हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

सोमवार, १७ सप्टेंबर, २०१२

सिंग्लीश

सिंगापूर म्हणजे जागतिक व्यापाराची राजधानी .... आणि ह्या देशाची प्रथम भाषा 'इंग्रजी' असली तरी इथे तर्खडकर आले असते तर पावला पावला ला जीव दिला असता त्यांनी !!!
इथेले इंग्रजी म्हणजे एक मोठा संशोधनाचा विषय .... कोणत्या भाषेची वाक्यरचना मनात करून इंग्रजी बोलतात ते देवालाच ठाऊक .... आता खाली दिलेली उदाहरणेच पहा ....
एका प्रोडक्शन कंपनीच्या सुपरवायजरला त्याचा मॅनेजर नवीन कामावर घेतलेल्या कामगाराकडे बोट दाखवून विचारतो " हि नो ओर नो ?" ..... ह्याचा अर्थ असा कि ' दॅट पर्सन नो (Know) हिज वर्क ओर नॉट (no) !' .....
ह्यांच्या व्याकरणात क्रियापदांची व्याख्याच निराळी आहे . . .  म्हणजे कुठे क्रियापद लावता आले नाही कि तिथे 'ला' लावायचे .... " नो प्रॉब्लेमला" "वन डॉलर एक्सट्रॉला" वगैरे वगैरे . . . .
आणि सगळ्यात मजा येते ती "कॅन कॅन" मध्ये . . .  जिथे आपण मराठीत 'चालेल' 'होईल' किंवा इंग्रजी मध्ये 'विल डू' 'कॅन बी डन' वगैरे म्हणतो तिथे हि लोकं 'कॅन कॅन' म्हणतात . . . .
तरी इथल्या इंग्रजी मध्ये ब्रिटीश इंग्रजी सारखा रुक्ष पणा नसून उर्दू सारखी एक नजाकत आहे . . .  म्हणूनच आम्ही ह्या भाषेला 'इंग्लिश' नव्हे 'सिंग्लीश' असे म्हणतो .....
आपला,
(सिंग्रजी) विशुभाऊ

शनिवार, १५ सप्टेंबर, २०१२

:: भारुड ::

लवकर पाव गं  मला | भारत आई रोडगा वाहिन तुला ||१||
किटली आमची इटलीतून आली | इकडेच खपव गं तिला ||२||
सरदार आमचा कोळसा खातो | अतिसार होऊ दे त्याला ||३||
जावई ह्यांचा गोळीबार करतो | फाशी होऊ दे त्याला ||४||
बारामतीचा बोका खाव खाव करतो | कॅन्सर होऊ दे त्याला ||५||
भ्रष्टाचार मारून आहुती देईन | 'अझाद' कर गं मला ||६||
एकदाचे शेवटी सगळेच जाऊ दे । फक्त सज्जन राहू दे आम्हा ||७||
आपला,
(भारुडी) विशुभाऊ

बुधवार, १२ सप्टेंबर, २०१२

मेला मेली

आज ऑफिस मधून निघता निघता , फ्रेंच बॉस च्या चायनीज सेक्रेटरीचा फोन आला ....
ती : बॉस इज सेन्डिंग यु मेल ....
मी : टेल हिम आय नीड फिमेल ! ;-)
ती : आय एम फिमेल !!
((((((( ठ्ठो )))))))
आपला ,
(खल्लास) विशुभाऊ

रविवार, ९ सप्टेंबर, २०१२

रॉ आणि आय.एस.आय

अब्बास अहमद हा टिपिकल पाकिस्तानी , पण सिंगापुरातला माझा मित्र ..... खरेतर माझ्या टीम मधला नसला तरी मी भारतीय म्हणून आत्मीयतेने (!) माझ्याशी मैत्री करायला आला .... अब्बास म्हणजे आर्धवट डोक्याचा पण लाघवी मुलगा .... पाकिस्तानी असून सुध्दा बराच ब्रॉडमाइंडेड आहे.... हा मला 'रॉ' अशी हाक मारतो, जणू काही ती शिवी आहे आणि म्हणून मी त्याला 'झाटू आय.एस.आय' आशी हाक मारतो (शिवी देण्या साठीच)..... कॉफी ब्रेक मध्ये आम्ही शाब्दिक भारत-पाकिस्तान लढाई खेळतो .... आणि आपणच जिंकलो असे समजून दोघेही कामाला लागतो ..... असे असले तरी आजून एक ब्रिटीश कलीग 'जॉन मेल्बॉर्न' आमचा कॉमन दुश्मन..... अब्बास हा पंजाबी ऍक्सेन्ट मध्ये उर्दू बोलतो आणि त्याच्या भाषेवर बॉलिवूड च्या सिनेमांचा बराच प्रभाव आहे आणि मी मराठी ऍक्सेन्ट मध्ये मुंबई मधल्या सर्व भाषांचा प्रभाव घेऊन हिंदी मिश्रित उर्दू बोलतो ....
त्या दिवशी आम्ही दोघे रॉ आणि आय.एस.आय लढाई लढाई खेळत होतो ...
अब्बास : दोस्त तू कितनाभी मना करे .... कारगिल तो हम ही जीत गये थे !!!
मी : भोसडिके इसका मतलब पाकिस्तान ने ऍटॅक किया था ये तुम काबुल करते हो !
अब्बस : नहीं नहीं मेरा मतलब ये था की ......
अब्बास शब्दांची सारवा सराव करत असतानाच ब्रिटीश बुलडॉग  जॉन तिथे आला ....
जॉन : यु पिपल आर फ्रोम डिफरन्ट कन्ट्रीज बट स्पिक सेम लॅन्गवेज ??
अब्बस : भेन के लवडे .... तेरे मां कि ......
जॉन माझ्या कडे बघून :  वॉट डिड हि से ???
मी : जाऊन तुझ्या बापाला विचार भेंशोद .....
आपला,
(रॉ) विशुभाऊ

शनिवार, ८ सप्टेंबर, २०१२

लिटिल इंडिया

सिंगापूर मध्ये 'लिटील इंडिया' नावाचे एक ठिकाण आहे ... इथे आल्यावर तामिळनाडू मध्ये असल्याचा भास होतो .... इडली , डोसा , रस्सम , पोंगल , केळीची पाने , पुजेची साहित्य विकणारी दुकाने , दक्षिण भारतीय पध्दतीची देवळं सगळे सगळे तंतो तंत.... हे झाले लिटील इंडियाच्या केंद्र भागाचे वर्णन.... त्याचा आजूबाजूला बरीच तमिळ इतर वस्ती आहे, त्यात इतर भारतातले लोकं, बांगलादेशी , पाकिस्तानी , श्रीलंकन राहतात व त्यांना इथे 'इंडिअन' असेच संबोधले जाते ... व ते सुद्धा स्वतःची ओळख 'इंडिअन' म्हणूनच करून देतात .....
आता एखाद्या मुसलमानाने सांगितले कि तो पंजाबचा आहे कि नक्की समजायचे हा पाकिस्तान चा आहे .... एखाद्या बंगाली बोलणाऱ्या मुसलमानाने सांगितले कि तो कोलकात्याचा आहे कि समजायचे हा बांगलादेश चा आहे .... पण सगळे इथे शहाण्या सारखे राहतात .... मुळात इथल्या कडक कायदा व्यवस्थेने सगळ्यांना 'चड्डीत' ठेवले आहे ...
माझ्या सारख्या अन्नार्थी माणसा साठी हे ठिकाण म्हणजे स्वर्गच !.... इथे भारतीय जेवणाची बरीच दुकाने आहेत .... सिंगापूर मध्ये मुसलीम संख्येने जास्त असल्याने त्यांनी मुसलमानांसाठी योग्य अशी खानावळ दर्शवण्यासाठी 'हलाल' सर्टीफिकेशन चालू केले आहे .... मुसलमानांसाठी जे खाणे 'हराम' आहे उदाहरणार्थ डुक्कर किंवा दारू वगैरे इथे विकले जात नाही ..... लिटील इंडिया मधल्या जवळ जवळ सगळ्याच खानावळी हलाल सर्टीफाईड आहेत .... ह्या खानावळी हिंदू ग्राहकांना आकर्षित करायला 'गोमांस' सुध्दा विकत नाहीत .... एकूण आपल्यासाठी बेस्ट जागा आहे हि जेवण्या साठी .....
इथेच पुढे 'मुस्तफा' नावाचे भले मोठे सुपरमार्केट आहे .... झेंडू बाम पासून एम.डी.एच. मसाल्या पर्यंत सगळे सगळे भारतीय प्रोडक्ट्स इथे मिळतात.... सिंगापूर मध्ये राहणारे भारतीय मोस्टली महिन्याचे सगळे सामान इथूनच भरतात ... पण इथे येण्या साठी शनिवार आणि रविवार हे दिवस मुख्यत्वे टाळा.... सगळा लेबर क्लास ह्या दोन दिवसात इथे मोकाट सुटलेला असतो .... संध्याकाळच्या विरार ट्रेनला जेवढी गर्दी नसते तेवढी इथे असते ....
लिटील इंडिया मध्ये आल्यावर सगळेच भारतीयच दिसतात त्यामुळे प्रवासी न्यूनगंड इथे आजीबात येत नाही .... तसेही म्हणा सिंगापुरात इतर ठिकाणी गेल्यावर सुध्दा तुम्ही परदेशी म्हणून तुमच्या कडे कोणी वळून वळून पाहत नाही व त्यात कोणी भारतीय समोरून आला तरी तो पाहून न पहिल्या सारखे करून निघून जातो ....
आपला,
(लिटील इंडिअन) विशुभाऊ

गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१२

:: खंजीर ::

गैरोंकी चाहत मे मुहाजिर बन बैठे
आपनोंकी आखों मे अंगार बन बैठे ....

मजहब के नाम पे राह चले तो थे
आपनेही घर मे महेमान बन बैठे ....

इलहा की मर्जी पाने फितुर कर गए
तेरेही दरबार मे गुन्हेगार बन बैठे ....

अल-शुकर बनने की चाहत रखते थे
खुद ही खुदमै काफिर बन बैठे ....

ये गुमन आलम से 'अझाद' कर दे
हिन्दोस्तां मे देशद्रोही ना बन बैठे ....

__________________________________

मुहाजिर (भरतीय मुसल्मानोंको पाकिस्तान मे ये नाम से ठुकराया जाता है), इलहा (परमेश्वर,अल्ला), फितुर (दोष, गलती), अल-शुकर (जो काफिर नहि है), काफिर (नास्तीक), गुमन (भ्रम), आलम (विश्व). . .

मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१२

::दारूळी:: नसतेस घरी तू जेव्हा ... ( संदिप खरे ची माफी मागुन)

नसतेस घरी तू जेव्हा
जीन घुटका ... घुटका पितो
मैफिलीचे जुळती धागे
मित्रांना घरी बोलावतो .....

आकाशातून अप्सरा उतरावी
माहोल तसा होतो
बियर दिशाहीन होते
अन प्याला रिक्त होतो ....

येतात बाजूचे दाराशी
शिव्या देऊन जाती मागे
खिडकीशी सिगारेट पितो
धूरही तालात जातो ....

हो झालो अजुनी मोकळा
'अझाद' अजुनी झालो
तुज वाचून उमजत जाते
संसारात उगाच अडकतो ....

नसतेस घरी तू जेव्हा
जीन घुटका ...

आपला ,
(अझाद) विशुभाऊ
ह्या विडंबनाचा आणि माझ्या वैयक्तिक जीवनाचा काही एक संबंध नाही .... तसा आढळल्यास केवळ योगायोग समजावा ....
आपला,
(सत्यवचनी) विशुभाऊ 

आल इज वेल

भारतीय लोकं म्हणजे पराकोटीचे आशावादी .... कितीही मोठा प्रसंग आला तरी पुढे निट होइल आणि आपण सुखरूप आहोत असे समजुन चालणारे ..... हीच गोष्ट 'थ्री ईडियेट' मध्ये आमिर खान ने 'आल इज वेल' ह्या रूपत दाखवली आहे .... त्या दिवशी इथे युनिवर्सल स्टूडियो मध्ये पण 'आल इज वेल' आणि भारतीय मनोवृत्तिची जाम खेचली .......
पण माला आजिबात राग आला नाही.... कारण आपण असेच करतो ....
आपल्याच देशात आपली गळचेपी झाली तरी .... 'आल इज वेल'....
कल्माडीने घोटाळा केला तरी .... 'आल इज वेल'....
राजाने घोटाळा केला तरी .... 'आल इज वेल'....
कसाबने हल्ला केला तरी .... 'आल इज वेल'....
पंताप्रधानाने पैसे खाल्ले तरी .... 'आल इज वेल'....
मुसल्मानानी हैदोस घातला तरी .... 'आल इज वेल'....
.... 'आल इज वेल'........ 'आल इज वेल'........ 'आल इज वेल'........ 'आल इज वेल'....
आपला,
(आल इज वेल) विशुभाऊ ....

सोमवार, ३ सप्टेंबर, २०१२

आजी आणि नातवंड

जगातल्या प्रत्येक नात्यामध्ये एक वेगळेच समीकरण असते , त्यातल्या त्यात जर ते आजी आणि नातवंडांचे असेल तर 'नातवंडांची काळजी आणि त्यांच्या आईला टोमणे'!!! .....
माझ्या आजीला म्हणजे बाबांच्या आईला मुळात १० मुलं असल्याने नातवंडाची काही कमी नव्हती .... तरी मी म्हणजे मुलाचा मुलगा किंवा वंशाचा दिवा किंवा माझ्या १४ बहिणींच्या भाषेत 'दिवट्या' म्हणजे एक मोठे प्रस्थ होते .... संपूर्ण घराण्यात लाडावलेला एक आळशी आणि खादाड पोरगा म्हणजे 'मी' .... असे असून सुद्धा माझी आजी मला पाहिल्यावर , आईला बोलायची 'बिचाऱ्याची गालफट्ं बसली आहेत' ,'बरगड्या निघाल्या आहेत' , 'पोराला काही खायला देतेस कि नाही ??'  वगैरे वगैरे ..... आणि ह्याने जास्तच लाडात येऊन मी केविलवाणा चेहरा करायचो आणि आई स्वस्थ पण वेगळाच भाव.......
त्या दिवशी माझ्या मुलीला पाहून आई बोलली 'किती बारीक झाली आहे !!" .... लगेच आमच्या कन्येने केविलवाणा चेहरा केला आणि बायकोच्या चेहऱ्यावर आईचा पूर्वीचा भाव दिसला.... आणि मी गालातल्या गालात हासलो ....
आपला,
(दिवट्या) विशुभाऊ

शनिवार, २५ ऑगस्ट, २०१२

नारायण आणि नाऱ्या

एक काळ होता जेव्हा नारायण नामक बालक पुढे जाऊन रामदास झाले .... आता असे घडत नाही ... कारण .......
(एका काळोख्या खोलीत नाऱ्या एकटा बसलेला असतो ..... आणि त्याची आई त्याला येऊन विचारते ...)
आई : आरे नाऱ्या इथे काय करतो आहेस ?
नाऱ्या : मी चिंता करतो आहे विश्वाची .....
आई : कार्ट्या आभ्यास काय तुझा 'बा' करणार का?? ... म्हणे चिंता करतो विश्वाची .....
आणि नाऱ्या चुपचाप जाऊन पुस्तकात डोके घालून बसतो .....
आपला,
(नाऱ्या) विशुभाऊ

पंख छाटलेले . . .

गुलमोहर तुझ्या प्रीतीचा, मन उमलतसे माझे | हा मोगरा फुलला कोणाचा, मन उमलतसे माझे ||  रोजच्या वाटेवरचा, खुपतो एक बगीचा | आठवण फुलाची घरच्या, ह्रदय चिरतसे माझे ||  वाटे हेवा पाखराचा, फुलावर घुमणाऱ्या | पंख छाटलेले बंबाळ, जीव मरतसे माझे ||  मन मोहर क्षणी, होतो 'अझाद' मी | का गेलो सोडूनी, प्राण तरसतसे माझे ||

शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१२

माझे काव्य लेखन

वर्ष लोटून गेले तुम्ही लोकं माझ्या दारूळ्या, प्रेमोळ्या आणि पांचट्या ह्या ज्याला मी काव्य बोलतो (हो मीच बोलतो कारण ह्या मुक्त छंदा पलीकडील छंदात मोडतात) त्या झेलत आहात. फक्त यमक जुळले की त्याचे काव्य किंवा कविता होत नाही हे मला फार अलीकडेच उमगले.... त्याचे झाले असे की फार कष्टाने मी एका जेष्ट कवींची (ते इतके मोठे आहेत की त्यांचे नाव कानाला हात लावून पण घेऊ शकत नाही) भेट घेतली, आणि अति उत्साहाने त्यांना माझ्या कवितांची चोपडी दाखवली ....
ते : अच्छा !!! तर तू कवि आहेस .... कवि चा वी र्हस्व की दीर्घ ? ...
मी फक्त 'कवी विशुभाऊ' ह्या चोपडी वर लिहिलेल्या अक्षरां कडे पाहत होतो ....
ते : तू कुसुमाग्रजांची 'विशाखा' वाचली आहे का ?
मी : कणा वाचली आहे ...
ते : शाब्बास म्हणजे विशाखा हा कविता संग्रह असून कणा त्यातली एक आहे हे सुध्दा माहित नाही .... तू एवढ्या थोर कवीचे साहित्य वाचत नाहीस तर मी तुझ्या कविता का वाचाव्यात ????
मी मुस्कटात मारल्या सारखा झालो ... आणि चोपडी उचलायला गेलो .... तर ते म्हणाले थांब बघू तरी .... त्यांनी आधल्या मधल्या चार पाच चाळल्या आणि म्हणाले ...
ते : कल्पना चांगली आहे .... पण वाचन हावे ..... नुसते यमक जुळवले की काव्य होत नाही ...
मी झक मारल्या सारखा झालो होतो ... पाया पडलो आणि काढता पाय घेतला .....
नंतर ठरवले वाळींब्यांच्या व्याकरणाचा आयचा घो !!! आपण आपल्याच ओळ्यांना आणि पांचट्यांना काव्य बोलायचे !!!

आपला,
(आडाणी कवि) विशुभाऊ

सोमवार, २३ एप्रिल, २०१२

गुजराती बोली ... आणि रस्त्यावर होडी !!!

रविवारी भल्या पहाटे ११ वजता आहमेदाबाद मधल्या हरिवंश सिंह सिसोदियाचा फोन आला ...
" विशुभाई क्या छो ??? जल्दी ऑफिस आना !!!"
मी : " गांडा क्या हुआ ??? सुबह सुबह परेशान कर राहा है ?"
तो : " विशुभाई  मैने होडी ली !!! वोह दिखानी है !!!"
मी: " अबे construction का धंदा छोडके मच्छीमार बानोगे क्या ?"
तो: " मै क्यू construction का धंदा बंद करुंगा??? मैने होडी घुमने केलीये लिया !!"
मी: " कहा घुमोगे साबरमती मे ??"
तो: " विशुभाई  ... मैने होडी नही ओडी लिया है .... वोह चार कंगन वाली गाडी !!"
मी: " यडझव्या .... ऑडी बोलते है रे उसको .... !!!"
पुलंचा डायलॉग आठवला तेव्हा .... " मला फक्त नीट बोलता येत होतं... त्याला ती विकात घेऊन चालवता येत होती !!!"..........

आपला,
(होडी स्वार) विशुभाऊ

मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

कालनिर्णय नेहमीच बदलता ...
नववर्षाच्या प्रतिज्ञा पण कधी बदला .....
महागाईला शिव्या नेहमीच देता .......
कधी सरकार पण बदला ...........

नवीन वर्षाच्या विशुभाऊ आणि परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !!!!!

बुधवार, १४ डिसेंबर, २०११

राजमान्य राजश्री श्री. नरेंद्र मोदी यांस,

राजमान्य राजश्री श्री. नरेंद्र मोदी यांस,
स. न. वि. वि.
लिहिण्यास कारण कि , गुजरातची प्रगती बघून माझा झालेला जळफळाट व तुम्हास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बदली घेण्यासाठी विनंती.
आज गेले सहा महिने मी गुजरातमध्ये कामा निमित्य राहत आहे. इथले सर्व हमरस्ते हे सुंदर रीतीने बांधलेले व एकही खड्डा नसलेला पाहून मला इथल्या कंत्राटदारांवर कीव आली. तुम्ही इथे इतके काम केले तरी इथे तुमचे कौतुक करणारे चेले नाहीत किंवा खंदे कार्यकर्ते नाहीत हे मला इथे कुठेही 'दात विचकावून हसतानाचे' ,'नमस्कार करतानाचे' , किंवा 'टाटा करत चालातानाचे' वगैरे बोर्ड नाहीत ह्या वरून दिसून आले आणि खूप वाईट वाटले.
तुम्ही इथे फक्त कारखानदारी चा विकास न करता कृषी आणि पर्यटनाचा सुद्धा विकास केला, भरपूर समाजकल्याणाचे काम केलेत, मग तुम्ही स्वतः काय कमावले? तुमचे स्वतःचे एक तरी कॉलेज किंवा टाऊनशिप आहे का ? ......... आमच्या महाराष्ट्रात या आम्ही तुम्हाला सर्व शिकवू.
तुम्ही जर माझ्या विनंतीला मान्यता देऊन आला नाहीत तर मी इथे गुजरात मध्येच राहिला येईन व येताना बिहारी पण घेऊन येईन. मग बघा तुम्हाला पण  'ती' वाली पाणीपुरी खायला लागेल !
आपला.
(नम्र) विशुभाऊ

शनिवार, २८ मे, २०११

.....आला तरी मी घेणार नाही !!


बाबा , हे कमळकर बघा काय बोलत आहेत ते !” बाळ घामा घूम होऊन ओरडत बाबांकडे आला,
बावळटा, शांत हो मी पण बातम्या बघतो !!” बाबा वैतागून बाळावर डावलले . . .
पण राजा आला तर माझे काय होईल ???” तोंडाचा चंबूकरून बाळाने बाबांना प्रश्न केला
अरे तो कशाला झक मारायला येतो आहे , त्याचे झकास चालू आहे, मला वाटते मीच चुकलो !” बाबांनी कपाळाला हात मारला.
आणि त्याने जर टिव्ही वाल्यांसमोर 'यायचे तर या मी नाही जाणार' म्हटले तर कसली विकेट पडेन ना तुमची !” बाळ बाबांना आगंठ्याने टुकटूक करत बोलला. .
खरच बावळट आहेस, आत पाठव त्या मिडीया वाल्यांना!!!!” बाबा गरजले . . .

---- १० मिनीटा नंतर बाबा मिडीया वाल्यान समोर -----
ह्ह्या तो कशाला येतो आहे ??? आणि आला तरी मी घेणार नाही !! “

आपला,
(खट्याळ) विशुभाऊ

गुरुवार, २६ मे, २०११

मराठी बाबा डॉट कॉम

मटा online वाल्यानी चालवलेली चावटगीरी सगळ्यांना ठाऊक आहेच पण काल सागर ने "महिला काँन्स्टेबलवर अत्याचार" ह्या बातमी कडेलक्ष वेधल्यावर खरच तळ पायची आग मस्तकात गेली . . .  अरे हरामखोरांनो तुम्ही आत्याचारावर लक्षवेधणार का अत्याचार करणार??? ही बातमी दाखवताना कॉन्स्टेबल च्या पार्श्वभाग दाखवला आहे . . .

धिक्कार आहे त्या एडिटरचा !!!!

आपला,
(संतापलेला) विशुभाऊ

सोमवार, २३ मे, २०११

बाबरी

साहेब : हॅलो सुनबाई का ?
सुनबाई : (घाबरत) हां हां बोला साहेब
साहेब : नशीब ओळखले . . .  मला वाटले आता ते पण नाही जमणार कि काय
सुनबाई: (थोड्याश्या वैतागून) बोला ना काय काम आहे ?
साहेब : हो तुझ्या तब्येतीची विचारणा करायला फोन नाही केला . . .  जाब विचारायला फोन केला आहे . .  मी ऐकले कि तू बाबरी बनवते आहेस???
सुनबाई: (थोड्या दचकून) हो हो तुम्हाला कोणी सांगितले
साहेब : आमचे गुप्तहेर खाते आजून शाबूत आहे . .  तुझ्या किटली सारखे नाही . .  तू समजतेस काय ग ??
सुनबाई: साहेब असे हात घाई वर नका येऊत, तुमच्या साठीच बनवते आहे . . 
साहेब : माझी इतकी काळजी असती तर अशी नसती वागलीस !!!
सुनबाई: आहो खऱ्या बाबरी मध्ये तुम्हाला कव्हर करणार नाहीच आहे . .  पण तुम्हाला आक्षेप आणि तमाशा करून लोकांचे लक्ष्य फिरवायला चान्स मिळेल आणि मला प्रमोशन साठी. . .
साहेब: तशी हुशार आहेस !!
सुनबाई: तुमच्या कडूनच शिकली , आता तुम्ही फोन केलातच आहे म्हणून सांगते . .  सगळ्याला मला आजून १०० खोक्याची गरज आहे (ओठ दाबून)
साहेब : !!!!!!!!#$%^&!!!!!!

आपला,
(खट्याळ) विशुभाऊ

बुधवार, १८ मे, २०११

गोळीबार...

इकब्या : सलाम भाई
भाई : वालेकुम इकब्या
इकब्या : काय भाई , मला सांगितलेत कि लादेन पण पाकिस्तान मध्ये सुरक्षित नाही , तर आपण काय ?? आणि मला इथे मुंबई ला पाठवले .... काल माझ्यावर हल्ला झाला !!!...
भाई : बाळा, तो हल्ला छोट्या ने नाही केला ... आपणच करवला ...
इकब्या : काय ????
भाई : अरे ... तुमको पता है ना.... मी आपल्या पोरांना फोन नाही करू शकत... मी अंडरग्राउंड आहे .... म्हणून तुझ्यावर म्हणजे तुझ्या त्या रक्षकावर हमाला केला ... म्हणजे आपल्या छोकरे लोगोंको पता चलेगा ... भाई चा भाई आहे मुंबई मध्ये ...
इकब्या : सही है भाई .... कल जो पाकिस्तान मी बंब फुटां... वो आपना सलाम था आपको .... खुदा हाफिस .....

आपला,
(खबरी) विशुभाऊ 

मंगळवार, १७ मे, २०११

एकच प्याला

बियर ची बाटली फेकून देताना मला नेहमीच दुःख होतं, म्हणून एक आयडियाची कल्पना डोक्यात आली आहे . ... इथे जोडलेले चित्र काय ते तुम्हाला सांगून जाईल...




आपला,
(कलाकारी) विशुभाऊ