हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

बुधवार, १९ सप्टेंबर, २०१२

माझी गांधीगिरी


आज माझ्यातल्या सरळ स्वभावाची प्रचीती मलाच झाली ..... इथे सिंगापूर मध्ये फास्टफूड सेन्टर्स मध्ये खाउन झाल्यावर स्वतःचे ट्रे उचलण्याची पध्दत नाही .... पण घराच्या शिस्ती मुळे मी स्वतःचे ट्रे स्वतः उचलतो , बायकोच्या शिस्तीचा प्रभाव कमी असल्याने धुवून ठेवत नाही ......

आज सबवे मध्ये दुपारचे जेवण घेतल्यावर सवई प्रमाणे ट्रे उचलला आणि निघालोच .... तोच एका दाम्पत्याने मला त्यांच्या टेबल वरच्या ट्रे कडे बोट दाखवून म्हटले "प्लीज क्लीअर धीसला!".... मी त्यांच्या कडे पाहून हसलो व त्यांच्या टेबल वरचे ट्रे सुध्दा उचलत होतो, तोच सबवे मधला कर्मचारी "सोर्री सोर्री" करत ओरडत आला व त्या दाम्पत्यांना म्हणाला "सर इज आवर कस्टमर" आणि माझ्या हातातले ट्रे खेचून घेतले.... त्या दाम्पत्यांना मेल्याहून मेल्या सारखे झाले होते .... त्यांच्या "सॉरी" चा मान झुकवून स्वीकार केला व काढता पाय घेतला...

धावत धावत ऑफिस च्या वाशरूम मध्ये गेलो व ५ मिनिटे स्वतःला न्याहाळत होतो .... तेव्हा कळले माझ्या हिरव्या टी-शर्ट आणि ओफ्व्हाईट प्यांट ची करामत होती हि ......

आपला,

(समाजसेवक) विशुभाऊ

९ टिप्पण्या:

  1. प्रत्युत्तरे
    1. हा हा हा हेरंबा!!! असे केले तर फावल्या वेळेत पगारा पेक्षा जास्त कमवेन ;-)

      हटवा
  2. खरंय अझाद... फावल्या वेळचा धंदा मस्त आहे की! बाकी बायकोच्या शिस्तीचा प्रभाव कमी असल्याने धुवून ठेवत नाही ...... खी खी खी

    उत्तर द्याहटवा
  3. विशुभाऊ, मस्त.
    टिप मागायची ना.. बरा आहे साईड बिझीनेस..

    उत्तर द्याहटवा
  4. आयला , अरे जमलं की टिपणी चक्क पोस्ट झाली ब्लॉगरवर , आम्ही धन्य झालो.

    उत्तर द्याहटवा
  5. >> बायकोच्या शिस्तीचा प्रभाव कमी असल्याने धुवून ठेवत नाही

    :D :D :D

    त्या जोडप्याची सॉलिड सॉरील्ला झाली तर ;-)

    उत्तर द्याहटवा