हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

शनिवार, २५ ऑगस्ट, २०१२

नारायण आणि नाऱ्या

एक काळ होता जेव्हा नारायण नामक बालक पुढे जाऊन रामदास झाले .... आता असे घडत नाही ... कारण .......
(एका काळोख्या खोलीत नाऱ्या एकटा बसलेला असतो ..... आणि त्याची आई त्याला येऊन विचारते ...)
आई : आरे नाऱ्या इथे काय करतो आहेस ?
नाऱ्या : मी चिंता करतो आहे विश्वाची .....
आई : कार्ट्या आभ्यास काय तुझा 'बा' करणार का?? ... म्हणे चिंता करतो विश्वाची .....
आणि नाऱ्या चुपचाप जाऊन पुस्तकात डोके घालून बसतो .....
आपला,
(नाऱ्या) विशुभाऊ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा