हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

रविवार, २३ सप्टेंबर, २०१२

परदेशी प्रत्यक्ष निवेश (FDI)

पैसा साक्षप्तेच्या नियमा नुसार 'पैसा निर्माणही करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही, त्याचे एका रूपातून दुसऱ्या रुपात रुपांतर किंवा देशातून परदेशात स्थलांतर करता येते' .... पैसा खाणे म्हणजे कोणत्याही सरकारी प्रक्रियेत स्वार्थ साधण्यासाठी पैस्याचे केलेले रुपांतर किंवा स्थलांतर होय !.... रुपांतरीत पैसा संचित करणे धोकादायक असल्याने मुख्यत्वे त्याचे स्थलांतर केले जाते .... राजकारणातल्या अलिखित नियमानुसार रुपांतर आणि स्थलांतर हि प्रक्रिया आपल्या ५ वर्षांच्या राजवटीतील पहिल्या ३ वर्षात करायची असते ...... पुढील १ वर्षात त्यातील काही पैसा देशात परत आणून पैसा निर्माण केल्याचा भास करावा व पुढे येणाऱ्या निवडणुकी साठी जनसमर्थन मिळवावे....
परदेशी प्रत्यक्ष निवेश हि योजना स्थलांतरित पैसा परत आणण्यासाठी सर्वात्कृष्ट पध्दत आहे .... आपल्या जवळील नातेवायाकांना परदेशी स्थाईक करून त्यांचा तर्फे परदेशी कंपनी बनवावी व स्थलांतरित पैसा पुन्हा 'परदेशी प्रत्यक्ष निवेश' योजने मार्फत देशात आणून , देशाची आर्थिक बाजू सावरावी आणि होणारा नफा पुन्हा होता तिथे घेऊन जावा....
वरील दिलेले नियम आणि प्रक्रिया ह्या परीक्षित असल्या तरी विशेषज्ञांच्या मार्गदर्शना खालीच पार पाडाव्यात ..... घटने मुळे घडलेल्या आकस्मित घटनेला विशुभाऊ जबाबदार राहणार नाहीत !!!
आपला,
(अर्थतज्ञ) विशुभाऊ