हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

सोमवार, ४ जानेवारी, २०१०

नवी पिढी

"तू मोठा होऊन कोण बनणार?"
"ST BUS Driver!!" .....

लहानपणी कोणीएका कुचकट माणसाने विचारलेल्या प्रश्नाला मी दिलेले प्रामाणिक उत्तर , हो ! खरंच मला लहानपणी ST dirver होण्याचे त्याच्या सारखे भरपूर फिरण्याचे फार अपरूप होते..... आता ते आठवले की हसायला येते ... मूर्खपणाचे वाटते...

पण हाच प्रश्न आताच्या मुलांना आपण जेव्हा विचारतो तेव्हा ते थक्क करणारी उत्तरे देतात ... "हिप हॉप डान्सर होणार !" .... "बायोइन्फोटेक मध्ये संशोधन करणार".... च्या मारी टोपी ह्या वयात आम्हाला संशोधन हे फक्त न्युटन नामक जंतूचे काम असून तो आमच्या विज्ञानाच्या बापट सरांच्या पोटात राहतो असे वाटत असे... खरंच ही आजकालची नवीन पिढी किती फोकस आहे !!! त्यांचा अभिमान तर वाटतोच पण आपल्याला न्युनगंड पण आणतात ही पोरं.....

दोस्तांनो झपाट्याने प्रगत होणारी ही पिढी आपल्याला लवकरच म्हातारी करून निवृत्त करणार हे नक्की !!!

आपला,

(न्यूनगंडी निवृत्तीनाथ) विशुभाऊ ....