हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

रविवार, २५ ऑक्टोबर, २००९

भुताटकी - भाग १

आमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरले, तेव्हा बाबांनी नविनच बनलेल्या गगनचुंबी 'शितलदर्शन'नावाच्या इमारतीत ७ व्या मजल्यावर घर घेतले.

शितलदर्शन जिथे बांधली आहे त्या भागाला पुर्वी '७ माड'असे बोलत व तिथे कैद्यांना फाशी दिली जात असे. सात-माडला भुत असतात अशी गावकऱ्यांची श्रध्दा असल्याने दिवसा ढवळ्या पण तिथे कोणी फिरकत नसे व चुकून मुले खेळता खेळता गेलीच तर ते बाधा घेऊन येत असत!.. अ्शा ह्या ७-माड मघ्ये बांधलेल्या इमारतीच्या ७व्या मजल्या वरचे ७वे घर बाबांनी विकत घेतले.....

माझे बाबा मुळातच बेडर स्वभावाचे, व त्यामूळे त्यांना ह्या गोष्टींचा काही फरक पडत नव्हता... पण माझी आई तितकीच भित्र्या स्वभावाची, म्हणूनच कि काय बाबांनी आईला त्या जागेचा इतीहास काहिच सांगितला नव्हता.... लग्ना नंतर सुरवातीला आई-बाबा तिथे न रहता वाड्यावरच रहात होते... वर्षा दिड वर्षात माझ्या जन्मानंतर आम्ही तिघे शितलदर्शन मध्ये राहिला गेलो आणि ते थरारक नाट्य सुरू झाले...........

आई ला घरात काम करताना सारखे अजुन कोणी बरोबर असल्याचा भास होत असे; नविन घर आहे त्यामुळे होत असेल असे वाटून काही दिवस चुप्प बसली.... पण नंतर मी जेव्हा घरात घाबरू लागलो ओरडू लागलो , तेव्हा आईचा विश्वास बसला की काहितरी गोंधळ आहे.... त्यातच मी डायरीयाने आजरी पडलो व हॉस्पिट्ल मध्ये होतो, तेव्हड्या काळात ह्या विषयावर पडदा पडला. एकमहिन्या नंतर जेव्हा मला घरी आणले त्याच रात्री आईने बाबांना ही गोष्ट सांगितली.... व बाबांनी ती हसण्यावारी नेली.... थोड्या वेळाने बाबा धुतलेले कपडे वाळत घालत होते तेव्हा आई मागुन आली व पुन्हा तोच विषय काढून बोलू लागली, व बाबा आईची समजूत घालत होते आणि तितक्यात आतून आईचा आवाज आला " अहो, कोणाशी बोलता आहत ?" बाबांना नखशिकांत शिरशीरी गेली व बाबांनीमागे वळून पाहिले तर कोणीच नव्हते आजुबाजूला.......

आता बाबांचा पण विश्वास बसला होता की कहितरी गोंधळ आहे!... ते पण शहारले.... त्यानी आईला वचन दिले की आपण लवकरच दुसरे घर घेऊ.............. आता बाबा कामवर गेल्यावर आई मला कुशीत आणि स्वतःचा जिव मुठीत घेऊन बसत असे, कधी संध्याकाळ होते आणि बाबा घरी येतात त्याची ती वाट पहात असे........ घरा मध्ये भांडी पडणे, खिडक्यांच्या काचा फूट्णे, आवाज येणे, सारखी प्रेतयात्रा दिसणे हे प्रकार चालूच होते .....

एकदा माझी मावस बहीण आमच्या कडे राहीला आली होती.... दुपारी माझ्याशी खेळता खेळता ती जोरात किंचाळली तेव्हा आईने धावत येऊन विचारले की काय झाले?, त्या वर ती ने सांगितलेली गोष्ट ऎकून आई थंडच पडली... तीला एक म्हातारी बाई दिसत होती व ती जवळ बोलवत होती... आईने लगेच आम्हाला घेतले व तडक वाड्यावर नेले... !

बाबांनी काही दिवसात कळव्या मध्ये दुसरा फ्लॅट घेतला , आमचे सगळे सामान तिथे शिफ्ट केले फक्त आईच्या आग्रहाने बाबांनी आमच्या कुलस्वामीनीची कालिकामातेची तस्बिर दारावर ठेवली.... ती रात्र आमची शितलदर्शन मधली शेवटची रात्र होती दुसऱ्या दिवशी आम्ही नविन जागेत राहिला जाणार होतो... त्या रात्री आम्ही झोपलेलो असताना बाबांना कोणीतरी डिवचत आसल्या सारखे वाट्ले , म्हणून उठून पाहिले तर एक म्हातारी बाबांना डिवचत होती व रागा रागाने बघत होती, बाबा घाबरले पण स्वतःला सावरत त्यांनी आम्हा सगळ्यांवर हात ठेवला व त्या म्हातारी वर ओरडले व तीला चालते होण्यास सांगितले... त्या म्हातारी ने आम्हाला मारण्याचा पण केला होता पण बाबा पण हट्टाला पेटले होते.... ते तिच्या शी तावातावाने भांडत होते... तिच्यावर ऒरडत होते.. तिला शिव्या देत होते... ह्या सगळ्या आवाजात आईला जाग आली व ऊठून तिने जे दृष्य पाहिले त्याने तिची गाळण झाली... त्या म्हातारीने आई कडे मोर्चा वळवला... ती आईला सारखी दरवाज्यावरची देवीची तस्बीर काढायला सांगत होती, व बाबा तीला आडवत होते... म्हातारीला भिती दाखवत होते... ह्या सगळ्या प्रकारात जेव्हा पहिला कोंबडा अरवला तेव्हा ती म्हातारी गायब झाली व आई-बाबा आम्हाला घेऊन कळव्याला आले .... त्या नंतर आई-बाबांनी परत कधीच त्या इमारती कडे वळून पाहिले नाही....

आजही जेव्हा मी वाड्यावर जातो तेव्हा लांबून ती इमारत बघतो... ती तशीच भकास अजूनही उभी आहे !!!!

आपला,

(भुताड्या) विशुभाऊ

७ टिप्पण्या:

  1. मित्रा ह्या गोष्टीवर विश्वास ठेवावासा नाही वाटत्ये...

    उत्तर द्याहटवा
  2. कोकणात अश्या खूप गोष्टी ऐकायला मिळतात. माझा अश्या गोष्टींवर विश्वास आहे की नाही हे मी ठामपणे सांगू शकत नाही कारण माझी स्व:तची २-३ वेळा फाटलेली आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. Bhanat Story aahe.Shital Darshan Mulund lach aahe ka?Ya purvi kadhi aikle nahavta bhutaki baddal. Maze maher Mulund che ch aahe. Story aiklyawar Building labun tari baghavi watay.
    First time tumcha blog wachla, etar lekh pan chngle aahet.Tipycal CKP thinking.
    Best Luck, Keep it up.
    Archana Deshpande.

    उत्तर द्याहटवा
  4. Bhanat story aahe.Shital Darshan Mulund aahe ka? Yapurvi kadhi aikla nahi bhutatki baddal.Maz maher Mulund cha ch aahe.Story aiklyawar building labun tari baghavi watay.
    Tumcha blog first time wachla.Dusre lekhpan chan aahet.
    Typical CKP thinking.
    Best Luck.Keep it up.
    Archana Deshpande.

    उत्तर द्याहटवा