हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

बुधवार, १४ डिसेंबर, २०११

राजमान्य राजश्री श्री. नरेंद्र मोदी यांस,

राजमान्य राजश्री श्री. नरेंद्र मोदी यांस,
स. न. वि. वि.
लिहिण्यास कारण कि , गुजरातची प्रगती बघून माझा झालेला जळफळाट व तुम्हास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बदली घेण्यासाठी विनंती.
आज गेले सहा महिने मी गुजरातमध्ये कामा निमित्य राहत आहे. इथले सर्व हमरस्ते हे सुंदर रीतीने बांधलेले व एकही खड्डा नसलेला पाहून मला इथल्या कंत्राटदारांवर कीव आली. तुम्ही इथे इतके काम केले तरी इथे तुमचे कौतुक करणारे चेले नाहीत किंवा खंदे कार्यकर्ते नाहीत हे मला इथे कुठेही 'दात विचकावून हसतानाचे' ,'नमस्कार करतानाचे' , किंवा 'टाटा करत चालातानाचे' वगैरे बोर्ड नाहीत ह्या वरून दिसून आले आणि खूप वाईट वाटले.
तुम्ही इथे फक्त कारखानदारी चा विकास न करता कृषी आणि पर्यटनाचा सुद्धा विकास केला, भरपूर समाजकल्याणाचे काम केलेत, मग तुम्ही स्वतः काय कमावले? तुमचे स्वतःचे एक तरी कॉलेज किंवा टाऊनशिप आहे का ? ......... आमच्या महाराष्ट्रात या आम्ही तुम्हाला सर्व शिकवू.
तुम्ही जर माझ्या विनंतीला मान्यता देऊन आला नाहीत तर मी इथे गुजरात मध्येच राहिला येईन व येताना बिहारी पण घेऊन येईन. मग बघा तुम्हाला पण  'ती' वाली पाणीपुरी खायला लागेल !
आपला.
(नम्र) विशुभाऊ

शनिवार, २८ मे, २०११

.....आला तरी मी घेणार नाही !!


बाबा , हे कमळकर बघा काय बोलत आहेत ते !” बाळ घामा घूम होऊन ओरडत बाबांकडे आला,
बावळटा, शांत हो मी पण बातम्या बघतो !!” बाबा वैतागून बाळावर डावलले . . .
पण राजा आला तर माझे काय होईल ???” तोंडाचा चंबूकरून बाळाने बाबांना प्रश्न केला
अरे तो कशाला झक मारायला येतो आहे , त्याचे झकास चालू आहे, मला वाटते मीच चुकलो !” बाबांनी कपाळाला हात मारला.
आणि त्याने जर टिव्ही वाल्यांसमोर 'यायचे तर या मी नाही जाणार' म्हटले तर कसली विकेट पडेन ना तुमची !” बाळ बाबांना आगंठ्याने टुकटूक करत बोलला. .
खरच बावळट आहेस, आत पाठव त्या मिडीया वाल्यांना!!!!” बाबा गरजले . . .

---- १० मिनीटा नंतर बाबा मिडीया वाल्यान समोर -----
ह्ह्या तो कशाला येतो आहे ??? आणि आला तरी मी घेणार नाही !! “

आपला,
(खट्याळ) विशुभाऊ

गुरुवार, २६ मे, २०११

मराठी बाबा डॉट कॉम

मटा online वाल्यानी चालवलेली चावटगीरी सगळ्यांना ठाऊक आहेच पण काल सागर ने "महिला काँन्स्टेबलवर अत्याचार" ह्या बातमी कडेलक्ष वेधल्यावर खरच तळ पायची आग मस्तकात गेली . . .  अरे हरामखोरांनो तुम्ही आत्याचारावर लक्षवेधणार का अत्याचार करणार??? ही बातमी दाखवताना कॉन्स्टेबल च्या पार्श्वभाग दाखवला आहे . . .

धिक्कार आहे त्या एडिटरचा !!!!

आपला,
(संतापलेला) विशुभाऊ

सोमवार, २३ मे, २०११

बाबरी

साहेब : हॅलो सुनबाई का ?
सुनबाई : (घाबरत) हां हां बोला साहेब
साहेब : नशीब ओळखले . . .  मला वाटले आता ते पण नाही जमणार कि काय
सुनबाई: (थोड्याश्या वैतागून) बोला ना काय काम आहे ?
साहेब : हो तुझ्या तब्येतीची विचारणा करायला फोन नाही केला . . .  जाब विचारायला फोन केला आहे . .  मी ऐकले कि तू बाबरी बनवते आहेस???
सुनबाई: (थोड्या दचकून) हो हो तुम्हाला कोणी सांगितले
साहेब : आमचे गुप्तहेर खाते आजून शाबूत आहे . .  तुझ्या किटली सारखे नाही . .  तू समजतेस काय ग ??
सुनबाई: साहेब असे हात घाई वर नका येऊत, तुमच्या साठीच बनवते आहे . . 
साहेब : माझी इतकी काळजी असती तर अशी नसती वागलीस !!!
सुनबाई: आहो खऱ्या बाबरी मध्ये तुम्हाला कव्हर करणार नाहीच आहे . .  पण तुम्हाला आक्षेप आणि तमाशा करून लोकांचे लक्ष्य फिरवायला चान्स मिळेल आणि मला प्रमोशन साठी. . .
साहेब: तशी हुशार आहेस !!
सुनबाई: तुमच्या कडूनच शिकली , आता तुम्ही फोन केलातच आहे म्हणून सांगते . .  सगळ्याला मला आजून १०० खोक्याची गरज आहे (ओठ दाबून)
साहेब : !!!!!!!!#$%^&!!!!!!

आपला,
(खट्याळ) विशुभाऊ

बुधवार, १८ मे, २०११

गोळीबार...

इकब्या : सलाम भाई
भाई : वालेकुम इकब्या
इकब्या : काय भाई , मला सांगितलेत कि लादेन पण पाकिस्तान मध्ये सुरक्षित नाही , तर आपण काय ?? आणि मला इथे मुंबई ला पाठवले .... काल माझ्यावर हल्ला झाला !!!...
भाई : बाळा, तो हल्ला छोट्या ने नाही केला ... आपणच करवला ...
इकब्या : काय ????
भाई : अरे ... तुमको पता है ना.... मी आपल्या पोरांना फोन नाही करू शकत... मी अंडरग्राउंड आहे .... म्हणून तुझ्यावर म्हणजे तुझ्या त्या रक्षकावर हमाला केला ... म्हणजे आपल्या छोकरे लोगोंको पता चलेगा ... भाई चा भाई आहे मुंबई मध्ये ...
इकब्या : सही है भाई .... कल जो पाकिस्तान मी बंब फुटां... वो आपना सलाम था आपको .... खुदा हाफिस .....

आपला,
(खबरी) विशुभाऊ 

मंगळवार, १७ मे, २०११

एकच प्याला

बियर ची बाटली फेकून देताना मला नेहमीच दुःख होतं, म्हणून एक आयडियाची कल्पना डोक्यात आली आहे . ... इथे जोडलेले चित्र काय ते तुम्हाला सांगून जाईल...




आपला,
(कलाकारी) विशुभाऊ  

मंगळवार, १९ एप्रिल, २०११

जैतापूर अणुउर्जा प्रकल्प: विवाद आणि अडचणी

मी माझ्या आधीच्या पोस्ट मध्ये जैतापूर च्या आंदोलकांनी घेतलेल्या पावित्र्याचा निषेध केला असला तरी प्रकल्पाच्या विरोधातच माझी मते आहेत. आता प्रकल्पाला विरोध का हे बऱ्याच जणांना माहित नाही आणि कित्येक ह्या लढ्यात उतरणाऱ्या राजकारण्यांना सुध्दा ते माहित नाही; म्हणून मी इथे विवादाची करणे थोडक्यात सांगत आहे... नक्की विचार करा :
१) कुठला ही आण्विक अपघात झाल्यास , दोषी विरुद्ध कायद्याने न्यायालयात जाण्याची परवानगी फक्त NPCL ला आहे अपघात ग्रस्त्याला नाही, असा अनुच्छेद Nuclear Damage Bill २०१० मध्ये आहे.
२) ह्या प्रकल्पा मुळे होणारा वातावरणा वरचा परिणाम ह्या बद्दल आण्विक-विरुद्ध संघटना अजून साशंक आहेत.
३) जैतापूर हे भूकंपाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील नसले तरी संवेदनशील आहे ( संवेदानाशिलातेच्या दृष्टीने झोन ३ मध्ये आहे )
४) जैतापूर येथील परमाणु कचऱ्याची विलेवाट ह्या विषयावर आजूनही स्पष्टीकरण आलेले नाही किंवा तोडगा सुचवला गेलेला नाही.
५) प्रकल्पा मध्ये समुद्राचे पाणी शीतलक म्हणून वापरून ते पुन्हा समुद्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे तिथल्या मास्यांवर आणि मासेमारी धंद्यावर पडणाऱ्या परिणामाचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

आपला,
(विचारी) विशुभाऊ

जैतापूर आणि गोळीबार

जैतापूर मध्ये झालेल्या प्रकरणाचा काल मी खुप विचार केला , त्याच्या बर्याच चित्रफिती पहिल्या..... खरे तर जैतापूर प्रकल्पाच्या विरोधातच माझी भूमिका होती आणि आहे, तरी कालचा प्रकार जो आंदोलकांनी केला त्याचा मी नक्कीच निषेध करेन. आंदोलनाचा आणि पोलीस स्टेशन जाळण्याचा काय संबंध???
मला तर असे वाटते की काल जे जाळपोळ करायला गेले त्यांचा आणि आंदोलनाचा काहीच संबंध नाही, त्यांना पोलीस स्टेशन जाळून रेकॉर्ड्स नष्ट करायचे होते आणि त्यात जर पोलिसांनी गोळीबार केला तर काय चुकले ???
मित्रानो कोणत्याही चांगल्या आंदोलनाला साहाय्य करणे चांगलेच पण त्याचा फायदा घेऊन वाईट किंवा स्वार्थी कृत्य करणे हे तितकेच निन्दनीय आहे. जर आज आपण गोळीबारात मारल्या गेलेल्याला श्रद्धांजली देण्याचा विचार करत असाल , तर एकदा नक्कीच सारासार विचार करा.
आपला,
(आंदोलक) विशुभाऊ

सोमवार, १८ एप्रिल, २०११

मराठी ब्लॉगर्स मेळावा २०११


माझ्या ब्लॉगर्स मित्र मैत्रीणींनो ,

ह्या वर्षी चा मराठी ब्लॉगर्स मेळावा दादर , मुंबई येथे सायंकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत करण्याचे योजलेले आहे. मेळाव्याची वेळ , स्थळ ह्याच बरोबर रुपरेषा ह्या सर्वांचा विचार करता फक्त ७५ सदस्यांनाच येथे नोंदणी करण्याचे बंधन नाईलाजाने घालावे लागले आहे त्या बद्दल क्षमस्व !
नोंदणी साठी http://marathibloggersmeet.blogspot.com/2011/04/mbm-mumbai-2011-registration.html येथे टिचकी मारावी

आपले,
(आयोजक)
विशुभाऊ रणदिवे
कांचन करई
महेंद्र कुलकर्णी
सुहास झेले

शुक्रवार, ४ मार्च, २०११

मै शायर तो नही. . . .

ज्या प्रमाणे जे फक्त स्वतः साठी गातात त्यांना 'बाथरूम सिंगर' म्हणतात , त्याच प्रमाणे स्वतः साठी कविता लिहिणाऱ्यां साठी पण एखादा शब्द पाहिजे. मी स्वतः साठी कविता करतो (खरं तर यमक जुळवतो). तरी शायरी आणि गझल हे माझे खास आवडीचे विषय.
इयत्ता चौथीत असताना मी पहिल्यांदा प्रेमात पडलो आणि मार्झा गालिब माझे सोबती झाले. मला उर्दू तर येत नव्हती पण आर्थ समजून उगाच त्याचे मराठीत भाषांतर/भावांतर करत 'तिला' ऐकवत आलो. गेल्या काही दिवसान पासून मी उर्दू जरा मनावर घेऊन अभ्यास चालू केला, व एक गझल सर्दुष्य काव्य केलं ( ह्यात रदीफ आहे पण काफिया जुळला नाही) , पहिलाच प्रयत्न म्हणून मातला आणि मकता मध्ये संपवले.

काफिया है पर रदिफ नही , मतला है पर मकता नही ।
अरे कमिनो ये मेरी जिंदगी है , कोई गज़ल नही ।

नही रोक सकती तुझे कोई सऱहदे , ना कोई इनसान की सलाखे ।
'आझाद' तेरी खुदा से बंदगी है, कोई काफिरोंका बंदी नही ।

इथे काफिर म्हणजे 'माणुसकी नसणारा' ह्या अर्थाने आहे , व 'आझाद' हे माझे तखल्लुस .....

आपला,
(आझाद) विशुभाऊ

रविवार, ९ जानेवारी, २०११

पूर्व दिशा

भारत वर्षाला हजारो हजारो वर्षांचा इतिहास आहे. हजारो वर्षान पासून इथे धार्मिक कार्य, वास्तुशास्त्र हे दिशा प्रमाण मानून होतात, आणि ह्याच गोष्टीनी मला लहान पणा पासून संभ्रमात टाकणारा प्रश्न निर्माण केला ' आधी लोहचुंबक कि आधी दिशा? '.....


ह्या विषयाचा शोध घेताना बरीच पुस्तकं वाचली बर्याच विद्वानांचे निष्कर्ष वाचले आणि एकदा लहानपणी डॉ. प. वि. वर्तक यांचे 'वास्तव रामायण' वाचण्यात आले आणि शोधाला दिशा मिळाली. गेल्या आठवड्यात माझे त्यावेळी केलेले संशोधन आणि हस्तलिखिते मिळाले आणि पुन्हा त्या विषयाला उजाळा आला; तर चला बघूया आपले पूर्वज दिशा कसे ओळखत असत ......

रामायणात प्रत्येक दिशेचे सुंदर वर्णन सुग्रीव ह्याने आपल्या वानर सेनेला सिताशोधार्थ पाठवताना केले आहे. किष्किंधा सर्ग ४० मध्ये सुग्रीव खालील प्रमाणे पूर्व दिशेचे वर्णन वानर सेनेचा सेनापती विनात याला करतो:


त्रिशिराः कांचनः केतुः तालः तस्य महात्मनः ।
स्थापितः पर्वतस्य अग्रे विराजति स वेदिकः ॥४-४०-५३॥


अर्थ: तीन शिरा असलेल्या सोनेरी तालवृक्षाकृती त्याचे महत्म असून, ते पर्वताच्या अग्रभागावर स्थापित आहे.

पूर्वस्याम् दिशि निर्माणम् कृतम् तत् त्रिदशेश्वरैः ।
ततः परम् हेममयः श्रीमान् उदय पर्वतः ॥४-४०-५४॥
तस्य कोटिः दिवम् स्पृष्ट्वा शत योजनम् आयता ।
जातरूपमयी दिव्या विराजति स वेदिका ॥४-४०-५५॥


अर्थ: त्रीदशेश्वाराने पूर्व दिशेला ह्याचे (तालवृक्षाचे) निर्माण केले, त्याच्या मागे सोनेरी (हेममयः) उदय पर्वत आहे. त्याचे कोटी दिव्य स्पृष्ट हे शंभर योजने उंचीचे आहे, व जो सोनेरी दिव्य विराजित करतो.

इथे सुग्रीवाने पूर्व दिशेची ओळख म्हणून उदय पर्वतावर कोरलेल्या एका सोनेरी तालवृक्षाची खुण सांगितली आहे, आणी ही खुण दुसरे तिसरे काही नसून पेरू देशातला मधला 'Trident' आहे, व त्याचेच हे तंतोतंत वर्णन आहे. त्या पूर्वेच्याखुणेला कसे पोहचायचे ह्याचे वर्णन सुद्धा सर्ग ४० मध्येच आहे.





नदीम् भागीरथीम् रम्याम् सरयूम् कौशिकीम् तथा || ४-४०-२० ||
कालिंदीम् यमुनाम् रम्याम् यामुनम् च महागिरिम् |
सरस्वतीम् च सिंधुम् च शोणम् मणि निभ उदकम् ||४-४०-२१ ||
महीम् कालमहीम् चैव शैल कानन शोभिताम् |
ब्रह्ममालान् विदेहान् च मालवान् काशि कोसलान् ||४-४०-२२ ||
मागधाम् च महाग्रामान् पुण्ड्रान् अंगाम् तथैव च |
भूमिम् च कोशकाराणाम् भूमिम् च रजत आकराम् ||४-४०-२३ ||


अर्थ: (सुग्रीव विनत ला सांगतो) भागीरथी नदी ( बघ) ,रम्य शरयू नदी ,कौशिक नदी बघ. कालीन्दिम पर्वतातून वाहणारी नदी यमुना बघ तिचा उगम रम्य महागीरीत आहे. सरस्वती नदी पण बघ सिंधू नदी पण बघ आणी शोणाम नदी बघ ज्याचे पाणी मोत्या सारखे आहे. महिम नदी बघ कालमहिम बघ जे जंगलाने शोभित आहे, ब्रह्ममालान , मालवान , काशी, कोसलान (सारखी राज्ये) सुध्दा बघ. मागध सारखे महाग्राम बघ , पुण्ड्रान , अंगाम सुद्धा तिथेच आहेत. कोषकाराची ( कोषातून रेशीम उत्पन्न करणार्यांची) भूमी बघ , रजताची (चांदीची) भूमी बघ.



पूर्वेला कसे जायचे हे सांगताना सुग्रीव विंध्य पर्वताच्या उत्तरेस म्हणजे दक्षिण भारताच्या उत्तरेस आणी यमुना नदीच्या पूर्वेस असणाऱ्या सर्व प्रदेश सांगतो. ब्रह्ममालान , मालवान , काशी, कोसलान, मागध , अंगाम इत्यादी राज्ये सांगितल्यावर तो रेशीम उत्पन्न करणारे आणी चांदीची खाणी असणारे प्रदेश बघायला सांगतो. ह्या सर्वाचे वर्णन ऐकल्या वर हा प्रदेश म्हणजे आजचा ब्रम्हदेश वाटतो.

त्यापुढे त्याने जे वर्णन केले आहे, ते सयाम, चीन आणि जपान सारखे असून पढे प्रशांत महासागरातून दक्षिण अमेरिकेचे वाटते.

सध्या आपण प्रशांत महासागरातील काल्पनिक रेषा जी पूर्व मानतो, त्या पेक्षा हजारो वर्षान पूर्वी आपल्या पूर्वजांनी प्रशांत महासागरा पलीकडील पर्वत ही पूर्व मानून त्यावर 'तालवृक्ष' म्हणजे 'Trident' कोरला...



आपला,

(दिशाशोधी) विशुभाऊ

रविवार, २ जानेवारी, २०११

झिरो डायल

गेले ५ महिने वाचन आणि लिखाणाच्या बाबतीत माझे फार उदासीन गेले . पण मागील आठवड्यात थोडा व्यापातून मोकळा झालो आणि "Zero Dial" हे 'जे. डे' यांनी लिहीलेले व  'जयको पब्लीकेशन' यांनी प्रकाशीत केलेले पुस्तक वाचायची संधी मिळाली.
हे पुस्तक, पोलिसांचे खबरी (informers) आणि त्यांचे आयुष्य व त्यातिल संकटं ह्यांचा आढावा घेणारे सत्य घटणेवर आधारीत नव्हे सत्यघटणाच सांगणारे व एका पत्रकाराच्या द्रुष्टीने प्रकाश टाकणारे आहे.
तिन खबरी आणि पोलिस ह्यांनी केलेली कामे आणि त्यातिल फसवे व किळसवाणे राजकारण . . .  दाऊद- छोटा राजन ह्यांच्या टोळी युध्दात खबरींनी केलेली कामे. . . एक फार घाणेरडं जग जे ड्रग्ज, गुह्णे आणि कुंठणखाना ह्यांनी भरलेलं आणि त्यात शोधत जगणारा आशावाद. . .  भरतातील कुख्यात अतंकवादी रियाज़ भटकळ ह्याचा पाठलाग व खबरीं, पोलिस आणि इंटेलिजन्स ब्युरो यांनी केलेली मेहनत. . . ह्या सगळ्या मुद्यांचा मेळ ह्या पुस्तकात फार सुंदर प्रकारे घातला आहे .
डे हे मुंबई मधले एक प्रसिध्द पत्रकार आहेत व त्यांच्या प्रतिभावंत लिखाणामुळे वाचनाची मजा काही ऒरच होती. . . .


आपला,
(वाचक) विशुभाऊ..