नसतेस घरी तू जेव्हा
जीन घुटका ... घुटका पितो
मैफिलीचे जुळती धागे
मित्रांना घरी बोलावतो .....
आकाशातून अप्सरा उतरावी
माहोल तसा होतो
बियर दिशाहीन होते
अन प्याला रिक्त होतो ....
येतात बाजूचे दाराशी
शिव्या देऊन जाती मागे
खिडकीशी सिगारेट पितो
धूरही तालात जातो ....
हो झालो अजुनी मोकळा
'अझाद' अजुनी झालो
तुज वाचून उमजत जाते
संसारात उगाच अडकतो ....
नसतेस घरी तू जेव्हा
जीन घुटका ...
आपला ,
(अझाद) विशुभाऊ
ह्या विडंबनाचा आणि माझ्या वैयक्तिक जीवनाचा काही एक संबंध नाही .... तसा आढळल्यास केवळ योगायोग समजावा ....
आपला,
(सत्यवचनी) विशुभाऊ
ha ha ha... zakaas ahe ... cheers..!!
उत्तर द्याहटवाधन्यवाद ऋषिकेश
हटवाचिव्वर्स !!
उत्तर द्याहटवाचिव्वर्स पंक्या
हटवाधन्स सौरभ
उत्तर द्याहटवा