हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

बुधवार, ५ नोव्हेंबर, २००८

असा माझा जीवन धडा


हजार काळीजे दुखावित गेलो,
आले शिव्या शाप पाचवित गेलो....
आयुष्याचा भरतो घडा,
' असा माझा जीवन धडा ' ....

स्वप्नांचा मार्ग फार खडतर होता ,
माझा गुन्हा फार मोठा होता....
आयुष्याचा भरतो घडा,
' असा माझा जीवन धडा ' ....

यशाच्या शिड्या चढत गेलो,
मागचे सगळे विसरत गेलो ...
आयुष्याचा भरतो घडा,
' असा माझा जीवन धडा ' ....

आपेक्षांचा डोंगर मोठा होता,
पण माझा दृष्टिकोन बोथट होता...
आयुष्याचा भरतो घडा,
' असा माझा जीवन धडा ' ....

आपला,
(जिवनपंथस्त) विशुभाऊ