हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

मंगळवार, १९ एप्रिल, २०११

जैतापूर आणि गोळीबार

जैतापूर मध्ये झालेल्या प्रकरणाचा काल मी खुप विचार केला , त्याच्या बर्याच चित्रफिती पहिल्या..... खरे तर जैतापूर प्रकल्पाच्या विरोधातच माझी भूमिका होती आणि आहे, तरी कालचा प्रकार जो आंदोलकांनी केला त्याचा मी नक्कीच निषेध करेन. आंदोलनाचा आणि पोलीस स्टेशन जाळण्याचा काय संबंध???
मला तर असे वाटते की काल जे जाळपोळ करायला गेले त्यांचा आणि आंदोलनाचा काहीच संबंध नाही, त्यांना पोलीस स्टेशन जाळून रेकॉर्ड्स नष्ट करायचे होते आणि त्यात जर पोलिसांनी गोळीबार केला तर काय चुकले ???
मित्रानो कोणत्याही चांगल्या आंदोलनाला साहाय्य करणे चांगलेच पण त्याचा फायदा घेऊन वाईट किंवा स्वार्थी कृत्य करणे हे तितकेच निन्दनीय आहे. जर आज आपण गोळीबारात मारल्या गेलेल्याला श्रद्धांजली देण्याचा विचार करत असाल , तर एकदा नक्कीच सारासार विचार करा.
आपला,
(आंदोलक) विशुभाऊ

४ टिप्पण्या:

  1. काल झालेलं आंदोलन राजकीय दृष्ट्या प्रेरित होत, त्यामुळे ते पोलीस स्टेशन जाळले गेले. लोकांना स्वतः कळायला हवे आपले हित कशात आहे. नाही तर उद्या कॉंग्रेस अशी हजोरो माणस उभी करतील ज्यांचा प्रकल्पाला विरोध नाही...

    उत्तर द्याहटवा
  2. विशु भाऊ...सामान्य जनतेशी काही घेण देण नाही आहे...सामान्य जनता सोडा राजकीय नेत्यांना पण या प्रकल्पाबद्दल काहीच माहित नाही..प्रत्येक जण आप आपल्या स्वार्थाच राजकारण करतो आहे.

    उत्तर द्याहटवा