हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

सोमवार, ३ सप्टेंबर, २०१२

आजी आणि नातवंड

जगातल्या प्रत्येक नात्यामध्ये एक वेगळेच समीकरण असते , त्यातल्या त्यात जर ते आजी आणि नातवंडांचे असेल तर 'नातवंडांची काळजी आणि त्यांच्या आईला टोमणे'!!! .....
माझ्या आजीला म्हणजे बाबांच्या आईला मुळात १० मुलं असल्याने नातवंडाची काही कमी नव्हती .... तरी मी म्हणजे मुलाचा मुलगा किंवा वंशाचा दिवा किंवा माझ्या १४ बहिणींच्या भाषेत 'दिवट्या' म्हणजे एक मोठे प्रस्थ होते .... संपूर्ण घराण्यात लाडावलेला एक आळशी आणि खादाड पोरगा म्हणजे 'मी' .... असे असून सुद्धा माझी आजी मला पाहिल्यावर , आईला बोलायची 'बिचाऱ्याची गालफट्ं बसली आहेत' ,'बरगड्या निघाल्या आहेत' , 'पोराला काही खायला देतेस कि नाही ??'  वगैरे वगैरे ..... आणि ह्याने जास्तच लाडात येऊन मी केविलवाणा चेहरा करायचो आणि आई स्वस्थ पण वेगळाच भाव.......
त्या दिवशी माझ्या मुलीला पाहून आई बोलली 'किती बारीक झाली आहे !!" .... लगेच आमच्या कन्येने केविलवाणा चेहरा केला आणि बायकोच्या चेहऱ्यावर आईचा पूर्वीचा भाव दिसला.... आणि मी गालातल्या गालात हासलो ....
आपला,
(दिवट्या) विशुभाऊ

1 टिप्पणी: