हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१२

चोरा चोरी

कोण कोणाचे काय चोरेल हे अजिबात सांगता येत नाही .... सुरुवातीला 'बोक्या सातबंडे' प्रकरणाने मराठी ब्लॉगर्स समूहाला (हो म्हणजे काय ! हा साहित्यिक समूहा पेक्षा मोठा आहे) हादरवून टाकले होते .... नंतर नंतर ह्या घटना इतक्या वारंवार होऊ लागल्या कि 'आपले साहित्य चोरणे' म्हणजे 'वाह्ह व्वा !' सारखी एक पोहोच पावतीच झाली.... माझ्या कविता किंवा लिखाण हे चोरण्या सारखे असेल हे आमच्या तिर्थरुपांना पण कधी वाटले नाही (आणि अजूनही वाटत नाही !)असो .... तरी कधी कोणी पांचट आवडीच्या आणि अकलेच्या माणसाने हे कृत्य केलेच कि आम्ही ओरडून ओरडून सांगतो 'आमचे साहित्य चोरले' म्हणजे 'वाचा वाचा मी किती उत्कृष्ट लिहितो!' हे सांगणे असते.... मग आमच्यातले जेष्ठ श्रेष्ट लोकं सांगतात 'अरे शब्द चोरेल !! प्रतिभा थोडीच चोरू शकेल??'  (हो च्याला ते चोरू शकले असते तर कसला भाऊ नी कसला फळा)....
पण आज जेव्हा एकाने मला टोमणा मारला 'काय हो पंताची 'कंसातली'  स्टाइल चोरता का?' तेव्हा पहिल्यांदा जिव्हाग्री लागले !!!! ..... खरे आहे मी पंतांची स्टाइल उचलली , कारण मित्रांची गोष्ट हि उचलायची असते, ती चोरी नसते ....
माझ्या ब्लॉगिंग ची सुरुवात मुळात पंतांचे उवाच वाचता वाचता झाली .... पुढे 'मराठी भुंगा' डोक्यात घुमायला लागल्यावर 'काय वाटेल ते' लिहायला आणि 'वटवट' करायला लागलो.... इथे तिथे 'भटकंती' करता करता 'मोगरा फुलाला' पाहू लागलो .... 'मनाचे बांधकाम' पहिले 'बाबाच्या भिंतीवर' उड्या मारल्या.... 'पाटी माझी पटेल का?' बोलणार्यांची पाटी पाहिला लागलो .... आणि बर्याच गोष्टी करताना 'मन उधाण वाऱ्याचे' करून सुचेल ते जमेल ते लिहायला लागलो ....
आता कोणा कोणाचे काय उचलले किंवा चोरले ते सांगणे कठीण ...... हां पण प्रयत्न करून सुद्धा कोणाची प्रतिभा मात्र चोरू शकलो नाही .....
आपला,
(उनाड) विशुभाऊ
ता.क. : जे काय लिहिले आहे, ते मुळात सगळ्यांना कळणार नाही .... त्या बद्दल क्षमस्व!

७ टिप्पण्या:

  1. ज्यांना कळायला हवं त्यांना कळलं की झालं ओ फळावाले ;)

    उत्तर द्याहटवा