हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

शुक्रवार, १६ जुलै, २०१०

वर्ल्डकप !!

शेतकरी राजा नेहमी प्रमाणे सकाळी पाच वाजता उठून मनन-चिंतन करत बसला होता.... बरेच दिवस त्याला मिळालेल्या विजया मुळे तो थोडा पेचात होता.....

राजा : कोण आहे रे तिथे ????

प्रधान : मी आहे साहेब, बोला काय काळजी आहे??

राजा : प्रधान, तुम्हाला माहीत आहेच एवढ्या मोठ्या खेळ समुहाचे अध्यक्ष-पद म्हणजे किती जबाबदारी , वरून आपले कृषी खाते!!!

प्रधान : साहेब, ही चिंता अपेक्षीत होती !

राजा : म्हणजे??? तुम्हाला सुध्दा वाटते, दोन्ही गोष्टी आम्ही सांभाळू शकत नाही ????

प्रधान : साहेब, असे कसे होईल ???? मला एक सांगा , आज काल तुम्ही कोणाला गोट्या / विटी दांडू म्हणजे आपले लहान पणी चे खेळ खेळताना पाहीले आहे का?

राजा : नाही ...

प्रधान : अहो, आज कालची मुले क्रिकेट पण नाही खेळत !!!

राजा : मग करतात काय ही कार्टी ??????

प्रधान : साहेब, आपला देश हा कृषी प्रधान आहे ... ’फार्मविले’ खेळतात !!!

राजा : क्या बात है !

प्रधान : म्हणून आपण एक नवीन वर्ड्कप चालू करू ’फार्मविले वर्ड्कप’.... २०११ मध्ये हा वर्ड्कप पहीला आपल्या गावातच होईल !!!

राजा : ( एक टाळी आणि उडी मारून) प्रधानजी माझा रथ काढा !!!

आपला,
(प्रधान) विशुभाऊ ..

११ टिप्पण्या:

 1. फार्मविले ची कल्पना मस्त आहे. माफिया कप पण ठेवता येईल. नियम एकदम सोप्पे.. सरळ शुट करायचं प्रतीस्पर्ध्याला. जो शेवटपर्यंत टीकेल तोच विजेता..

  उत्तर द्याहटवा
 2. हा हा महेंद्रजी.... दाऊद भाईचा प्रधान झाले की ’माफिया’ चा वर्डकप ठेवतो....

  उत्तर द्याहटवा
 3. खरेतर मी Anonymous शी बोलत नसतो, पण चूक दर्शवल्या बद्दल धन्यवाद !

  ता.क.: कृपया Anonymous ने पोस्टींग करू नये, जे काही विचार आहेत ते स्पष्ट स्वतःची ओळख देऊन कळवावे.... हा फळा बौध्दीक मंथनाचा आहे, छुप्या यंत्रणेचा नाही!!

  आपला,

  (स्पष्टवक्ता) विशुभाऊ

  उत्तर द्याहटवा
 4. खुन्नस काढणे बौद्धिक मंथनापेक्षा वेगळे आहे ही माझी समजूत दुरुस्त केल्याबद्दल धन्यवाद

  उत्तर द्याहटवा
 5. आणि आपणास दिलेला प्रतीसाद हा सकारात्मक दृष्टीने घेतल्या बद्दल धन्यवाद !

  आपला,

  (आभारी) विशुभाऊ..

  उत्तर द्याहटवा
 6. कड्डक... उपरोधक विनोद फार चपखल बसलाय... विशुभाऊ ओळख असेल तर त्या वर्ल्डकपमधे माझा जॅक लावा ;) गिफ्ट पाठवतो लगेच :P hehe...

  उत्तर द्याहटवा
 7. धन्यवाद चिमणराव ! हो नक्कीच सेटींग लावणार.... सगळ्या टिम्स मध्ये आपलेच शेअर लागले पाहीजेत ना !!!! ;-)

  उत्तर द्याहटवा