हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

सोमवार, ४ जानेवारी, २०१०

नवी पिढी

"तू मोठा होऊन कोण बनणार?"
"ST BUS Driver!!" .....

लहानपणी कोणीएका कुचकट माणसाने विचारलेल्या प्रश्नाला मी दिलेले प्रामाणिक उत्तर , हो ! खरंच मला लहानपणी ST dirver होण्याचे त्याच्या सारखे भरपूर फिरण्याचे फार अपरूप होते..... आता ते आठवले की हसायला येते ... मूर्खपणाचे वाटते...

पण हाच प्रश्न आताच्या मुलांना आपण जेव्हा विचारतो तेव्हा ते थक्क करणारी उत्तरे देतात ... "हिप हॉप डान्सर होणार !" .... "बायोइन्फोटेक मध्ये संशोधन करणार".... च्या मारी टोपी ह्या वयात आम्हाला संशोधन हे फक्त न्युटन नामक जंतूचे काम असून तो आमच्या विज्ञानाच्या बापट सरांच्या पोटात राहतो असे वाटत असे... खरंच ही आजकालची नवीन पिढी किती फोकस आहे !!! त्यांचा अभिमान तर वाटतोच पण आपल्याला न्युनगंड पण आणतात ही पोरं.....

दोस्तांनो झपाट्याने प्रगत होणारी ही पिढी आपल्याला लवकरच म्हातारी करून निवृत्त करणार हे नक्की !!!

आपला,

(न्यूनगंडी निवृत्तीनाथ) विशुभाऊ ....

७ टिप्पण्या:

  1. हाहाहा... विशुभाऊ काय झालं राव तुम्हाला... इतक्यात म्हातारे होऊ नका... अरे अजुबाजुला जे दिसतं ते पाहून मुलं बोलतात. हे का विसरतो की ते जे बोलतात ते आपणच दाखवलेलं असतं. शिवाय आजकालच्या (पाल्यांपेक्षा) पालकांच्या त्या अपेक्षा असतात.

    उत्तर द्याहटवा
  2. खरयं तुझं म्हणणं......माझ्या मुलाने त्याच्या शाळेत याच प्रश्नाला, "मी घंटागाडीचा ड्रायव्हर होणार" (सौजन्य नासिक मपा) हे उत्तर दिले तर आम्हाला शाळेत बोलावले होते की त्याच्यासमोरचे आदर्श बदला...."Even if he wants to be a driver, he should feel to drive aeroplane or say space shuttel....We think u r not exposing him properly.." असा फुकट सल्लाही दिला होता....
    आम्ही तो तिथेच सोडला कारण मुलाने काहिही करावे त्यात त्याला आनंद मिळावा हे आमचे मत..
    पण आजकालच्या स्पर्धेच्या युगात आपण सरळ सरळ वेडे ठरतो......

    उत्तर द्याहटवा
  3. >> संशोधन हे फक्त न्युटन नामक जंतूचे काम असून तो आमच्या विज्ञानाच्या बापट सरांच्या पोटात राहतो असे वाटत असे

    हे मात्र खरं! :)

    उत्तर द्याहटवा
  4. @सौरभ कदचीत तुझे म्हणणे बरोबर आहे !!!

    @तन्वी मुला बरोबर चा ऍपरोच आवडला....

    @ आनंद धन्यवाद !!!!

    मित्रांनो... ह्या लेखा नंतर मी सर्वत्र विद्यार्थांच्या ज्या अत्महत्यांची प्रकरणे ऎकली / वाचली , त्या वरून माझा दृष्टीकोन बदलाला....
    ही मुले खुप संवेदनशील झाली आहेत आणि त्यांना आलेले थोडेसे अपयश सुध्दा तोडून मोडून टाकते....
    त्यामुळेच मला तन्वीचा दृष्टीकोन आवडला....

    मुले कशी स्वच्छंदी असली पाहीजेत... मनाने भक्कम असली पाहीजेत... अपयश पचवून जोमाने पुन्हा प्रयत्न करणारी असली पाहीजेत...

    आपला,
    (विचारी) विशुभाऊ..

    उत्तर द्याहटवा
  5. हल्ली मुलांना ' नाही 'ऐकून घ्यायची सवय नाही हे माझ्या मते सगळ्याचे मूळ आहे, ते अधून मधून शिकवायला हवे.

    उत्तर द्याहटवा
  6. न्युटन नामक जंतूचे काम असून तो आमच्या विज्ञानाच्या बापट सरांच्या पोटात राहतो असे वाटत असे < lotpot houn haslo!

    उत्तर द्याहटवा