हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

रविवार, ९ जानेवारी, २०११

पूर्व दिशा

भारत वर्षाला हजारो हजारो वर्षांचा इतिहास आहे. हजारो वर्षान पासून इथे धार्मिक कार्य, वास्तुशास्त्र हे दिशा प्रमाण मानून होतात, आणि ह्याच गोष्टीनी मला लहान पणा पासून संभ्रमात टाकणारा प्रश्न निर्माण केला ' आधी लोहचुंबक कि आधी दिशा? '.....


ह्या विषयाचा शोध घेताना बरीच पुस्तकं वाचली बर्याच विद्वानांचे निष्कर्ष वाचले आणि एकदा लहानपणी डॉ. प. वि. वर्तक यांचे 'वास्तव रामायण' वाचण्यात आले आणि शोधाला दिशा मिळाली. गेल्या आठवड्यात माझे त्यावेळी केलेले संशोधन आणि हस्तलिखिते मिळाले आणि पुन्हा त्या विषयाला उजाळा आला; तर चला बघूया आपले पूर्वज दिशा कसे ओळखत असत ......

रामायणात प्रत्येक दिशेचे सुंदर वर्णन सुग्रीव ह्याने आपल्या वानर सेनेला सिताशोधार्थ पाठवताना केले आहे. किष्किंधा सर्ग ४० मध्ये सुग्रीव खालील प्रमाणे पूर्व दिशेचे वर्णन वानर सेनेचा सेनापती विनात याला करतो:


त्रिशिराः कांचनः केतुः तालः तस्य महात्मनः ।
स्थापितः पर्वतस्य अग्रे विराजति स वेदिकः ॥४-४०-५३॥


अर्थ: तीन शिरा असलेल्या सोनेरी तालवृक्षाकृती त्याचे महत्म असून, ते पर्वताच्या अग्रभागावर स्थापित आहे.

पूर्वस्याम् दिशि निर्माणम् कृतम् तत् त्रिदशेश्वरैः ।
ततः परम् हेममयः श्रीमान् उदय पर्वतः ॥४-४०-५४॥
तस्य कोटिः दिवम् स्पृष्ट्वा शत योजनम् आयता ।
जातरूपमयी दिव्या विराजति स वेदिका ॥४-४०-५५॥


अर्थ: त्रीदशेश्वाराने पूर्व दिशेला ह्याचे (तालवृक्षाचे) निर्माण केले, त्याच्या मागे सोनेरी (हेममयः) उदय पर्वत आहे. त्याचे कोटी दिव्य स्पृष्ट हे शंभर योजने उंचीचे आहे, व जो सोनेरी दिव्य विराजित करतो.

इथे सुग्रीवाने पूर्व दिशेची ओळख म्हणून उदय पर्वतावर कोरलेल्या एका सोनेरी तालवृक्षाची खुण सांगितली आहे, आणी ही खुण दुसरे तिसरे काही नसून पेरू देशातला मधला 'Trident' आहे, व त्याचेच हे तंतोतंत वर्णन आहे. त्या पूर्वेच्याखुणेला कसे पोहचायचे ह्याचे वर्णन सुद्धा सर्ग ४० मध्येच आहे.

नदीम् भागीरथीम् रम्याम् सरयूम् कौशिकीम् तथा || ४-४०-२० ||
कालिंदीम् यमुनाम् रम्याम् यामुनम् च महागिरिम् |
सरस्वतीम् च सिंधुम् च शोणम् मणि निभ उदकम् ||४-४०-२१ ||
महीम् कालमहीम् चैव शैल कानन शोभिताम् |
ब्रह्ममालान् विदेहान् च मालवान् काशि कोसलान् ||४-४०-२२ ||
मागधाम् च महाग्रामान् पुण्ड्रान् अंगाम् तथैव च |
भूमिम् च कोशकाराणाम् भूमिम् च रजत आकराम् ||४-४०-२३ ||


अर्थ: (सुग्रीव विनत ला सांगतो) भागीरथी नदी ( बघ) ,रम्य शरयू नदी ,कौशिक नदी बघ. कालीन्दिम पर्वतातून वाहणारी नदी यमुना बघ तिचा उगम रम्य महागीरीत आहे. सरस्वती नदी पण बघ सिंधू नदी पण बघ आणी शोणाम नदी बघ ज्याचे पाणी मोत्या सारखे आहे. महिम नदी बघ कालमहिम बघ जे जंगलाने शोभित आहे, ब्रह्ममालान , मालवान , काशी, कोसलान (सारखी राज्ये) सुध्दा बघ. मागध सारखे महाग्राम बघ , पुण्ड्रान , अंगाम सुद्धा तिथेच आहेत. कोषकाराची ( कोषातून रेशीम उत्पन्न करणार्यांची) भूमी बघ , रजताची (चांदीची) भूमी बघ.पूर्वेला कसे जायचे हे सांगताना सुग्रीव विंध्य पर्वताच्या उत्तरेस म्हणजे दक्षिण भारताच्या उत्तरेस आणी यमुना नदीच्या पूर्वेस असणाऱ्या सर्व प्रदेश सांगतो. ब्रह्ममालान , मालवान , काशी, कोसलान, मागध , अंगाम इत्यादी राज्ये सांगितल्यावर तो रेशीम उत्पन्न करणारे आणी चांदीची खाणी असणारे प्रदेश बघायला सांगतो. ह्या सर्वाचे वर्णन ऐकल्या वर हा प्रदेश म्हणजे आजचा ब्रम्हदेश वाटतो.

त्यापुढे त्याने जे वर्णन केले आहे, ते सयाम, चीन आणि जपान सारखे असून पढे प्रशांत महासागरातून दक्षिण अमेरिकेचे वाटते.

सध्या आपण प्रशांत महासागरातील काल्पनिक रेषा जी पूर्व मानतो, त्या पेक्षा हजारो वर्षान पूर्वी आपल्या पूर्वजांनी प्रशांत महासागरा पलीकडील पर्वत ही पूर्व मानून त्यावर 'तालवृक्ष' म्हणजे 'Trident' कोरला...आपला,

(दिशाशोधी) विशुभाऊ

८ टिप्पण्या:

 1. छान लिहिले आहे,
  तुमचा ब्लॉग आवडला ,
  माझ्या ब्लॉगचा पत्ता:
  http://prashantredkarsobat.blogspot.com/

  उत्तर द्याहटवा
 2. This is a very interesting topic. I'd recently read an article which said that Mayan kingdom was established by 'मय' a very famous Indian architect (the one who built माया नगरी for the Pandavas). Would love to read more articles on the topic, do send me references on the same if you have any.
  -Parikshit

  उत्तर द्याहटवा
 3. @sagar @yogesh @ parikshit Thanks, @parikshit "maay" baddal mi lavkarach lihin ... tya aadhi je kahi documents aahet te mi deto tula....

  उत्तर द्याहटवा
 4. वा, फार मस्त माहिती आहे. 'वास्तव रामायण' पुस्तकाबद्दल प्रथमच ऐकले, आपण ह्यावर परीक्षण लिहू शकाल का? धन्यवाद.

  उत्तर द्याहटवा
 5. @pranav, nakki prayatna karato... majhya kade aata te pustak nahi.. sadaharan 14 varshan purvi vachale hote te .....

  उत्तर द्याहटवा
 6. KHUPCH sunder, informative & thought provoking..!!

  reference of TRIDENT of Peru is really very true!!

  initiating a search of `VASTAV RAMAYAN' now .

  many many thanks VISHUBHAU

  उत्तर द्याहटवा