राजकारणामध्ये स्त्रीयांना १००% आरक्षण मिळावे ह्या विचार धारणेचा मी आहे, ह्याचे कारण म्हणजे रस्त्यावर लागणारे वाढदिवसाचे फलक; ह्या फलकां मधले चेहरे बघून मन उबगले आहे.
आज काल फ्लेक्स चे फलक कोणी ही बनवतात आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.... ज्याला रोजच्या जिवनात रस्त्यावरचं काळं कुत्रही विचारत नाही तो कार्यसम्राट, ह्रुदयसम्राट वगैरे बनतो...... काही असेच फलक बघून मन उबगलेले होते आणि ह्याचाच विचार करत मला झोप लागली.... सकाळी झोपेतून उठून बघतो तर काय , माझ्या घरा समोर मोठा फलक लागलेला होता आणि त्यावर लिहीलेले होते...
थोरविचारवंत समाजसुधारक प्रबोधनकार विशुभाऊ रणदिवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
शुभेच्छूक,
नाना , तात्या, बाळ्या, गोट्या आणि समस्त परिवार ....
.
.
.
.
आपला,
(प्रबोधनकार) विशुभाऊ .....
शनिवार, ३१ जुलै, २०१०
सोमवार, २६ जुलै, २०१०
संशोधन (ई.स. २९९९)
मराठी ह्या भाषेबद्दल इतिहासात भरपूर वाद होते असे संशोधनाअंती लक्षात येते. मराठी भाषा आणि मराठी भाषीक लोकं ह्यांच्या भवतालचे बरेच प्रवाद लिखीत स्वरूपात उपलब्द्ध आहेत.
मराठी ही जमात त्यावेळची सगळ्यात छळलीगेलेली किंवा सगळ्यात छळीक जमात होती (दोन विरोधाभासी प्रतिमा) व ह्या दोन्ही प्रतिमेबाद्दल अजुनही इतिहासात वाद आहेत. मराठी भाषेची सुरवात ही विसाव्या शतकातकाच्या उत्तरार्धात झाली असून ठाकरे आडणावाच्या कुटूंबाने ती केली असावी असे केलेल्या संशोधनाअंती वाटते.
त्यावेळच्या मराठी लोकांची आजूबाजूच्या सगळ्याच प्रदेशांशी भांडणे होती. तात्कालीन उत्तर प्रदेश आणि बिहार ह्या गरीब प्रदेशातील लोकांवर त्यांनी मारहाण केली होती ,आंध्रप्रदेशातील लोकांचे पाणि अडवले होते, आणि कर्नाटक राज्यातील काही प्रदेश बळकवण्याचा प्रयत्न केला होता. ह्या सगळ्या घटणांना तेव्हा राजकारण म्हटले जात असे; ठाकरे घराण्यातील एका प्रसिध्द व्यक्तीचे नाव ’राज’ होते, व ह्या वरून ’राज’कारण हा शब्द तयार झाला असावा.

सुरवातीच्या काळात मराठी ही ईंग्रजी अक्षरं वापरून लिहीली जात असे, व तेव्हा ईंग्रजी अक्षरं ABCD ने चालू होत असत. त्या नंतर एकविसाव्या शतकाच्या पुर्वार्धात युनिकोड चा शोध लागल्यानंतर मराठी भाषेला आपली लिपी मिळाली, व त्या नंतर ईंग्रजी अक्षरांची QWERTY ने सुरवात होऊ लागली.
आपला,
(संशोधक) विशुभाऊ
आपला,
(संशोधक) विशुभाऊ
शुक्रवार, १६ जुलै, २०१०
वर्ल्डकप !!
शेतकरी राजा नेहमी प्रमाणे सकाळी पाच वाजता उठून मनन-चिंतन करत बसला होता.... बरेच दिवस त्याला मिळालेल्या विजया मुळे तो थोडा पेचात होता.....
राजा : कोण आहे रे तिथे ????
प्रधान : मी आहे साहेब, बोला काय काळजी आहे??
राजा : प्रधान, तुम्हाला माहीत आहेच एवढ्या मोठ्या खेळ समुहाचे अध्यक्ष-पद म्हणजे किती जबाबदारी , वरून आपले कृषी खाते!!!
प्रधान : साहेब, ही चिंता अपेक्षीत होती !
राजा : म्हणजे??? तुम्हाला सुध्दा वाटते, दोन्ही गोष्टी आम्ही सांभाळू शकत नाही ????
प्रधान : साहेब, असे कसे होईल ???? मला एक सांगा , आज काल तुम्ही कोणाला गोट्या / विटी दांडू म्हणजे आपले लहान पणी चे खेळ खेळताना पाहीले आहे का?
राजा : नाही ...
प्रधान : अहो, आज कालची मुले क्रिकेट पण नाही खेळत !!!
राजा : मग करतात काय ही कार्टी ??????
प्रधान : साहेब, आपला देश हा कृषी प्रधान आहे ... ’फार्मविले’ खेळतात !!!
राजा : क्या बात है !
प्रधान : म्हणून आपण एक नवीन वर्ड्कप चालू करू ’फार्मविले वर्ड्कप’.... २०११ मध्ये हा वर्ड्कप पहीला आपल्या गावातच होईल !!!
राजा : ( एक टाळी आणि उडी मारून) प्रधानजी माझा रथ काढा !!!
आपला,
(प्रधान) विशुभाऊ ..

सोमवार, ७ जून, २०१०
कट्टा
कॉलेज कट्टा म्हणजे त्या वयातल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय.... कितीही टेंशन मध्ये असलो, तरी कट्यावर गेलो की कसे छान वाटे ,मग प्रसंग काही असो... घरचे प्रश्न, कॉलेज मधली ब्लॅक लिस्ट ते थेट प्रेम भंग , सगळ्याचे निवारण तिथेच धुरांच्या वलयांमध्ये आणि पानाच्या पिचकाऱ्यांमध्ये व्हायचे...
आज बऱ्याच वर्षांनंतर कट्ट्यावर जायचे ठरवले... जाताना बऱ्याच कल्पना रंगवल्या होत्या.... वाटले होते जुने सोयरे भेटतील, मजा मस्ती होईल... रंग्याचे जोक, भिक्या च्या थापा, बापट्याच्या कविता ऐकायला मिळतील..नविन जोमाचे नविन जवान आपला कट्टा रंगवत असतील... पक्या नेहमी प्रमाणे ऊधारी ची आठवण करून बिडी हातात टेकवत असेल..... मी खुप एक्सायटेड होतो... चालता चालता आतंर संपतच नव्हते, शेवटी तर धावत सुटलो, जवळ जवळ पाच एक वर्षांचे अंतर जे कापत होतो मी.... आणि जेव्हा पोहचलो तेव्हा मला जोराचा धक्काच बसला....
पक्या बिचारा कुठेतरी शुन्यात नजर लावून पानाला कथ्था लावत होता (कोणाच्या ठाऊक नाही).... कट्टा रिकामा होता, रंग्या-भिक्या तर नाहीच पण नविन पोरं सुध्दा नाहीत... पक्याला विचारले तर त्याने काही न बोलता हात पालथे करून दाखवले.... मी पण थोडे सावरण्या साठी सिगारेट सुलगवली आणि जुन्या आठवणीन मध्ये उभा राहीलो... तेवढ्यात कॉलेज ची काही मुलं माझ्या समोर ऊभी राहिली व अभ्यासा बद्दल बोलू लागली, मी दुर्लक्ष करणारच तितक्यात मला जाणवले की ही पोरं फ़ेसबुक आणि ट्विटर वर रात्री कट्टा जमवण्याच्या प्लॅन करत होते....
मला त्या पोरांची खुप किव आली ............. सिगरेट न पिणारी, तंबाखू न खाणारी, फक्त इंटरनेट वर मित्रांना भेटणारी ही नविन पिढी आपली संस्कृती, आपला कट्टा काळाआड गायब करणार; हे बघून माझे ह्रदय तिळ तिळ तुटले.....
आपला,
(कट्यावरचा) विशुभाऊ

रविवार, ६ जून, २०१०
प्राध्यापकांचे इंग्रजी आणि मी , भाग - १
आमच्या ईंजिनिअरींग कॉलेज मधल्या प्राध्यापकांचे इंग्रजी म्हणजे नक्कीच एक संशोधनाचा विषय. खाली दिलेली जी उदाहरणे आहेत ती मी नविमुंबई मधल्या एका डिप्लोमा कॉलेज ला होतो तेव्हाची....
१) आमच्या वेळी डिप्लोमा्ला वार्षिक अभ्यासक्रम होता, माझे पहिलेच वर्ष... फिजीक्स (भौतीकशास्त्र) ह्या विषयाला आम्हाला पहिले सहा महिने कोणी शिक्षकच नव्हते. नंतर जे आले ते एकदम सहा फूट १०० किलो चे आजोबा. त्यांनी येताच आमचे प्रॅक्टिकल्स चालू केली.... आम्ही सगळे लॅब च्या बाहेर, रांगेत उभे होतो आणि सरोबा समोर टेबल वर बसलेले होते... ते तिथुनच ओरडले "रोल नंबर वन टू फ़िफटी हॅव एन्ट्री आदर हॅव डिसेंट्री" .... मी रणदिवे रोल नंबर ९० म्हणजे मला "डिसेंट्री".....
२) गणिताचा तास म्हाणजे हक्काचा मस्ती करायचा तास, त्या वेळी आमचे पुजारी सर फक्त फळ्या कडे बघून शिकवायचे, मागे वळून सुध्दा बघायचे नाहीत... पण त्या ऐतिहासीक दिवशी मी मस्तीत जाम सुटलो होतो आणि आमच्या सरांचा सुध्दा तोल सुटला, ते जोरात माझ्या वर ओरडले " रणदिवे स्टॅंडप" , मी चुपचाप स्टॅंडलो, व पुढिल आदेशाची वाट पहात होतो... पाच मिनीटे गेली सर माझ्या तोंडाकडेच बघत उभे, काही बोलेनाच.. अजुन पाच मिनीटांनी ते मला म्हणाले " फॉलो मी" ... मी चुपचाप त्यांना फॉलो करत दरवाजाच्या बाहेर गेलो व ते मला म्हणाले " नाऊ डोंट फॉलो मी".................
३) आमचे वैद्य सर म्हणजे त्यांच्या विषयातले गाढे-पंडीत, पण इंग्रजी हा त्यांचा नक्कीच विषय नव्हता... मला एकदा मेकॅनिक्स च्या प्रॅक्टिकल ला जायला उशीर झाला, वैद्यसर माझ्यावर भडकले व त्यांनी मला खडसावून विचारले
सर : " व्हाय लेट??"
मी : " ???????"
सर : " आय एम आस्किंग यू , व्हाय लेट??"
मी : " सर माय सायकल गॉट पंक्ट्चर, सो...."
सर ( समोर च्या मैदाना कडे बोट दाखवत): " नाउ रोटेट द ग्राउंड फ़ोर टाईम्स..."
मी आपला ग्राऊंड चार वेळा रोटेट करून परत सरां-समोर उभा राहीलो, सरांना कदाचीत माझी दया आली असावी ते मला म्हणाले " नाउ गो ऍंड अन्डरस्टॅंड द ट्री!!"
आपला,
(भयंकर इंग्रजी) विशुभाऊ

बुधवार, १२ मे, २०१०
टुगेदर
माणूस आणि त्याचे मन , हा वर्षानु वर्षे न सुटलेला गुंता व तेच मन ताब्यात ठेवण्यासाठी माणसानेच बनवलेली चाकोरी , धर्म बंधने वगैरे वगैरे. ह्याच मनाचा एक भाग म्हणजे सध्या गाजत असलेला कलम ३७७ म्हणजेच समलैंगीकता. झिरो डिग्री प्रोडक्शन चे गौतम परब निर्मित नाटक 'टुगेदर' म्हणजे हाच विषय.
ह्या नाटकात दोन लेस्बियन मैत्रिणी, त्यांचे हळुवार संबंध व त्यांची मानसिकता फार सुंदर प्रकारे खुलवून दाखवलेली आहे. हे नाटक म्हणजे फक्त समलैंगीकता नसून चाकोरी बाहेर विचार करणार्याचा व स्वतः चे अस्तित्व शोधणार्या एका व्यक्तीचा लढा आहे. विनी ह्या पत्राला स्वतःला सिध्द करण्यासाठी काय काय करावे लागते आणि तिला आलेले अनुभव, हे नक्कीच हृदयाला हात घालून जातात.
मी पाहिलेले 'टुगेदर' नाटक हे प्रायोगिक नाटक होते, पण हे नक्कीच 'व्हाईट लिली' किंवा तत्सम नाटकाच्या बरोबरीचे होईल ह्यात तुसभर सुद्धा संदेह नाही.
आपला,
(नाटकी) विशुभाऊ
बुधवार, ३१ मार्च, २०१०
सोमवार, ४ जानेवारी, २०१०
नवी पिढी
"तू मोठा होऊन कोण बनणार?"
"ST BUS Driver!!" .....
लहानपणी कोणीएका कुचकट माणसाने विचारलेल्या प्रश्नाला मी दिलेले प्रामाणिक उत्तर , हो ! खरंच मला लहानपणी ST dirver होण्याचे त्याच्या सारखे भरपूर फिरण्याचे फार अपरूप होते..... आता ते आठवले की हसायला येते ... मूर्खपणाचे वाटते...
पण हाच प्रश्न आताच्या मुलांना आपण जेव्हा विचारतो तेव्हा ते थक्क करणारी उत्तरे देतात ... "हिप हॉप डान्सर होणार !" .... "बायोइन्फोटेक मध्ये संशोधन करणार".... च्या मारी टोपी ह्या वयात आम्हाला संशोधन हे फक्त न्युटन नामक जंतूचे काम असून तो आमच्या विज्ञानाच्या बापट सरांच्या पोटात राहतो असे वाटत असे... खरंच ही आजकालची नवीन पिढी किती फोकस आहे !!! त्यांचा अभिमान तर वाटतोच पण आपल्याला न्युनगंड पण आणतात ही पोरं.....
दोस्तांनो झपाट्याने प्रगत होणारी ही पिढी आपल्याला लवकरच म्हातारी करून निवृत्त करणार हे नक्की !!!
आपला,
(न्यूनगंडी निवृत्तीनाथ) विशुभाऊ ....

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)