'सोनेरी टोळी' हि १९१५ साली नाथमधवांनी लिहिलेली कादंबरी म्हणजे एका नैतिक
तत्वांवर चालणाऱ्या पण परिस्थितीमुळे आड मार्गाने पैसा कमावणाऱ्या १२
भामट्यांची कथा. हि कादंबरी एक शतक जुनी असली तरी त्यातले अनेक सामाजिक
संबंध आजच्या काळातही तंतोतंत लागू पडतात.
मुंबई मध्ये एका चाळीत
बिऱ्हाड असलेल्या १२ मित्रांची सद्मार्गाने पैसे कमावण्याची सर्व दारे
जेव्हा बंद होतात, तेव्हा अनैतिक पद्धतीने कमावणाऱ्या पण उजळ माथ्याने
फिरणाऱ्या समाज घटकांना अद्दल शिकवण्या साठी हि लोकं एक टोळी स्थापन करतात
तीच टोळी म्हणजे 'रायक्लब' उर्फ 'सोनेरी टोळी'. अनेक शकला लढवून लोकांना
टोप्या घालणारे त्यांचे किस्से वाचताना खूप मौज वाटते आणि हसायला सुध्दा
येतं.
तत्कालीन आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर सुध्दा छान
प्रकारे प्रकाश पाडला आहे. त्यावेळी समाजात असलेल्या जाती भेद, स्त्री
शिक्षण आणि विधवा पुनःविवाह इत्यादी विषयांवर सुध्दा परखड भाष्य केलेले
आहे, भले ते आपल्याला आता ते मुळीच रुचत नसले तरी त्यावेळची जन मानसिकता
समजते.
१९ व्या व २० व्या शतका मध्ये अनेक सुन्दर सहित्य निर्माण झाले
आणि ते आता लुप्त होण्याच्या मर्गावर आहे, तरी ते वाचताना एक गोष्ट
प्रखरतेने जाणवते ती म्हणजे आपण त्या नंतर अजून पर्यंत साहित्यात काहीच
प्रगती केलेली नाही. हे जुने साहित्य पुनः उपलब्ध करून दिल्याबद्दल 'समन्वय
प्रकाशन' चे मनापासून आभार.
आपला,
(वाचक) विशुभाऊ