हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

रविवार, २५ ऑक्टोबर, २००९

भुताटकी - भाग १

आमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरले, तेव्हा बाबांनी नविनच बनलेल्या गगनचुंबी 'शितलदर्शन'नावाच्या इमारतीत ७ व्या मजल्यावर घर घेतले.

शितलदर्शन जिथे बांधली आहे त्या भागाला पुर्वी '७ माड'असे बोलत व तिथे कैद्यांना फाशी दिली जात असे. सात-माडला भुत असतात अशी गावकऱ्यांची श्रध्दा असल्याने दिवसा ढवळ्या पण तिथे कोणी फिरकत नसे व चुकून मुले खेळता खेळता गेलीच तर ते बाधा घेऊन येत असत!.. अ्शा ह्या ७-माड मघ्ये बांधलेल्या इमारतीच्या ७व्या मजल्या वरचे ७वे घर बाबांनी विकत घेतले.....

माझे बाबा मुळातच बेडर स्वभावाचे, व त्यामूळे त्यांना ह्या गोष्टींचा काही फरक पडत नव्हता... पण माझी आई तितकीच भित्र्या स्वभावाची, म्हणूनच कि काय बाबांनी आईला त्या जागेचा इतीहास काहिच सांगितला नव्हता.... लग्ना नंतर सुरवातीला आई-बाबा तिथे न रहता वाड्यावरच रहात होते... वर्षा दिड वर्षात माझ्या जन्मानंतर आम्ही तिघे शितलदर्शन मध्ये राहिला गेलो आणि ते थरारक नाट्य सुरू झाले...........

आई ला घरात काम करताना सारखे अजुन कोणी बरोबर असल्याचा भास होत असे; नविन घर आहे त्यामुळे होत असेल असे वाटून काही दिवस चुप्प बसली.... पण नंतर मी जेव्हा घरात घाबरू लागलो ओरडू लागलो , तेव्हा आईचा विश्वास बसला की काहितरी गोंधळ आहे.... त्यातच मी डायरीयाने आजरी पडलो व हॉस्पिट्ल मध्ये होतो, तेव्हड्या काळात ह्या विषयावर पडदा पडला. एकमहिन्या नंतर जेव्हा मला घरी आणले त्याच रात्री आईने बाबांना ही गोष्ट सांगितली.... व बाबांनी ती हसण्यावारी नेली.... थोड्या वेळाने बाबा धुतलेले कपडे वाळत घालत होते तेव्हा आई मागुन आली व पुन्हा तोच विषय काढून बोलू लागली, व बाबा आईची समजूत घालत होते आणि तितक्यात आतून आईचा आवाज आला " अहो, कोणाशी बोलता आहत ?" बाबांना नखशिकांत शिरशीरी गेली व बाबांनीमागे वळून पाहिले तर कोणीच नव्हते आजुबाजूला.......

आता बाबांचा पण विश्वास बसला होता की कहितरी गोंधळ आहे!... ते पण शहारले.... त्यानी आईला वचन दिले की आपण लवकरच दुसरे घर घेऊ.............. आता बाबा कामवर गेल्यावर आई मला कुशीत आणि स्वतःचा जिव मुठीत घेऊन बसत असे, कधी संध्याकाळ होते आणि बाबा घरी येतात त्याची ती वाट पहात असे........ घरा मध्ये भांडी पडणे, खिडक्यांच्या काचा फूट्णे, आवाज येणे, सारखी प्रेतयात्रा दिसणे हे प्रकार चालूच होते .....

एकदा माझी मावस बहीण आमच्या कडे राहीला आली होती.... दुपारी माझ्याशी खेळता खेळता ती जोरात किंचाळली तेव्हा आईने धावत येऊन विचारले की काय झाले?, त्या वर ती ने सांगितलेली गोष्ट ऎकून आई थंडच पडली... तीला एक म्हातारी बाई दिसत होती व ती जवळ बोलवत होती... आईने लगेच आम्हाला घेतले व तडक वाड्यावर नेले... !

बाबांनी काही दिवसात कळव्या मध्ये दुसरा फ्लॅट घेतला , आमचे सगळे सामान तिथे शिफ्ट केले फक्त आईच्या आग्रहाने बाबांनी आमच्या कुलस्वामीनीची कालिकामातेची तस्बिर दारावर ठेवली.... ती रात्र आमची शितलदर्शन मधली शेवटची रात्र होती दुसऱ्या दिवशी आम्ही नविन जागेत राहिला जाणार होतो... त्या रात्री आम्ही झोपलेलो असताना बाबांना कोणीतरी डिवचत आसल्या सारखे वाट्ले , म्हणून उठून पाहिले तर एक म्हातारी बाबांना डिवचत होती व रागा रागाने बघत होती, बाबा घाबरले पण स्वतःला सावरत त्यांनी आम्हा सगळ्यांवर हात ठेवला व त्या म्हातारी वर ओरडले व तीला चालते होण्यास सांगितले... त्या म्हातारी ने आम्हाला मारण्याचा पण केला होता पण बाबा पण हट्टाला पेटले होते.... ते तिच्या शी तावातावाने भांडत होते... तिच्यावर ऒरडत होते.. तिला शिव्या देत होते... ह्या सगळ्या आवाजात आईला जाग आली व ऊठून तिने जे दृष्य पाहिले त्याने तिची गाळण झाली... त्या म्हातारीने आई कडे मोर्चा वळवला... ती आईला सारखी दरवाज्यावरची देवीची तस्बीर काढायला सांगत होती, व बाबा तीला आडवत होते... म्हातारीला भिती दाखवत होते... ह्या सगळ्या प्रकारात जेव्हा पहिला कोंबडा अरवला तेव्हा ती म्हातारी गायब झाली व आई-बाबा आम्हाला घेऊन कळव्याला आले .... त्या नंतर आई-बाबांनी परत कधीच त्या इमारती कडे वळून पाहिले नाही....

आजही जेव्हा मी वाड्यावर जातो तेव्हा लांबून ती इमारत बघतो... ती तशीच भकास अजूनही उभी आहे !!!!

आपला,

(भुताड्या) विशुभाऊ

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २००९

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

नमस्कार,

तुम्हांला व तुमच्या सर्व कुटुंबीयांना विशुभाऊ रणदिवे व परिवारातर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

ही दीपावली तुम्हाला सुख-समाधानाची, आरोग्याची, ऐश्वर्याची ठरो व तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होवोत, अशी श्री स्वामीचरणी प्रार्थना.

आपला,
(शुभचिंतक) विशुभाऊ

शनिवार, १० ऑक्टोबर, २००९

बाबा

    आज सिध्दार्थ च्या सांगण्यावरून पुर्वी न उमगलेल संदिप चे " दमलेल्या बाबाची कहाणी" हे गाणे आई ऎकले, खरच काळीज फाडणारे गाणे आहे. खरेतर हे गाणे म्हणजे संदिप ने स्वतःच्याच गाण्याला "दूरदेशी गेला बाबा..." ला दिलेले उत्तर.... आता बाबा झाल्यावर त्या पद्यातील दर्द, आणि आश्रू कळले....

    आज काल घरातील आई आणि बाबा हे दोघेही नोकरी करतात आणि त्यामुळे ज्या बाळाला जास्त गरज असते, त्यालाच वेळ देऊ शकत नाही.... संदिप च्या कवितेतली छोटी मुलगी ,आई वडिलांच्या आठवणीने व्याकूळ झालेली.... बिचारी एकटीच घरी...

        कसा चिमणासा जीव , कसाबसा रमवला
        चार भिंतित धावुन दिसभर दमवला
        ' आता पुरे ! झोप सोन्या..' कुणी म्हणतच नाही ॥
लहान असताना, माझी आई दुपारी मला जवळ घेउन ’आता पुरे ! झोप सोन्या...’ बोलायची.... पण माझ्या सोनाला तर मी पाळणा घरात ठेवले !

        कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी ?
        कोणी बोलायाला नाही...कशी व्हावी कट्टी-बट्टी ?
        खेळ ठेवले मांडून ... परि खेळगडी नाही ॥
शाळेला सुट्टी म्हणजे मजा असे वाटणारा मी... पण माझी पोर सुट्टी च्या नावने खिन्न होते कारण.. तेच "खेळ ठेवले मांडून ... परि खेळगडी नाही"...


        दिसे खिडकीमधुन जग सारे , दिशा दाही
        दार उघडुन तरी तिथे धावायचे नाही
        फार वाटे जावे परी - मुठीमध्ये बोट नाही ॥
मी लहान असताना वाटेल तेव्हा आई-बाबांचे बोट धरून बाहेर फिरायला जात असे, पण माझ्या छोटीच्या मुठीमध्ये मात्र माझे बोट नाही..

        नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही
माझ्या पोरीच्या डोळी झोप दाटली आहे.... आणि मी द्रुष्ट घरी नाही.....

ह्या सर्व दिवसात स्वतःच दमून भागुन माझी परी झोपली... आणि मी घरी येतो व चालू होते "दमलेल्या बाबाची कहाणी"......

संदिप तुला त्रिवार सलाम !!!!!!!!

आपला,
(एक बाबा) विशुभाऊ..

रविवार, ४ ऑक्टोबर, २००९

निवड्णूक !

    ह्या निवडणूका आल्याकी मला जरा धडकीच भरते, जस जशी निवडणूकेची तारिख जवळ येते तस तशी हि ५ वर्ष बॅनरवर दिसणारी साहेब, नाना, तात्या, बंटी, भाऊ, कार्यसम्राट, ह्र्दयसम्राट वगैरे मंडळी आमच्या घरची धूळ झाडायला येतात. कोण जाणे कसे पण येताच नावाने हाक मारून आदबिने नमस्कार सुध्दा करतात, व मी नियमीत पणे त्यालाच कसे मत देत आलो आणि येणार हा प्रत्येकाला विश्वास देतो.....

    दर निवडणूकीला घरी आलेल्या उमेदवाराला मत देण्याच्या आश्वासनांची टेप माझी चोख पाठ असते, व त्यात (टेप वाजवण्यात) मी कधीच चुकत नाही. पण गेल्या महानगर पालिकेच्या निवडणूकांच्या वेळी मोठा गोंधळ झाला, त्याचे झाले असे की आमच्या मतदार संघातल्या धडाडिच्या आणि तरूण कर्यकर्त्या सुंदराबाई ( sorry ताई) भरदुपारी आमच्या घरी आपल्या पाळलेल्या इमानदार लोकांना घेऊन आल्या. मी नुकताच ऊठलो होतो आणि घरात कोणिही नसल्याने स्वतःच चहा बनवण्याची तयारी करत होतो. ’आल्या अथित्या मुठ्भर द्याया मागे पुढती पाहू नको!’ ह्या आनंद फंदिंच्या फटक्याला जागुन त्यांना चहा विचारला व ते सगळे जण एक सुरात ’हो’ बोलले.... आता झाली ना पंचाईत ! दुध फक्त २ कप चहाचे आणि हे बाई व इमानदार पकडुन १५ जण... त्यातल्या त्यात एक गरिब इमानदार पकडला व त्याला पैसे देऊन बिल्डींग खालच्या भट कडून १६ कप चहा मागवला.... आता ह्या बाईंनी ताबा घेतला व आपण केलेल्या कामाची उजळणी चालू केली, माझ्या घराचा हॉल म्हणजे व्यासपिठ झाले होते... ही बाई आणि माझ्या पोटातले कावळे एकजात एकसुरात ओरडत होते... तितक्यात तो गरिब इमानदार आला व माझी त्या भाषणातून सुटका झाली... मी त्या बाईंना विश्वास दिला की हे मत तुम्हालाच मिळणार , तसेही आपले संबंध (वैयक्तिक) खुप जुने आहेत... त्यावर बाई खुश होऊन निघुन गेल्या...

    सुंदराबाई जातात न जातात तोच त्यांचे खंदे विरोधक अण्णासाहेब दरवाज्यात उभे !..... आता हे अण्णासाहेब म्हणजे तेव्हा होणाऱ्या आणि आताच्या झालेल्या सासरचे , मान ठेऊन त्यांना पण आत बोलवले व त्यांनी लाजेखातर का होईनात पण चहा नाही सांगितला.... परत तेच बोलणे चालू झाले... ह्यांनी गटार साफ केली तर त्यांनी कचरा कुंड्या लावल्या... ह्यांनी स्मशानाची जागा वाढवली तर त्यांनी विद्युतदहनीका लावली... मी ह्यांना पण मत देण्याचे आश्वासन देतच होतो की सुंदराबाई त्यांचा राहिलेला मोबाईल घ्यायला आल्या!!!.... खप्प... माझी बोलतीच बंद झाली...

बाई गरजल्या : ’अण्णासाहेब, विशुभाऊ फितणार नाहीत ! आमचे संबंध जुने आहेत !’
अण्णासाहेब:  संबंध ?? बाई आमच्या होणाऱ्या जावयावर नसते आरोप सहन नाहि करणार!! याद राखा !!!
सुंदराबाई : काय हो ...... मतदान करणे हा काय नसता आरोप आहे का??? काल रात्री कुठे होतात हे मला बरोबर माहित आहे ....
अण्णासाहेब: @#%^$&$$%&%*
सुंदराबाई: *^^*(%$#%

मी डोक्याला हात लावला.... त्यांना दोघांना शांत करत मी सांगितले " तुम्ही दोघांनी सुध्दा समाजासाठी खुप काम केले आहे !, पण दुर्देवाने मी उद्याच २ महिन्या साठी परदेशी जात आहे, तेव्हा कृपाकरुन भांडण थांबवा, व कोणीही निवडून आले तरी मला आनंदच आहे!" त्यावर दोघेजण मला शिव्याशाप देत निघुन गेले, व माझी सुटका झाली.....

आपला,
(मतदाता) विशुभाऊ

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २००९

गांधी आणि मी !

हा लेख चालू करण्या आधीच मी स्पष्ट करतो की मी पुर्णतः जहालवादी आहे, कोणी कानाखाली वाजवणे सोडाच, आडवा पण आला तरी हात-पाय तोडून त्याच्या बायका पोरांना धंद्याला लावणारा मी.... तरी गांधीजींना शिव्या देणाऱ्यातला मी नाही !!!!

गांधी हे खरच महत्मा होते, मी नक्की कबूल करतो की देशाची ही स्थिती होण्या पासून ते वाचवू शकले असते, देशाची फाळणी वाचवू शकले असते...किंवा सर्व मुसलमानांना पाकिस्तानात हकलवू शकले असते. गांधीजी ना ह्या देशाच्या संस्कारावर भरपूर विश्वास ! त्यांना वाटले की सगळे मुसलमान वाईट नाहीत, आपल्याच हाडामासाचे.... पण त्यांना हे कसे कळले नाही की मुसलमान देशाच्या स्वातंत्र्यासाठी कधीच लढले नाहीत ते लढले ते खलीफ़ा साठी!!

तरी गाधींचे काही गुण आहेत ते आपण मानलेच पाहिजेत :

१) बोलणे तसे रहाणे, तसे वागणे.
२) देशासाठी ( भले त्यांना तसे वाटत होते) अखुड कपड्यांमध्ये संपुर्ण जिवन काढणे.... (थोर विचार)
३) कितीही झाले तरी डोके शांत ठेवणे... ( हे माझ्या सारख्या जहालवाद्यांना साता जन्मात शक्य नाही)
४) लोकांना संघटीत करणे !!! व देशप्रेम जागवणे....

आज जेव्हा मी इतस्थः बघतो तेव्हा मला असा नेता कुठेच दिसत नाही.... असो पण आज गांधी जयंती साजरी करायची , अजून काही करूपण शकत नाही... ड्राय डे आहे !!!

आपला,
(ड्राय-डे त्रस्त) विशुभाऊ

गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

तात्यासाहेब अडारकर

जैविकशास्त्राच्या पुस्तकातील माणसाच्या आकृती सारखी शरिरयष्टी, डोक्यावर टक्क्ल आणि हसरा चेहरा असे अमचे तात्यासहेब. वास्तविक पहाता तात्यासाहेब म्हणजे माझे office मधले boss, पण वागण्याने एका मित्रा पेक्षाही जास्त. कोणिही यावे आपली अडचण सांगावी व मदत घेऊन जावी असा परोपकारी माणूस... खरच ३०० वर्षातून एकदा असा माणूस जन्माला येतो, कदाचीत तुकाराम महाराजां नंतर तात्यासाहेब अडारकरच !

मासे आणि मास्याचे डोके खाऊन खाऊन झालेली तल्लख बुद्दी, अत्यंत महिनती स्वभाव आणि पराकोटीचे बियर-प्रेम.... हा माणूस खरेतर एका मराठी प्रतिभावंत कूटूंबात जन्मला... आपली प्रतिभा त्याने मदिराप्रेमी साहित्य लिहीण्यात मार्गी लावली. बियर पिण्याची मजा तात्यासाहीबांबरोबर जी आहे ती खुद्द मल्ल्याबरोबर फुकट्ची पिण्यात सुध्दा नाही..... तात्यासाहेब जेव्हा टेबलवर बसतात तेव्हा बियर पण आनंदाने फेसाळते, सोनेरी रंग आजून उजळतो आणि स्वाद अहा! इंद्राचा अमृतप्याला पण झक मारतो..... तात्यांचे नेहमीचे एक वाक्य आहे’जगात बियर हिच एक अशी गोष्ट आहे की ती पहिल्या घोटापासून शेवट्च्या घोटापऱ्यंत तशीच आणि सुंदर लागते!’ म्हणूनच तात्यांबरोबरची बियर कधीच संपू नये असे वाटते....

"तात्या माझा घरचा computer बंद पडला!" , " तात्या थोडे पैसे पाहिजे आहेत!" , "तात्या Data-center down आहे, client पेटला आहे!", "सर, मला उद्या बयको बरोबर जायचे आहे, माझे office चे काम तुम्ही कराल का?" ...... वगैरे कोणते ही प्रश्न असोत, तात्या सगळ्याला तयार.... ’नाही’ हा शब्दच मी कधी ऎकला नाही त्यांच्या कडून... त्या माणसाच्या दृष्टीत कोणीच वाईट नाही, सगळे चांगलेच आणि सगळ्यांना मदत करणे ह्यांचे आद्यकर्तव्य!

मागील महिन्यात माझे job profile बदलल्याने तात्यांना सोडून मला जावे लागले... उगाच डोळे पाणावले.... खरच अशा व्यक्तीच्या सान्निध्यात येण्यासाठी साता जन्माची पुण्यायी लागते !!!

आपला,
(हळवा) विशुभाऊ