"सुपारी ..... तुझे लग्न दुपारी" "पडावा ..... नीट बोल गाढवा" वगैरे
लहानपणीची थट्टा करायची वाक्ये वापरता वापरता थट्टा करणे हा माझा गुण कधी
झाला तेच समजले नाही. तशी विनोदी थट्टा करणे हे कधी कधी चांगले असते पण कधी
कधी अंगाशी सुध्दा येते. थट्टा तशी कधी मुद्दाम होते तशीच केव्हा केव्हा
अजाणते पणे सुध्दा होते. शाळेत असताना एकदा व्यासपीठावर माईक समोर आमच्या
मुख्याधापाकांचे पूर्ण नाव 'पुंडलिक अप्पा खामकर' मी चुकून सवयी प्रमाणे 'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल' च्या तालात घेतले, आणि तोंड रंगवून हनुमाना सारखा चेहरा घेऊन परतलो होतो.
असे बरेच प्रसंग माझ्या बरोबर झाले तरी सवय काही गेली नाही. आज सुद्धा असाच एक 'अतिप्रसंग' मी स्वतःवर ओढून घेतला. ऑफिस मधून निघालो आणि बस स्टॉपवर माझ्या एका चायनीज कलीग 'ली इयान' (हे मुलीचे नाव आहे) बरोबर बोलत उभा होतो इतक्यात माझी एक मेहुणी तिच्या
नवऱ्या बरोबर मला तिथे भेटली. इतक्या वर्षात मुंबई मध्ये एकमेकांचे तोंड न
पाहिलेलं, पण दुरूनच ह्या बयेने मला सिंगापुरातल्या गर्दीत बरे ओळखले.
भेटताच आम्ही एकमेकांना हसून 'ग्रीट' वगैरे केले आणि गप्पा मारायला सुरुवात
केली, तरी माझ्या मेहुणीचे लक्ष मात्र ली इयान कडेच होते. आता स्त्री
मानसशास्त्राचे माझे ज्ञान अफाट असल्याने तिच्या कुशाग्र बुद्धीचा अंदाज
घेण्यास मला वेळ लागला नाही, आणि मला पुलंचा नाम्या परीट आठवला. मी म्हटले
"आगं हि माझी फॅमेली !!!". मेहुणीचा नवरा गडबडला खरा पण सावरत म्हणाला
"मुंबईचे काय?". म्हटले "ते आहेच .... हि स्टेपनी!".
मेहुणी भोळ येऊन
पडायचीच बाकी होती पण तिचा नवरा व्यासंगी असल्याने त्याने लगेच ओळखले आणि
म्हणाला "तर नाम्या चांगले चालू आहे तुमचे 'सिंगापुरायन'" , आणि आम्ही दोघे
जोरात खो खो करून हसलो. संदर्भासहित स्पष्टीकरण दिल्यावर बायकोच्या
बहिणीचा जीव भांड्यात पडला आणि माझ्या थट्टेची दाद देऊन दोघेही तेथून निघाले.
मी वळून ली इयान कडे पहिले तर तिने रागाने माझ्या कडे पाहून विचारले "डिड यु कॉल मी 'फॅमेलि' ऍण्ड 'स्टेपनी' ????"
आपला,
(थट्टेखोर) विशुभाऊ
हाहाहाहा... स्टेपनीप्रसंग!!! :D
उत्तर द्याहटवाहा हा हा !!!
हटवालबाड आहात
उत्तर द्याहटवालबाड लांडगा असतो . . .
हटवाविशूभाउ< अतीप्रसंग ओढवला आहे.. ( आहे हा शब्द पुन्हा पुन्हा वाचणे ) भारतात आल्यावर वाट लागणार हे नक्की :)
उत्तर द्याहटवाहा हा हा दादा, डोळे आणि कान ह्यात ज्या प्रमाणे ४ बोटांचे अंतर असते त्याच प्रमाणे, सत्य आणि लिखाण ह्यात त्या पेक्षा जास्त.....
हटवाआपला बोलाचा भात आणि बोलाची कढी !!!
ha ha ha .......
उत्तर द्याहटवा:)
हटवालैच :)
उत्तर द्याहटवा:P
हटवालैच विशूभाऊ. भारतात परत आल्यावर पंक्चर झालात नाही म्हणजे मिळवले ;-)
उत्तर द्याहटवाबस्स् काय सिध्या !!
हटवाहा...हा...हा... आता नवीन लिहायला घ्या.... "विशुभाउंची स्टेपनी"....." माझे स्टेपनीयायन"...वगैरे...वगैरे...
उत्तर द्याहटवायोमु!!! का रे जिवावर उठलास !! ;)
हटवा