हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

सोमवार, ७ जून, २०१०

कट्टा

कॉलेज कट्टा म्हणजे त्या वयातल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय.... कितीही टेंशन मध्ये असलो, तरी कट्यावर गेलो की कसे छान वाटे ,मग प्रसंग काही असो... घरचे प्रश्न, कॉलेज मधली ब्लॅक लिस्ट ते थेट प्रेम भंग , सगळ्याचे निवारण तिथेच धुरांच्या वलयांमध्ये आणि पानाच्या पिचकाऱ्यांमध्ये व्हायचे...

आज बऱ्याच वर्षांनंतर कट्ट्यावर जायचे ठरवले... जाताना बऱ्याच कल्पना रंगवल्या होत्या.... वाटले होते जुने सोयरे भेटतील, मजा मस्ती होईल... रंग्याचे जोक, भिक्या च्या थापा, बापट्याच्या कविता ऐकायला मिळतील..नविन जोमाचे नविन जवान आपला कट्टा रंगवत असतील... पक्या नेहमी प्रमाणे ऊधारी ची आठवण करून बिडी हातात टेकवत असेल..... मी खुप एक्सायटेड होतो... चालता चालता आतंर संपतच नव्हते, शेवटी तर धावत सुटलो, जवळ जवळ पाच एक वर्षांचे अंतर जे कापत होतो मी.... आणि जेव्हा पोहचलो तेव्हा मला जोराचा धक्काच बसला....

पक्या बिचारा कुठेतरी शुन्यात नजर लावून पानाला कथ्था लावत होता (कोणाच्या ठाऊक नाही).... कट्टा रिकामा होता, रंग्या-भिक्या तर नाहीच पण नविन पोरं सुध्दा नाहीत... पक्याला विचारले तर त्याने काही न बोलता हात पालथे करून दाखवले.... मी पण थोडे सावरण्या साठी सिगारेट सुलगवली आणि जुन्या आठवणीन मध्ये उभा राहीलो... तेवढ्यात कॉलेज ची काही मुलं माझ्या समोर ऊभी राहिली व अभ्यासा बद्दल बोलू लागली, मी दुर्लक्ष करणारच तितक्यात मला जाणवले की ही पोरं फ़ेसबुक आणि ट्विटर वर रात्री कट्टा जमवण्याच्या प्लॅन करत होते....

मला त्या पोरांची खुप किव आली ............. सिगरेट न पिणारी, तंबाखू न खाणारी, फक्त इंटरनेट वर मित्रांना भेटणारी ही नविन पिढी आपली संस्कृती, आपला कट्टा काळाआड गायब करणार; हे बघून माझे  ह्रदय तिळ तिळ तुटले.....

आपला,
(कट्यावरचा) विशुभाऊ

३ टिप्पण्या:

  1. अरे अरे अरे...
    सिगरेट न पिणारी तंबाखू न खाणारी, फक्त इंटरनेट वर मित्रांना भेटणारी ही नविन पिढी आपली संस्कृती आपला कट्टा काळाआड गायब करणार हे बघून माझे ह्रदय तिळ तिळ तुटले.....

    आपला
    (दुखात सहभागी )सागर

    उत्तर द्याहटवा
  2. इतरत्र कुठेतरी तुम्ही शोधत असलेला कट्टा भरतच असेल.... काळजी नसावी....

    उत्तर द्याहटवा
  3. विशुभाऊ, कट्ट्याला मरण नाही. संपर्काची साधनं कितीही प्रगत असो, कट्टा आणि कट्टेकर सदैव राहतील...

    उत्तर द्याहटवा