हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

रविवार, २० डिसेंबर, २००९

महाराष्ट्राचे द्विभाजन - त्रिभाजन.....


तेलंगणा नंतर पुन्हा स्वतंत्र-विदर्भ हा मुद्दा ऎरणीवर आला. वितरीत प्रशासना मुळे नक्की कसा फायदा कोणा एका प्रदेशाला होणार किंवा तोटा होणार ह्याचा ठोकटाळा लावणे माझ्या बौद्धिक कुवतीच्या पलिकडचे असल्या मुळे मी ह्या विषयावर चार-चौघात आपले तारे तोडत नाही; पण काही दिवसांपुर्वी बाबासाहेबांचा ’महाराष्ट्राचे त्रिभाजन’ हा प्रबंध वाचला .... त्या वर हा लेख.

बाबासाहेबांच्या प्रबंधनातला प्रमुख मुद्दा हा मराठी लोकांच्या प्रगती साठी जस्तीत जास्त नेते देणे हा होता.... म्हणजे समजा महराष्ट्राचे तीन भाग केले तर एकुण तीन मराठी मुख्यमंत्री व उप-मुख्यमंत्री मराठी जनतेला मिळतील. खरे सांगायचे तर ह्याने काय साध्य होणार हे मला अजिबात कळले नाही, एक मुख्यमंत्री समजा ५ वर्षात ३०० कोटी कमवतो तर तिन मुख्यमंत्री १००-१०० कोटी कमवतील. आता ह्यात फक्त दोघांचा फायदा होऊन तिसऱ्याला २०० कोटींचे नुकसान दिसते, व बाकी सामान्य जनता जैसेथे !! ............

’नाशिक च्या मराठी माणसाला कोकणी माणसा बद्दल काय अपुलकी?’ हा बाबासाहेबांचा मुद्दा मला मनोमन पटला पण म्हणून काय वेगळे राज्य करायचे???? , अता मराठी माणसाला बिहारी बद्दल अपुलकी नसते म्हणून वेगळे राष्ट्र करायचे का???... कदाचीत मी रणदिवे असल्याने थोडाफार ’कम्युनीस्ट’ आहेच व मला हे कधीच पटणार नाही.....

त्यादिवशी कोणितरी सांगत होता की विदर्भातले शेतकरी आत्महात्या करतात त्याला सरकारचा विदर्भा च्या बाबतितला निष्काळजीपणाच कारणीभुत आहे... अरे तू जे आमदार-खासदार निवडून दिलेस ते काय .....???? की ते फक्त स्वतंत्र ( आताही विदर्भ पारतंत्रात नाही) विदर्भा नंतरच काम करणार????

कोणतेही मुद्दे हे खंडी करणाने सुटणार नसून , केवळ आपापसातले राजकारण, व हेवेदावे वाढवणार आहे. मला माझ्या विवीधतेने नटलेल्या संयुक्त महाराष्ट्राचा अभिमान आहे व तो संयुक्त ठेवण्यासाठी मी माझ्या शरिरातल्या शेवट्च्या रक्तथेंबा पर्यंत लढा देईन.....

आपला,
(संयुक्त-मराठी) विशुभाऊ.

५ टिप्पण्या:

  1. १००% सहमत... अरे लहानपणापासून आपल्याला इतिहासाच्या धडे दिले जातात की इंग्रजांनी "तोडा आणि राज्य करा" ह्या रणनितीने भारताला गुलाम केलं. हे शिकतो ह्यासाठी की पुन्हा आपण असे विभागले जाऊ नये. पण इकडे आता आपलेच नेते देश तोडताहेत. तसे म्हटले तर आंध्रप्रदेशाच्या परिस्थितीबाबत मी अज्ञानी आहे. पण तरी मनापासून वाटतय की त्याचं विभाजन व्हायला नको. ते राज्य अखंडच राहो... आणि ह्यात महाराष्ट्राच्या नेत्यांचा काही संबंध वा फायदा नसला तरी त्यांनीदेखिल आंध्रच्या विभाजनाचा निषेध केला पाहिजे. (हे कदाचित मुर्खपणाचे विधान असेल. इकडे आपलेच नेते महाराष्ट्र तोडायला बसलेत.)

    (विशुभाऊ त्या प्रबंधाची P.D.F./softcopy असेल तर इकडे पण पाठवून द्या.)

    उत्तर द्याहटवा
  2. हैदराबादला रहातो त्यामुळे तेलंगाणा प्रश्नाची थोडीफ़ार समज आहे, आणि त्यातुन जितक्या लोकांसोबत बोलणे झाले त्यातुन त्यांनाही अजुन विभाजन नको आहे.
    मी सुद्धा विभाजनाच्या विरोधात आहे. नविन राज्य बनवण्यापुर्वी, जे आधी बनलेले आहेत (उत्तरांचल, छत्तीसगड, किंवा झारखंड) त्यांची प्रगती तपासुन पाहाणे आवश्यक आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. विदर्भाचे दुःख तुम्हा मुंबई-पुणेकरांना कधीच समजणार नाही ! आमच्या विजेच्या भरवश्यावर तुम्ही लोक ए.सी. मध्ये बसता, आणि आम्ही १२-१२ तास अंधारात ! हे थांबायलाच पाहिजे. . !

    आता विदर्भ वेगळा झालाच पाहिजे !!

    उत्तर द्याहटवा
  4. हा हा मित्रा ... माला तुझी किव आली रे..... अरे तुम्हाला १२ - १२ तास विजकपात असेल तर हे तुम्ही निवडून दिलेल्या आमदार - खासदारांचे अपयश आहे... जर तुमचा गडकरी मुंबईची प्रगती करुशकतो तर विदर्भाची का नाही???? हा प्रश्न तुम्ही विचारायला पाहीजे... आणि हा प्रश्न विदर्भ वेगळा करून संपणार नाही... विदर्भाला infrastructure साठी लागणारे सगळे funding मुंबई-पुण्यातूनच येते... विदर्भाकडे स्वतःचे असे काय आहे???

    आणि तुला जर खरोखर कळकळ असती तर Anonymous ने पोस्ट केले नसतेस...

    आपला,
    (मराठी) विशुभाऊ

    उत्तर द्याहटवा