय्या हा विषय चघळत होतो आणि तोच आमची नजर एका चीनी घोळक्यवर गेली.... ते कोणी ही कुठल्याही IT कंपनी मध्ये किंवा भारत भेटी वर आलेले पर्यटक नव्हते तर होते मजूर म्हणुन भारतात आलेले चीनी माथाडी कामगार.
स्वस्त चीनी वस्तूंचे आपण स्वागत नक्कीच केले पण ह्या कमगारांना कसे आवरणार ??? ही लोक भय्या लोकां पेक्षा स्वस्तात काम करतात .... आता मराठी पणा सोडा भारतीय पणा तरी राखा.......

आपला,
(चिंताग्रस्त) विशुभाऊ

बुधवार, १९ नोव्हेंबर, २००८

अंधाराची वाट


अंधाराची वाट फार सुलभ होती ...
उजेडात ती फारच दूर होती .....

मती माझी फार सुविचारी होती ...
आंती शिक्षा फारच अती होती ....

उलट्या प्रवाहातील नाव सुखी होती ...
प्रवाहा बरोबर दिशा मात्र चुकली होती ....

दैवाची खेळी अत्यंत सुंदर होती ...
पामराच्या झोळी दुःख़्ख़ाची सोंगटी होती ...

आपला ,
(पामर) विशुभाऊ

शनिवार, १५ नोव्हेंबर, २००८

विष्णु दशावतार



विष्णु चे दशावतार हे खरे मनुष्याची उत्क्रांति दर्शवतात आसे माझे वयक्तिक मत आहे. लहान पणी थोरल्यां कडून दशावाताराच्या गोष्टी ऐकताना माला नेहमी मनुष्याची उत्क्रांति ही जलचरा पासून भूचरा पर्यन्त कशी झाली हे आगदी डोळ्या समोर दिसत असे.......
माझ्या अनुमानाचा खुलासा मी खालील आवतारां बरोबर केला आहे !

१) मत्स्य : मनुष्या चा मुळ पूर्वज हा माश्या प्रमाणे पाण्यात जन्मला व वाढत गेला, तेव्हा तो पूर्ण जलचर होता.
२) कुर्म : कुर्म म्हणजे कासव, हा उभयचर प्राणि , तेव्हा मनुष्याचा पूर्वज जमिन आणि जल दोन्ही कड़े नांदू लागला.
३) वराह : वराह हा पूर्ण भूचर प्राणी , आजुनही मनुष्य हा जंगली होता व बुद्धि हा आलंकर प्राप्त झाला नव्हता.
४) नरसिंह : ईथे तो मनुष्य बनण्याच्या वाटेने प्रगति चालू झाली होती , तरी ही तो अर्धा श्वापदच होता.
५) वामन : वामन म्हणजे छोटा ! ह्या आवताराची तुलना आपण सध्या असलेल्या वानरं बरोबर करू, पण ईथे बुद्धि प्राप्त होती!
६) परशुराम : ईथे मनुष्य हत्यार वापरू लागला , आपल्या बुद्धि चा कुशल वापर करू लागला.
७) राम : ईथे मनुष्य राज्य कारभार , व्यापर, निति , आणि युद्ध ह्या सर्वांचा वापर करू लागला.
८) कृष्ण : हा आवतार मनुष्या मध्ये आलेला नटखट पणा आणि स्वार्थी पणा ह्या भावना दाखवतो.
९) बुद्ध : हा खरा आवतार ज्यात आपण सध्या जगत आहोत, ह्या मध्ये आध्यात्म, विज्ञान आणि इतर प्रगति दाखवली आहे.
१०) कलि : ह्या आवतार आजुन झाला नसल्याने मलाही प्रश्नचिन्ह आहे.

आपला,
(अभ्यासू) विशुभाऊ
_______________________________________________________________
सूचना :
हा लेख कोणा ही धर्माची भावना दुखवण्या साठी नसून फक्त ईथे माझे मत मांडले आहे.
आपला ,
(नम्र) विशुभाऊ

बुधवार, १२ नोव्हेंबर, २००८

‘देशद्रोही’ वर महाराष्ट्रात बंदी

शिवाजी महाराजांसह मराठी माणसांचा अपमान करणा-या देशद्रोही चित्रपटावर महाराष्ट्रात राज्य सरकारने बंदी घातली आहे . राज्यातील कोणत्याही थिएटरमध्ये हा चित्रपट दाखवता येणार नाही।
वरील मटा वरील वृत्त वाचून खुप बरे वाटले !!!!!!!
स्वामी लोकाना आशीच सुबुद्धि देओत !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

आपला ,
(आनंदी) विशुभाऊ

गुरुवार, ६ नोव्हेंबर, २००८

चहा टपरी ....


मृदु भावनांचा हेतु त्याचा साधा
प्रिये , प्रेमाने पाजेन एक कटिंग प्याला
आधी घे मस्त झुरका मग एक घोट त्यातला
सर्वांचे स्वागत करतो चहा टपरी वरचा प्याला ||

ओझे जीवनाचे वाहत तो गेला
जिव त्याचा विसावला घेउन एक प्याला
क्षीण घालवून , विचार सुचवून दिला त्याला
सर्वांचे मन खुलवे तो चहा टपरी वरचा प्याला ||

मित्रा हा जिव तुझा झाला, सर्वांचा तू होउन गेला
किटलीत भरून तुला , हा झाला चहावाला
त्यासी देऊन पैका , तो झाला जीवनवाला
सर्वांचे मन जिंकले तो चहा टपरी वरचा प्याला ||

जरी जवळ उभी ती मधुशाला
मला हवे चहा टपरी वरचा प्याला ||

आपला,
(चहाप्रेमी) विशुभाऊ

आबांची झोळी आणि गोळी ला गोळी !


कुठल्या ही वृत्तपत्राच्या HeadLine मध्ये आपण आसलो की आपण यशस्वी राज्यकर्ते आहोत हे समजावे, पण त्याच HeadLine मुळे आपलाच पक्ष आपल्या विरुद्ध उभा ठाकला तर त्याचे काय होते ते बिचार्या आबानाच विचारा....
आबा खरे तर ते काम मराठी राजा चे आहे हो , त्यालाच करुद्याना आणि हो त्यात आपला पाय नका घलुत !!!

आर आर आबा आता तरी थांबा !!!!

आपला ,
(शुभचिंतक) विशुभाऊ.

बुधवार, ५ नोव्हेंबर, २००८

असा माझा जीवन धडा


हजार काळीजे दुखावित गेलो,
आले शिव्या शाप पाचवित गेलो....
आयुष्याचा भरतो घडा,
' असा माझा जीवन धडा ' ....

स्वप्नांचा मार्ग फार खडतर होता ,
माझा गुन्हा फार मोठा होता....
आयुष्याचा भरतो घडा,
' असा माझा जीवन धडा ' ....

यशाच्या शिड्या चढत गेलो,
मागचे सगळे विसरत गेलो ...
आयुष्याचा भरतो घडा,
' असा माझा जीवन धडा ' ....

आपेक्षांचा डोंगर मोठा होता,
पण माझा दृष्टिकोन बोथट होता...
आयुष्याचा भरतो घडा,
' असा माझा जीवन धडा ' ....

आपला,
(जिवनपंथस्त) विशुभाऊ

सोमवार, ३ नोव्हेंबर, २००८

दिवस


दिवस असे घालवतो मी
जसे आश्रू गाळतो कोणी ....

आरसा पाहून समाधान झाले
मला ह्या घरात माझे आहे कोणी .....

पिकत आहे झाडावर फ़ळ कदाचित
परत दगड मारत आहे कोणी ......

बर्याच वेळाने पसरते शांतता
जसे मला बोलवत आहे कोणी .......

आपला,
(खिन्न) विशुभाऊ


(एका हिन्दी गझल वर आधारित)