हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

Thursday, November 6, 2008

चहा टपरी ....


मृदु भावनांचा हेतु त्याचा साधा
प्रिये , प्रेमाने पाजेन एक कटिंग प्याला
आधी घे मस्त झुरका मग एक घोट त्यातला
सर्वांचे स्वागत करतो चहा टपरी वरचा प्याला ||

ओझे जीवनाचे वाहत तो गेला
जिव त्याचा विसावला घेउन एक प्याला
क्षीण घालवून , विचार सुचवून दिला त्याला
सर्वांचे मन खुलवे तो चहा टपरी वरचा प्याला ||

मित्रा हा जिव तुझा झाला, सर्वांचा तू होउन गेला
किटलीत भरून तुला , हा झाला चहावाला
त्यासी देऊन पैका , तो झाला जीवनवाला
सर्वांचे मन जिंकले तो चहा टपरी वरचा प्याला ||

जरी जवळ उभी ती मधुशाला
मला हवे चहा टपरी वरचा प्याला ||

आपला,
(चहाप्रेमी) विशुभाऊ

3 प्रतीसाद:

Shailesh Pingle said...

vishubhau malaa tumachya blog var ip tracer disale te malaa maatyaa blog var insert karaayache aahe madat kara

विशुभाऊ said...

आहो शैलेशभाऊ ते Gadgets मध्ये technology ह्या विषया खली आहे ...

Saurabh said...

अगदी कटिंगसारखीच फक्कड कविता आहे...