हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

बुधवार, १४ डिसेंबर, २०११

राजमान्य राजश्री श्री. नरेंद्र मोदी यांस,

राजमान्य राजश्री श्री. नरेंद्र मोदी यांस,
स. न. वि. वि.
लिहिण्यास कारण कि , गुजरातची प्रगती बघून माझा झालेला जळफळाट व तुम्हास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बदली घेण्यासाठी विनंती.
आज गेले सहा महिने मी गुजरातमध्ये कामा निमित्य राहत आहे. इथले सर्व हमरस्ते हे सुंदर रीतीने बांधलेले व एकही खड्डा नसलेला पाहून मला इथल्या कंत्राटदारांवर कीव आली. तुम्ही इथे इतके काम केले तरी इथे तुमचे कौतुक करणारे चेले नाहीत किंवा खंदे कार्यकर्ते नाहीत हे मला इथे कुठेही 'दात विचकावून हसतानाचे' ,'नमस्कार करतानाचे' , किंवा 'टाटा करत चालातानाचे' वगैरे बोर्ड नाहीत ह्या वरून दिसून आले आणि खूप वाईट वाटले.
तुम्ही इथे फक्त कारखानदारी चा विकास न करता कृषी आणि पर्यटनाचा सुद्धा विकास केला, भरपूर समाजकल्याणाचे काम केलेत, मग तुम्ही स्वतः काय कमावले? तुमचे स्वतःचे एक तरी कॉलेज किंवा टाऊनशिप आहे का ? ......... आमच्या महाराष्ट्रात या आम्ही तुम्हाला सर्व शिकवू.
तुम्ही जर माझ्या विनंतीला मान्यता देऊन आला नाहीत तर मी इथे गुजरात मध्येच राहिला येईन व येताना बिहारी पण घेऊन येईन. मग बघा तुम्हाला पण  'ती' वाली पाणीपुरी खायला लागेल !
आपला.
(नम्र) विशुभाऊ

३ टिप्पण्या: