हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

शनिवार, ३१ जुलै, २०१०

फलक

राजकारणामध्ये स्त्रीयांना १००% आरक्षण मिळावे ह्या विचार धारणेचा मी आहे, ह्याचे कारण म्हणजे रस्त्यावर लागणारे वाढदिवसाचे फलक; ह्या फलकां मधले चेहरे बघून मन उबगले आहे.
आज काल फ्लेक्स चे फलक कोणी ही बनवतात आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.... ज्याला रोजच्या जिवनात रस्त्यावरचं काळं कुत्रही विचारत नाही तो कार्यसम्राट, ह्रुदयसम्राट वगैरे बनतो...... काही असेच फलक बघून मन उबगलेले होते आणि ह्याचाच विचार करत मला झोप लागली.... सकाळी झोपेतून उठून बघतो तर काय , माझ्या घरा समोर मोठा फलक लागलेला होता आणि त्यावर लिहीलेले होते...

थोरविचारवंत समाजसुधारक प्रबोधनकार विशुभाऊ रणदिवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


शुभेच्छूक,


नाना , तात्या, बाळ्या, गोट्या आणि समस्त परिवार ....

.
.
.
.
आपला,

(प्रबोधनकार) विशुभाऊ .....

४ टिप्पण्या:

 1. va vishubhau .. ekdum khup diwasani post taklit !
  tumch mat patla .. kharach ubag yeto .. ase chehre pahun

  उत्तर द्याहटवा
 2. शुभेच्छूक,
  .
  .
  .
  (फलका खाली....)

  यांच्या सह्योगाने... सकाळ,संध्यानंद आणि आदी....

  उत्तर द्याहटवा
 3. विशुभाऊ म्हात्रेआळीत असा फलक २ जानेवारीला नक्की उभारुच...

  उत्तर द्याहटवा
 4. @विरेंद्र धन्यवाद ! आता आपण १००% आरक्षणासाठी मोर्चा काढूयात ;-)

  @सोमनाथ हा हा हा , हे पण टाकायला पाहीजे !!!

  @सौरभ अरे मला खरंच तुझे कौतूक वाटतेरे की शाळे पासून आज पर्यंत तू माझा वाढदिवस विसरलेला नाही... आणि मला कधी कोणाचाच लक्ष्यात राहीला नाही ...

  उत्तर द्याहटवा