हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

तात्यासाहेब अडारकर

जैविकशास्त्राच्या पुस्तकातील माणसाच्या आकृती सारखी शरिरयष्टी, डोक्यावर टक्क्ल आणि हसरा चेहरा असे अमचे तात्यासहेब. वास्तविक पहाता तात्यासाहेब म्हणजे माझे office मधले boss, पण वागण्याने एका मित्रा पेक्षाही जास्त. कोणिही यावे आपली अडचण सांगावी व मदत घेऊन जावी असा परोपकारी माणूस... खरच ३०० वर्षातून एकदा असा माणूस जन्माला येतो, कदाचीत तुकाराम महाराजां नंतर तात्यासाहेब अडारकरच !

मासे आणि मास्याचे डोके खाऊन खाऊन झालेली तल्लख बुद्दी, अत्यंत महिनती स्वभाव आणि पराकोटीचे बियर-प्रेम.... हा माणूस खरेतर एका मराठी प्रतिभावंत कूटूंबात जन्मला... आपली प्रतिभा त्याने मदिराप्रेमी साहित्य लिहीण्यात मार्गी लावली. बियर पिण्याची मजा तात्यासाहीबांबरोबर जी आहे ती खुद्द मल्ल्याबरोबर फुकट्ची पिण्यात सुध्दा नाही..... तात्यासाहेब जेव्हा टेबलवर बसतात तेव्हा बियर पण आनंदाने फेसाळते, सोनेरी रंग आजून उजळतो आणि स्वाद अहा! इंद्राचा अमृतप्याला पण झक मारतो..... तात्यांचे नेहमीचे एक वाक्य आहे’जगात बियर हिच एक अशी गोष्ट आहे की ती पहिल्या घोटापासून शेवट्च्या घोटापऱ्यंत तशीच आणि सुंदर लागते!’ म्हणूनच तात्यांबरोबरची बियर कधीच संपू नये असे वाटते....

"तात्या माझा घरचा computer बंद पडला!" , " तात्या थोडे पैसे पाहिजे आहेत!" , "तात्या Data-center down आहे, client पेटला आहे!", "सर, मला उद्या बयको बरोबर जायचे आहे, माझे office चे काम तुम्ही कराल का?" ...... वगैरे कोणते ही प्रश्न असोत, तात्या सगळ्याला तयार.... ’नाही’ हा शब्दच मी कधी ऎकला नाही त्यांच्या कडून... त्या माणसाच्या दृष्टीत कोणीच वाईट नाही, सगळे चांगलेच आणि सगळ्यांना मदत करणे ह्यांचे आद्यकर्तव्य!

मागील महिन्यात माझे job profile बदलल्याने तात्यांना सोडून मला जावे लागले... उगाच डोळे पाणावले.... खरच अशा व्यक्तीच्या सान्निध्यात येण्यासाठी साता जन्माची पुण्यायी लागते !!!

आपला,
(हळवा) विशुभाऊ

1 टिप्पणी: