हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

सोमवार, २६ जुलै, २०१०

संशोधन (ई.स. २९९९)

मराठी ह्या भाषेबद्दल इतिहासात भरपूर वाद होते असे संशोधनाअंती लक्षात येते. मराठी भाषा आणि मराठी भाषीक लोकं ह्यांच्या भवतालचे बरेच प्रवाद लिखीत स्वरूपात उपलब्द्ध आहेत.

मराठी ही जमात त्यावेळची सगळ्यात छळलीगेलेली किंवा सगळ्यात छळीक जमात होती (दोन विरोधाभासी प्रतिमा) व ह्या दोन्ही प्रतिमेबाद्दल अजुनही इतिहासात वाद आहेत. मराठी भाषेची सुरवात ही विसाव्या शतकातकाच्या उत्तरार्धात झाली असून ठाकरे आडणावाच्या कुटूंबाने ती केली असावी असे केलेल्या संशोधनाअंती वाटते.

त्यावेळच्या मराठी लोकांची आजूबाजूच्या सगळ्याच प्रदेशांशी भांडणे होती. तात्कालीन उत्तर प्रदेश आणि बिहार ह्या गरीब प्रदेशातील लोकांवर त्यांनी मारहाण केली होती ,आंध्रप्रदेशातील लोकांचे पाणि अडवले होते, आणि कर्नाटक राज्यातील काही प्रदेश बळकवण्याचा प्रयत्न केला होता. ह्या सगळ्या घटणांना तेव्हा राजकारण म्हटले जात असे; ठाकरे घराण्यातील एका प्रसिध्द व्यक्तीचे नाव ’राज’ होते, व ह्या वरून ’राज’कारण हा शब्द तयार झाला असावा.
सुरवातीच्या काळात मराठी ही ईंग्रजी अक्षरं वापरून लिहीली जात असे, व तेव्हा ईंग्रजी अक्षरं ABCD ने चालू होत असत. त्या नंतर एकविसाव्या शतकाच्या पुर्वार्धात युनिकोड चा शोध लागल्यानंतर मराठी भाषेला आपली लिपी मिळाली, व त्या नंतर ईंग्रजी अक्षरांची QWERTY ने सुरवात होऊ लागली.

आपला,

(संशोधक) विशुभाऊ

८ टिप्पण्या:

 1. विशुभाऊ आपल्या या कठोर परिश्रमानंतरचे संशोधन खूपच मोलाचे आहे.... आणि आपले संशोधन असेच चालू राहावे, हीच सधीच्छ्या.
  धन्यवाद!!!

  उत्तर द्याहटवा
 2. ह्यॅह्यॅह्यॅ... विशुभाऊ तुमचे टोमणे एकदमच जोरात बसलेत की राव...

  उत्तर द्याहटवा
 3. विशुभाउ खुप मोठ संशोधन केल आहे आपण...त्याबद्दल आपले खुप खुप आभार...:)

  उत्तर द्याहटवा
 4. @सौरभ @मनमौजी @आप .... मित्रांनो तुमच्या प्रतिक्रीयेतच लिहीण्याचा आनंद सामावलेला आहे... धन्यवाद !

  उत्तर द्याहटवा