ही २००५ मधली गोष्ट आहे. इंजिनीअरींग साठी पुण्याला (निगडी प्राधीकरण)
मध्ये रहात होतो. इंजिनीअरींगचे शेवटचे वर्ष होतं, आणि पेईंग गेस्ट म्हणून
जे घर मिळाले होतं ते जरा भारलेलं होतं. रोज रात्री २.३० वाजता पलंग एकदा
थरथरायचा. पण नंतर त्या गोष्टीची इतकी सवय झाली की 'अलार्म' असावा ह्या
पध्दतीने मी घ्यायला लागलो.
माझे घर कॉलेजला लागून असल्याने परिक्षेच्या वेळी बरीच मित्र मंडळी माझ्या
रूमवर अभ्यास करायला असायची. सातवी सेमिस्टर होती, सगळे मरमरून अभ्यास करत
होते. रात्री नेहमी प्रमाणे पलंग हालल्यावर (आता पर्यंत सगळ्यांना ह्याची
सवय झाली होती) आम्ही ठरवले की भक्ती शक्ती समोरच्या जकात नाक्यावर बुर्जी
पाव वगैरे खाऊन येऊ. आमच्यातला उज्वल नावाचा मित्र म्हणाला 'माझे नोटस
काढून होतच आहेत, तुम्ही पुढे व्हा मी येतो मागून पळत'......
आम्ही जकात नाक्यावर बुर्जी पाव खाऊन, चहा सिगारेट मारून निघालो तरी उज्वल
काही आला नाही. आम्ही त्याच्या नावाने शंक करत घरा जवळ पोहचतोच तर हा
गेटच्या बाहेर झोपलेला/बेशुध्द दिसला. उठता उठेना, शेवटी काकूंना (घर
मालकीण) ऊठवले आणि त्यांना सांगितले. त्या आम्हाला ओरडल्या की 'रात्रि
गेटच्या बाहेर जायचे नाही सांगितले होते ना!!' आणि त्यांनी उज्वल वरून
तांदूळ उतरवले तेव्हा त्याला शुध्द आली. त्याला विचारले काय झाले बाहेर
बेशुध्द कसा पडलास??? तेव्हा त्याने घडलेली गोष्ट पुढील प्रमाणे
सांगितली.....
"तुम्ही निघाल्यावर अगदी ३-४ मिनिटां मध्ये मी पण निघालो. गेट मधून बाहेर
पडलो तेव्हा तुम्ही चालताना दिसत होतात. इतक्यात माझा हात कोणी तरी पकडला
म्हणून पाहिले तर ती बिना मुंडक्याची बाई (ही बिना मुंडक्याची बाई फेमस
होती, आणि बर्याच जणांनी पाहिलेली होती) मी ओरडण्याचा प्रयत्न केला ......
आणि आता शुध्दीवर आलो"