हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

शनिवार, १० ऑक्टोबर, २००९

बाबा

    आज सिध्दार्थ च्या सांगण्यावरून पुर्वी न उमगलेल संदिप चे " दमलेल्या बाबाची कहाणी" हे गाणे आई ऎकले, खरच काळीज फाडणारे गाणे आहे. खरेतर हे गाणे म्हणजे संदिप ने स्वतःच्याच गाण्याला "दूरदेशी गेला बाबा..." ला दिलेले उत्तर.... आता बाबा झाल्यावर त्या पद्यातील दर्द, आणि आश्रू कळले....

    आज काल घरातील आई आणि बाबा हे दोघेही नोकरी करतात आणि त्यामुळे ज्या बाळाला जास्त गरज असते, त्यालाच वेळ देऊ शकत नाही.... संदिप च्या कवितेतली छोटी मुलगी ,आई वडिलांच्या आठवणीने व्याकूळ झालेली.... बिचारी एकटीच घरी...

        कसा चिमणासा जीव , कसाबसा रमवला
        चार भिंतित धावुन दिसभर दमवला
        ' आता पुरे ! झोप सोन्या..' कुणी म्हणतच नाही ॥
लहान असताना, माझी आई दुपारी मला जवळ घेउन ’आता पुरे ! झोप सोन्या...’ बोलायची.... पण माझ्या सोनाला तर मी पाळणा घरात ठेवले !

        कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी ?
        कोणी बोलायाला नाही...कशी व्हावी कट्टी-बट्टी ?
        खेळ ठेवले मांडून ... परि खेळगडी नाही ॥
शाळेला सुट्टी म्हणजे मजा असे वाटणारा मी... पण माझी पोर सुट्टी च्या नावने खिन्न होते कारण.. तेच "खेळ ठेवले मांडून ... परि खेळगडी नाही"...


        दिसे खिडकीमधुन जग सारे , दिशा दाही
        दार उघडुन तरी तिथे धावायचे नाही
        फार वाटे जावे परी - मुठीमध्ये बोट नाही ॥
मी लहान असताना वाटेल तेव्हा आई-बाबांचे बोट धरून बाहेर फिरायला जात असे, पण माझ्या छोटीच्या मुठीमध्ये मात्र माझे बोट नाही..

        नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही
माझ्या पोरीच्या डोळी झोप दाटली आहे.... आणि मी द्रुष्ट घरी नाही.....

ह्या सर्व दिवसात स्वतःच दमून भागुन माझी परी झोपली... आणि मी घरी येतो व चालू होते "दमलेल्या बाबाची कहाणी"......

संदिप तुला त्रिवार सलाम !!!!!!!!

आपला,
(एक बाबा) विशुभाऊ..

२ टिप्पण्या:

  1. विशूभाऊ, कवितेचे शब्द आणि संदीपचा कविता वर्णन करतानचा भावूक आवाज हृदयाला हात घालतात

    उत्तर द्याहटवा
  2. कोणाही कवीला हेवा वाटावा अश्या रचना आणि चाली आहेत. मराठीतील श्रेष्ठ कवींचा वारसा ह्यांनी अगदी समर्थपणे चालवला आहे. वेस्टर्न होणार्‍या सध्याच्या तरुणाईला पुन्हा मराठी कवितांकडे आकर्षित केलं आहे...

    उत्तर द्याहटवा