हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

सोमवार, २४ सप्टेंबर, २०१२

हा खेळ पैश्यांचा....

कंपनीत खेळ चाले, या गूढ संख्यांचा 
संपेल न कधीही, हा खेळ पैश्यांचा 

हा बॉस ना स्वयंभू, उगाच ज्ञान वाटतो हा 
इन्फ्लेशन मध्ये अभिशाप भोगतो हा 
यशात घेई भागीदारी, हा दूत असुरांचा 

आभास ऍप्रेजल हे असते खरे गाजर 
जे इन्क्रिमेंट मिळे ते, असतो नितांत भास 
अनंदतात बाकीचे, हा दोष त्या बावळटांचा  

या साजिर्या क्षणाला, प्याला असावा मुठीत 
ओठांवरील सर्व शिव्या, लागतील त्याला खचित 
गवसेल का सूर अपुल्या?, 'अझाद' जीवनाचा .....
 
आपला,
(नोकरदार) विशुभऊ