हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

गुरुवार, १६ ऑक्टोबर, २००८

लाखोबा ची साठा उत्तराची कहाणी !!!!

लाखोबाची साठी झाली आणि त्यांचे दाहि दहा वाजलेले घड्याळ बंद पडू नये म्हणुन शेतकरी राजाने त्याचा सत्कार शिव तिर्थावर केला.
त्या सत्काराला गुंड्याभाऊ पण कमळ घेउन आले, आणि काडि पेटवण्याचा पूर्ण प्रयत्न केला!!!
आपली साठा उत्तराची कहाणी सांगताना लाखोबाने आपला प्रवास अगदी धनुष्य , पंजा पासून घड्याळा पर्यन्त संपूर्ण वर्तवला , आणि सांगताना स्वताहाच गोंधळला , कारण प्रवासाचे कारण स्वताहाच विसरला !!!!
आसो तरी प्रवासाला प्रोत्साहन देणार्या ह्रुदयसम्राट व शेतकरी राजा या दोघांचे ही त्याने आभार मानले आणि महात्मा फुले यांचा आदर्ष पाळल्याचा खोटा दिलासा स्वताला देऊन आपली कहाणी पाचा उत्तरी संपूर्ण केलि.
स्वामी लाखोबाला दिल्ली ला पाठवून reservation वाढवण्याची युक्ति देतिलच , तरी आपण त्याना सहकार्य करावे ही विनंती !!!!

आपला,
(सहकारी) विशुभाऊ !!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा