सिंगापूर म्हणजे जागतिक व्यापाराची राजधानी .... आणि ह्या देशाची
प्रथम भाषा 'इंग्रजी' असली तरी इथे तर्खडकर आले असते तर पावला पावला ला
जीव दिला असता त्यांनी !!!
इथेले इंग्रजी म्हणजे एक मोठा संशोधनाचा विषय .... कोणत्या भाषेची वाक्यरचना मनात करून इंग्रजी बोलतात ते देवालाच ठाऊक .... आता खाली दिलेली उदाहरणेच पहा ....
एका प्रोडक्शन कंपनीच्या
सुपरवायजरला त्याचा मॅनेजर नवीन कामावर घेतलेल्या कामगाराकडे बोट दाखवून
विचारतो " हि नो ओर नो ?" ..... ह्याचा अर्थ असा कि ' दॅट पर्सन नो (Know)
हिज वर्क ओर नॉट (no) !' .....इथेले इंग्रजी म्हणजे एक मोठा संशोधनाचा विषय .... कोणत्या भाषेची वाक्यरचना मनात करून इंग्रजी बोलतात ते देवालाच ठाऊक .... आता खाली दिलेली उदाहरणेच पहा ....
ह्यांच्या व्याकरणात क्रियापदांची व्याख्याच निराळी आहे . . . म्हणजे कुठे क्रियापद लावता आले नाही कि तिथे 'ला' लावायचे .... " नो प्रॉब्लेमला" "वन डॉलर एक्सट्रॉला" वगैरे वगैरे . . . .
आणि सगळ्यात मजा येते ती "कॅन कॅन" मध्ये . . . जिथे आपण मराठीत 'चालेल' 'होईल' किंवा इंग्रजी मध्ये 'विल डू' 'कॅन बी डन' वगैरे म्हणतो तिथे हि लोकं 'कॅन कॅन' म्हणतात . . . .
तरी इथल्या इंग्रजी मध्ये ब्रिटीश इंग्रजी सारखा रुक्ष पणा नसून उर्दू सारखी एक नजाकत आहे . . . म्हणूनच आम्ही ह्या भाषेला 'इंग्लिश' नव्हे 'सिंग्लीश' असे म्हणतो .....
आपला,
(सिंग्रजी) विशुभाऊ
>>कॅन कॅन
उत्तर द्याहटवाha...ha...ha...
;)
हटवाgood one la
उत्तर द्याहटवा