वर्ष लोटून गेले तुम्ही लोकं माझ्या दारूळ्या, प्रेमोळ्या आणि पांचट्या
ह्या ज्याला मी काव्य बोलतो (हो मीच बोलतो कारण ह्या मुक्त छंदा पलीकडील
छंदात मोडतात) त्या झेलत आहात. फक्त यमक जुळले की त्याचे काव्य किंवा कविता
होत नाही हे मला फार अलीकडेच उमगले.... त्याचे झाले असे की फार कष्टाने मी
एका जेष्ट कवींची (ते इतके मोठे आहेत की त्यांचे नाव कानाला हात लावून पण
घेऊ शकत नाही) भेट घेतली, आणि अति उत्साहाने त्यांना माझ्या कवितांची चोपडी
दाखवली ....
ते : अच्छा !!! तर तू कवि आहेस .... कवि चा वी र्हस्व की दीर्घ ? ...
मी फक्त 'कवी विशुभाऊ' ह्या चोपडी वर लिहिलेल्या अक्षरां कडे पाहत होतो ....
ते : तू कुसुमाग्रजांची 'विशाखा' वाचली आहे का ?
मी : कणा वाचली आहे ...
ते : शाब्बास म्हणजे विशाखा हा कविता संग्रह असून कणा त्यातली एक आहे हे
सुध्दा माहित नाही .... तू एवढ्या थोर कवीचे साहित्य वाचत नाहीस तर मी
तुझ्या कविता का वाचाव्यात ????
मी मुस्कटात मारल्या सारखा झालो ... आणि चोपडी उचलायला गेलो .... तर ते
म्हणाले थांब बघू तरी .... त्यांनी आधल्या मधल्या चार पाच चाळल्या आणि
म्हणाले ...
ते : कल्पना चांगली आहे .... पण वाचन हावे ..... नुसते यमक जुळवले की काव्य होत नाही ...
मी झक मारल्या सारखा झालो होतो ... पाया पडलो आणि काढता पाय घेतला .....
नंतर ठरवले वाळींब्यांच्या व्याकरणाचा आयचा घो !!! आपण आपल्याच ओळ्यांना आणि पांचट्यांना काव्य बोलायचे !!!
आपला,
(आडाणी कवि) विशुभाऊ
hahaha... te THOR kavi/vee kon te me sangu kaa???? :P
उत्तर द्याहटवाNako re baba...
उत्तर द्याहटवाHa...Ha...Ha...Vishu Bhau...aamhala tar aavdtat darloya ;)
उत्तर द्याहटवा